शेतकऱ्यांनी वीज बिल भरणा बाबत संवेदनक्षम असावे !

0
40

जय जिजाऊ

वीज बिले न भरणे किंवा वेळेत न भरणे . ही शेतकऱ्याची झालेली मानसिकता त्यांना आणखीच तोट्यात घेऊन जात आहे .शेतकऱ्यांना असे वाटते की बिल न भरल्या मुळे त्यांना फायदा होतो . परंतु तसे नाही ! ज्या क्षेत्रा मध्ये विद्युत मंडळास वसुली कमी होते . तेथे हे मंडळ विज कमीत कमी वितरित करते . याचा फटका शेतकऱ्यांचे काही मुले लघु उद्योग चालवणाऱ्यांना सुद्धा विज पुरेसे मिळत नाही .त्या मुळे त्यांच्या लघु उद्योगातून तयार होणारा माल वेळेत तयार होत नाही . शेतकऱ्यां विषयी कळकळ असुन सुद्धा नाईलाजाने ग्राहकांना तोच माल शहरातील उद्योगांना मार्फत घ्यावा लागतो . एक प्रकारे शेतकरी स्वतःच स्वतःच्या प्रगती मध्ये असा अडथळा निर्माण करतो आहे . शेतकऱ्यांत ही प्रवृत्ती निर्माण होण्या करिता राजकारण्यांनी त्यांना भ्रमित केले आहे .
शेतकऱ्यांनी या गोष्टी कडे का लक्ष केंद्रित करू नये की , कुठलाही व्यावसायिक – व्यापारी – उद्योजक केव्हाही वीज बिल भरण्यास कुचराई करत नाही .कारण वीज नसेल तर त्यांची कमाईचा थांबून जाणार . हे त्यांनी लक्षात घेतलेले असते . भलेही हे लोक वीज बिलाचा भरणा करताना , जास्त बिल आले असेल तर , मुदत संपण्या अगोदरच त्याचे रीतसर हप्ते पाडून घेऊन ; त्यांच्या सवलतीने वीज बिल भरत राहतात . परंतु भरतात मात्र जरूरच . शिवाय वीज मंडळाला सुद्धा यांचे कडून बिल भरणा येण्याची पूर्ण खात्री असते . म्हणून अशा ठिकाणी भार नियमन लागू न करता , यांना सतत वीज पुरवठा केला जातो . शेतकऱ्यांनी सुद्धा विज बिल भरण्याची मंडळास पूर्ण खात्री करून दिल्यास , येथे सुद्धा चोवीस हि तास वीजपुरवठा होऊ शकेल . इतकी वीज निर्मिती होत आहे .
एखाद्या सेवेचा लाभ घेतल्या नंतर , किंवा एखाद्या वस्तूचा उपयोग घेतल्या नंतर , त्या बद्दल दाम न देणे . परतफेड न करणे . हे खरोखरच व्यवहार्य वाटते काय ? नक्कीच नाही ! तेव्हा वीज मंडळा कडून वापरलेली वीज , या बाबतचा चुकारा न करणे . या बद्दल शेतकऱ्यांनी खरंच चिंतन करावे . शेतीतून मिळणारे उत्पन्न या विषयी निश्चिती नसते . कारण ते सर्वस्वी निसर्गावर अवलंबून असते . तेव्हा झालेल्या नापिकी करिता ,दुष्काळ सदृश्य स्थिती करिता विज बिल न भरणे किंवा मंडळास वेठीस धरणे . असे केल्याने शेतकऱ्यांचे झालेले नुकसान खरंच पूर्ण पणे भरून निघते का ? तर नाही असेच उत्तर येईल ! भलेही शेतकऱ्यांनी उशिरा बिल भरावे . हप्ते पाडून बिल भरावे . परंतु बिल भरण्या विषयी मंडळास साशंकता निर्माण होईल , अशी वर्तणूक मात्र आता बदलावी .
वीज बिल भरणा न करण्या बाबत शेतकऱ्यांची एकच ओरड असते की , आम्ही १२ महिने विज वापरत नाही . तेव्हा मंडळाने दिलेले बिल खूप अवाजवी जास्त व अन्यायकारक आहे . तेव्हा आपले म्हणणे तज्ञ व्यक्ती कडून रेखांकित करून पूर्ण समूहाने त्या एका डीपी वरील सर्व शेतकऱ्यांनी कार्यालयीन भाग म्हणून रीतसर त्यांचे म्हणणे संबंधित अधिकाऱ्या कडे मांडावे .असे करताना धमकी च्या स्वरूपात नाही तर व्यवहाराच्या – कराराच्या भाषेत स्वतःची अडचण मांडवी .तसेही ही हे आता विद्युत जोडणी हंगामी सुद्धा देत आहेत . तेव्हा आवश्यकता नसेल तर अशा वेळी वीज मंडळात सूचित करून तात्पुरता वीज पुरवठा बंद करण्या बाबत नियोजन बद्ध सूचना द्यावी . त्या मुळे शेतकऱ्यांना सुद्धा नाहक भुर्दंड बसणार नाही व वीज मंडळात सुद्धा बिल आकारतांना नेमकेपणा येईल .
शेतकरी बांधवांनो तुम्ही जे पिकविता . ते जसे सकल राष्ट्रीय उत्पादनाचा भाग आहे . तसेच विज सुद्धा राष्ट्रीय संपत्ती आहे . तेव्हा एका राष्ट्रीय उत्पादकाने वापरत असलेली राष्ट्रीय संपत्ती विज , या विषयी संवेदनाक्षम असणे नितांत साखळी बुद्ध आहे . गरजेचे आहे . तेव्हा वेळीच विज बिल भरून तुम्ही एकाच वेळेस राष्ट्रीय संपत्ती , तुमच्या कडून उत्पादित होत असलेले सकल राष्ट्रीय उत्पन्न , तसेच ग्रामीण परिसरात असलेले तुमच्याच पैकी कुणी लावलेले ग्रामीण लघुउद्योग ; यांना सुद्धा पूर्ण वेळ वीज उपलब्ध करून देण्या करिता अप्रत्यक्षपणे तुमची मदत होत असते . म्हणूनच शेती हा भारताच्या उन्नतीचा पाया म्हटला आहे . पायाच जर डळमळीत असेल . निती – नियम – संयम – संहिता सोडून वागत असेल तर इतरां विषयी सांगण्याचे कारणच राहत नाही .

जय महाराष्ट्र – जय हिंद

अशोकराव घनोकार
नांदुरा
९७६३०५५०७१ .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here