
बाळासाहेब नेरकर, जगदिश न्युज प्रतिनिधी
अकोला-: स्थानिक अनिकट जवळ स्थित सरकारी बगीचा येथे अकोला पौरोहित्य संघांची सभा चैत्र नवरात्र देवी घटस्थापना मुहूर्त साठी संपन्न झाली. शनिवार 2 एप्रिल पासून चैत्र नवरात्र आरंभ होत आहे. शास्त्र आज्ञा आहे चित्रा नक्षत्र वैधृती योग मध्ये घटस्थापना करू नये. 2 एप्रिल शनिवार रोजी वैधृती योग सकाळी 08:29वाजून पासून दिवसभर राहील. अशा परिस्थितीत अभिजित मुहूर्त मध्ये घटस्थापना करण्याची आज्ञा आहे. हा मुहूर्त भगवान शिव चा प्रिय मुहूर्त आहे.
अभिजित मुहूर्त-:2 अप्रेल शनिवार रोजी दुपारी12:02 ते12:50 पर्यंत राहील. या शिवाय वैधृती योग आरंभ होण्याच्या पूर्व
शुभ वेळेत घटस्थापना-: सकाळी07:48 ते08: 29 पर्यंत घटस्थापना करू शकता.
याशिवाय सामाजिक रीतिरिवाज चलन कुलपरंपरा अनुसार ही घटस्थापना करता येते, असा शास्त्र मत आहे.
शास्त्र प्रमाण साठी महाराष्ट्रीयन पंचांग, सम्राट पंचांग, निर्णयसिंधु, रुद्रयामल ग्रंथ, व्रतराज इत्यादी ग्रंथांचा आधार घेऊन मुहूर्त निश्चित करण्यात आले.
सभेत सर्वश्री पंडित रमेश अडीचवाल , राजू सुरोलिया, प्रमोद तिवारी, गौरव व्यास, विमल व्यास, श्याम सुंदर अवस्थी, एवम पंडित रवी कुमार शर्मा उपस्थित होते.