अज्ञान , अंधश्रद्धा , अस्वच्छता चा कर्दनकाळ ; संत गाडगेबाबा !( २३ फेब्रु. १८७६ – २० डिसें.१९५६ )

0
130

जय जिजाऊ

वर्‍हाडातील अमरावती जिल्ह्यात २३ फेब्रुवारी १८७६ रोजी शेंडगांव येथे जन्मलेले हे महान कर्मयोगी गाडगे बाबा अतिशय विचित्र परिस्थिती मध्ये त्यांचे बालपण जगले .जन्मदात्या वडीलाने आबाळ केल्या मुळे यांना काही आयुष्य , यांचे मामा कडे राहून , त्यांची शेत जमीन कसून , गुराढोरांची निगा राखून जगावे लागले .अक्षराचा ‘ अ ‘ सुद्धा माहित नसलेला हा जीव , एका विशिष्ट ध्येयाने पछाडला गेला होता .ते ध्येय म्हणजे समाजातील अज्ञान , अंधश्रद्धा व अस्वच्छता , हे दुर्गुण काढण्या साठी अक्षरशः स्वतःच्या संसारावर घरादारावर पाणी सोडून ; शक्य त्या ठिकाणांवर भ्रमंती करून स्वतःच्या कृतीतून सफाई व किर्तने करून , या सर्व गोष्टी करून दाखविल्या .

गाडगे बाबा यांचे समवेत तुकडोजी महाराज चर्चा करतांनाचे दुर्मिळ चित्र

पुस्तकी ज्ञानाने नाहीतर मस्तकी ज्ञानाने अतिशय प्रगल्भ असेच हे गाडगेबाबांचे व्यक्तिमत्त्व होते . चार पुस्तक शिकून आलेले ज्ञान सामान्य बाब . पण फक्त समाजातील अवलक्षणांचे , कमतरतेचे निरीक्षण करून , स्वबुद्धीने त्यावर करावयाची मात . या करिता स्वतःलाच स्वतः बाध्य करून घेणे . सामान्य जीवा चे शक्ति बाहेरचे असते . इतरांचे अज्ञान दूर करण्याचे काम करणे म्हणजे असामान्य विवेक बुद्धी असणे असे होय . सामाजिक सुधारणे साठी या महान ,असामान्य जीवाने कधीही कुणालाही कमी जास्त लेखले नाही . स्वच्छतेची सुरुवात त्यांनी स्वतः हातात खराटा घेऊन सुरू केली होती .

ग्रामस्थ कोणी येवो अगर न येवो . हा शरीराने पिळदार कसलेला जीव एकट्याने गावेच्या गावे व परिसर झाडून स्वच्छ केले होते . गावातील अस्ताव्यस्त सुटलेले पाणी यांना व्यवस्थित वाहून जाण्या करिता मार्ग करून देणे . रस्त्यातील चिखल घाण अशा प्रकारे मिटवणे . पाहिजे तिथे कुदळ-फावडे टोपले पाहिजे तिथे खराटा घेऊन स्वतः स्वच्छतेला सुरुवात करणे . ही स्वच्छता झाल्या नंतर पोटाला लागेल इतकेच एखाद्याच्या घरून खायला मिळाले की ; हा महात्मा गावाच्या बाहेर दूर कुठे तरी निवांत झाडा खाली दिवसाचा वेळ काढायचे . संध्याकाळ होताच त्या गावात वस्तीत जाऊन रस्त्यावर उभे राहून जोरजोराने ” गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला ‘ अशा प्रकारे गजर करून गावकऱ्यांना एकत्र जमवणे व जमलेल्या गावकऱ्यांना त्यांच्यातील उणिवा त्यांनी कशा दूर कराव्या .का दूर कराव्या . या बद्दल प्रश्नोत्तराचा द्वारे समाज प्रबोधन करणे . गाडगे महाराजांनी ही समाज प्रबोधनाची नवीनच पण खूप सकारात्मक परिणाम करणारी पद्धत शोधून काढली होती .श्री संत तुकाराम महाराज यांना ते स्वतःचा गुरू मानीत होते . परंतु त्यांनी कधीही इतरांचे गुरु होणे स्वीकारले नाही . ते नेहमी म्हणत असत , ” मी कोणाचा गुरू नाही .मला कोणी शिष्य नाही ” .अगदी सर्वच स्तरातील लहान थोर गरीब-श्रीमंत देवदेव करणारे असोत किंवा नास्तिक असतो . या सर्वांना त्यांचे किर्तनाचा लळा लागला होता . त्यांनी केलेले समाज प्रबोधन प्रश्न विचारून व श्रोत्यां कडून त्यांची उत्तरे वदवून घेणे . प्रत्येक श्रद्धा – रिती परंपरा यांची सुसूत्र शहनिशा करणे . काय योग्य -अयोग्य या विषयी सामान्य जनांना विचार करण्यास भाग पाडायला लावणारे .असे हे असामान्य बुद्धिमत्तेचे संत , यांच राहणीमान मात्र अत्यंत साध . इतक साध की अनोळखी व्यक्तीने यांना विमनस्क किंवा पागल म्हणून समजावे इतक !
त्या काळातील एक नामी व्यक्तिमत्व प्रबोधनकार ठाकरे यांनी दिलखुलास कबूल केले होते की ; बाबांच्या कीर्तनाचे शब्दचित्र उभे करणे त्यांच्या सुद्धा ताकदीच्या बाहेरचे आहे . साध्या सरळ गावठी भाषेत वराडी लह्यझ्यात बाबांचे समाजाला जागृत करणे . ते सुद्धा सकारात्मक परिणामा कडे जाणारे म्हणजे खरोखरच त्यांचे वाणीतुन समाजाला नवी दिशा मिळवून देण्याचे , अंधश्रद्धेतून -अनिष्ट चालीरीती च्या जोखडातून बाहेर पडण्याचा राजमार्गच जणू काय गाडगे महाराज या रूपाने निसर्गाने अज्ञ जीवां करिता एक पर्वणी उघडून दिली होती .
गाडगेबाबांनी त्यांच्या मुलीच्या बारश्या मध्ये समाजातील नेहमीची पद्धत दारू -मटण चे जेवण न देता . गोडाधोडाचे पदार्थ जेवायला ठेवले होते . घर संसारात न रमता या महान मानवाने घर त्याग केला . स्वतःच्या संसारा कडे कानाडोळा केला पाठ फिरविली . एक प्रकारे संन्यास घेतला . परंतु दुसऱ्या बाजूने , इतर सामान्य दीन-दलित गोरगरीब अज्ञानाने पछाडलेल्या जीवांच्या संसारा कडे जीवन पर्यंत लक्ष पुरविले . या महान जीवाने तीर्थाटन भ्रमंती करून ;एक प्रकारचे वनवासी जीवन जगून . लोकांची सेवा करणे . हे व्रत अंगीकारले होते . अडचणीतील लोकांना मदत करण्या करिता त्यांचे बोलावण्याची वाट न पाहता स्वतःहून धावून जात होते . या भ्रमंती मध्ये समाज प्रबोधना सोबतच नाशिक , देहू , आळंदी , पंढरपूर अशा तीर्थक्षेत्री धर्मशाळा बांधल्या . छोटी-मोठी रुग्णालय . नदीवर घाट . अन्नछत्र चालवणे . कुष्ठरोग्यांची सेवा करणे . असे अनेक समाजास उपयुक्त कामाचा सपाटा यांनी लावला होता .
मानव समाजातील उच्च बुद्धिमत्तेचे , सामान्य जनांच्या हिताचे जीवन जगलेले साधु-संत यांचे मार्गदर्शनात राहून गाडगेबाबांनी समाज सुधारणेचे काम त्यांचे तहहयात सुरू ठेवले होते . परंतु यांनी केलेली समाज सुधारणा ही पूर्वीच्या साधुसंतांनी सांगितलेले ग्रंथसंपदा वाचून , ग्रंथ पारायणे करून न करीता . तेच ज्ञान तोच सार पण इतरांवर प्रत्यक्षात असर होईल . लक्षार्था सोबतच प्रात्यक्षिक पणे ठासून लक्षात राहील . अश्या कणखर कठोर परिश्रमाच्या द्वारे समाज सुधारणा केल्या .
गाडगे बाबा सारखे निर्मोही निस्वार्थ जीव घडणे खरोखरच फारच कमी लोक अशा वृत्तीचे असतात . गाडगे बाबांनी बांधलेल्या धर्मशाळां मध्ये ते कधीही आराम करण्या करिता जात नसत . बांधकामाच्या समोर उघड्या जागेवर झाडा खाली त्यांचा वावर असायचा .त्यांचे मार्गदर्शनात लोकवर्गणीतून तयार झालेले धर्मशाळा – दवाखाने – शैक्षणिक संस्था या मध्ये त्यांनी स्वतःला व स्वतःचे परिवारातील सदस्याला कधीही घेतले नाही . त्यांचे स्वतःचे पत्नीला सुद्धा त्यांनी मिशन करिता मिळालेल्या वाहनां मध्ये प्रवासाची मुभा दिली नाही . इतका कठोर निस्वार्थी देश सेवा करणारा हा जीव म्हणजे खरोखरच निसर्गाची एक मोठी उपलब्धी होती .
भारत पुर्वापार सुसंस्कारी म्हणजे संस्काराने श्रीमंत . परंतु कलौघात समाजप्रबोधनाचे काम काही विशिष्ट जिवांना करावेच लागते . तेव्हा काळानुरूप प्रबोधनाची साहित्य व पद्धती बदलली पाहिजे . ती नेमकी या द्रष्ट्या समाज सुधारक गाडगे बाबा यांनी हेरली होती .

जय महाराष्ट्र – जय हिंद

अशोकराव घनोकार
नांदुरा
९७६३०५५०७१ .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here