
गिरीश पळसोदकर, जगदिश न्युज प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बुलढाणा माजी खासदार चिंचोली जहागीर गावचे सुपुत्र मा
.खा. सुखदेवराव नंदाजी काळे व त्यांचा मुलगा संतोष काळे महाराष्ट्र केसरी पैलवान सचिन काळे यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये भाजपा प्रदेश अध्यक्ष आ चंद्रकांत दादा पाटील,प्रदेश संघटन महामंत्री श्रीकांत भारतीय, भाजपा नेत्या पंकजाताई मुंढे राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस साहे
ब, प्रवीण दरेकर बुलढाणा जिल्हा अध्यक्ष आ. आकाश दादा फुंडकर आ
. संजय कुटे सौ आ श्वेताताई महाले
, यांच्या विशेष उपस्थिती मध्ये प्रवेश घेतला.

*भाजपने घाटावर राष्ट्रवादी ला खिंडार पाडत चिंचोली जहागीर गावचे सुपुत्र मा श्री सुखदेवराव नंदाजी काळे व त्यांचा मुलगा संतोष काळे महाराष्ट्र केसरी पैलवान सचिन काळे यांचा भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला, त्यांच्या प्रवेशामुळे घाटावरील भारतीय जनता पार्टी मध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून येत्या काळात घाटावर अनेक ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे कमळ घाटावर फुलल्या शिवाय राहणार नाही.
आघाडीच्या नाकर्ते पणामुळे जनता कंटाळली असून येत्या निवडणुकांमध्ये जनता महाविकास आघाडीला अद्दल घडवल्या शिवाय राहणार नाही असा विश्वास भाजप जिल्हाध्यक्ष आमदार ऍड आकाश फुंडकर यांनी यावेळी व्यक्त केला
.या जाहीर प्रवेशाच्या वेळी भाजपा बुलढाणा जिल्हा महामंत्री डॉ गणेश दादा मांटे, तोतारामजी कायंदे व भाजपा प्रदेश प्रवक्ता विनोद वाघ यांची देखील उपस्थिती होती
.

