
बाळासाहेब नेरकर, जगदिश न्युज प्रतिनिधी, अकोला
संत गजानन महाराज यांच्या पावन स्पर्शाने पवित्र संत गजानन महाराजांचे परमभक्त स्वर्गीय बच्चू लाल अग्रवाल यांनी स्थापन केलेल्या 117 शताब्दी या मंदिरात रामनवमी उत्सव निमित्त 2 एप्रिल ते 14 एप्रिल गुरुवार पर्यंत विविध धार्मिक अध्यात्म भजन कीर्तन प्रवचन अभिषेक कार्यक्रम आयोजित केल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष सौभाग्यवती सुमन देवी अग्रवाल यांनी दिली.
अकोला शहरातील प्राचीन तसेच जागृत संत महात्म्यांचा आशीर्वाद प्राप्त मोठ्या राम मंदिरात रामनवमी उत्सव निमित्त मुंबईतील सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. सौभाग्यवती युगंधरा प्रकाश वीरकर यांच्या मधुरवाणीत दोन एप्रिल शनिवार ते 12 एप्रिल पर्यंत सायंकाळी आठ ते दहा प्रभू रामचंद्राच्या साक्षात दरबारात राम कथा व विविध अध्यात्मावर प्रवचन कीर्तन कार्यक्रम होणार आहे.
तसेच 2 एप्रिल रोजी सकाळी गुढीपाडव्यानिमित्त सकाळी साडेसात वाजता ध्वज निशान तोरण लावण्याचा कार्यक्रम होणार आहेत तसेच 3 एप्रिल रोजी सकाळी नऊ ते दहा अकरा राधे-राधे सत्संग मंडळ तर सायंकाळी चार ते सहा श्री जानकी वल्लभ मातृशक्ती जागरण समिती सत्संग भजन कार्यक्रम होणार आहे. चार एप्रिल रोजी सकाळी फडके नगर येथील गायत्री महिला भजन मंडळ सायंकाळी चार वाजता सुंदर कांड श्री राधे राधे भजन मंडळ महिला भजन मंडळ पदावली भजन मंडळ जानकी वल्लभ अभिरुची महिला मंडळ तसेच दहा तारखेला वा रस्ता श्री राम नवमी निमित्त राम जन्मोत्सव गोपाल का भजन तसेच राम मंदिर परिसरात पालखी दर्शन सुंदर कार्ड एकादशी कीर्तन तसेच गुरुवार 14 एप्रिल रोजी दुपारी भव्य भंडारा भंडारा महाप्रसाद कार्यक्रम होणार आहे. विजय अग्रवाल विनायक शांडिल्य गुरुजी कल्याण शेवटी या , शहा हेमंत शर्मा आदी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले तसेच रामनगर मित्र मंडळ रामनगर दुर्गा मित्र मंडळ श्रीराम हरीहर संस्था चे कार्यकर्ते श्री रामनवमी उत्सव साजरा करणार आहे