वेळ प्रसंगी तोंडात चघळा खट्टा-मिठ्ठा संत्रा गोळ्या ! कारण बाहेर आहे भयंकर उन्हाळा !!

0
174

जय जिजाऊ

मानवाच्या अशास्त्रीय ढवळा-ढवळ वृत्ती मुळे नैसगिक वातावरणात असमतोल तयार झाला आहे . ठळक तीन मोसमाचा भारत देश आता मात्र संमिश्र मोसमा चा झाला आहे . तसेच मोसमांचे आगमन पहिल्या वेळेपत्रका पेक्षा उशिराने बेमौसम होत आहे . अगदी हिवाळा संपल्यावर सुद्धा उन्हाळ्यातील काही दिवसात थंडी वाजणे . मध्येच पाऊस येणे . ढगाळ वातावरण राहणे . हे प्रकार होत आहेत . एकूणच तिनही मोसम मध्ये अशीच काहीशी स्थिती झालेली आहे .

हिवाळा संपल्या नंतर सकाळी बाहेर फिरायला निघणे बऱ्या पैकी जास्तीत जास्त संख्येने सर्वांचे सुरू होते . दिवसभर शारीरिक कष्ट नसल्या मुळे शरीराच्या हालचाली व्हाव्या म्हणून सकाळी लवकर उठून सायकलिंग करणे . पायी चालणे , धावणे व जिथे स्विमिंग टॅंक किंवा नैसर्गिक नदी तलाव आहेत . तेथील लोक पोहायला जातात . हे पोहायला मिळणारे लोक नशिबवान समजावे .कारण यांना सर्वात जास्त फायदा होतो . तेव्हा सर्वसाधारण पायी चालत असताना , हिंदू संस्कृती प्रमाणे आयुर्वेदात सांगितल्या प्रमाणे निंबाच्या काडीने दात घासणे . तसेच चैत्राच्या पहिले नऊ दिवस नवरात्रात निंबाचा कोवळा पाला पाला खाणे . या नुसार काही लोक कोवळ पाला खाने , दातून करणे . हा प्रकार सुद्धा रस्त्याने करतात . परंतु उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि प्रदूषणा मुळे वातावरणात झालेली अशास्त्रीय ढवळा-ढवळ पाहता . तसेच वाहनांच्या संख्येत झालेली वाढ . सर्व दूर काँक्रिटीकरण . या मुळे दिवसभर तापलेली जमीन – सडका – काँक्रीटची घरे थंड होत नाहीत . रात्री खूप उशिरा पर्यंत उष्ण वात चालू असतो . या वरील सर्व कारणां मुळे मानवाच्या शरीरावर सुद्धा विपरित परिणाम होतो . म्हणजे शरीरातील पाणी कमी होणे . एखाद्या वेळेस साखर कमी होणे .नाही फार काही तर अचानक घशाला कोरड पडणे . घसा ठणठणीत कोरडा होणे . इतरही प्रकारचे कमी जास्त प्रकार होऊ शकतात . अशा वेळेस आहे त्या ठिकाणावर पाणी / साखर मिळेलच असे होत नाही . तेव्हा खिशात सहज ५ – ७ संत्राच्या खट्टा-मिठ्ठा गोळ्या असल्यास त्या चघळत राहिल्यास बऱ्या पैकी प्रथमोपचाराचे काम करून जातील .
आज ता .१३-४-२०२२ ला सकाळी नेहमीप्रमाणे उठून तयार होऊन ५ १५ ला बाहेर फिरायला निघालो . प्रथम ३ कि.मी. सायकलिंग केली . बायपास जवळ सायकल पार्क करून नवीन तयार होत असलेल्या बायपास ने पुढे ३ कि.मी. पायी चालत निघालो . सर्व काही अगदी व्यवस्थित होते .उत्साह होता . नंतर शेवटी थांबून तिथे निंबाचा पाला खाऊन दातून करत असताना अचानक डोळ्यां मध्ये ( तिरडे पणा / भेरके पणा ) वेगळ्याच प्रकारचे वाटायला लागले . शिवाय हाता-पायातील थोडी ताकदही कमी वाटायला लागली व डोके गरगरायला लागले तेंव्हा माझे नेहमीचे सवयीप्रमाणे अगदी त्याच वेळेस खिशात चाचपडून पाहतो तर संत्रा च्या गोळ्या नव्हत्या . तेव्हा मोकळ्या रस्त्यावर येऊन हायवेच्या बाजूला बसावे असे वाटले . परंतु विचार आला ही पातळी जर जास्त खालावली आणि बसल्या जागी तोल गेला तर इतर फिरणाऱ्यांना हे शवासन करीत आहेत . असे वाटून ते निघून जातील .जसे आजकाल जुन्या भाषेत सांगावयाचे झाल्यास एखाद्या मानवास फिट ( आकडी) येऊन जर दातखिळी बसली व तो रस्त्याचे कडेस पडला तर खर्‍या माहिती अभावी म्हणतात ,, जाऊ द्या ! अशीन कोणी पच्चीस !! असे मनोमन म्हणून पुढचा रस्ता धरतात.

अशा प्रकारे मनोमन विचार करीत रस्त्याने हळूहळू चालत वापस निघालो . चालतांना तोल गेला तर ते पाहणारे लोक मदती करता येतीलच याची खात्री नव्हती म्हणून चालत राहिलो . तोंडात असलेला कडूपणा शक्यतोवर बाहेर काढून टाकण्याचा प्रयत्न करत होतो . तसेच लांब श्वास घेऊन बाहेर टाकताना ठसक्याच्या स्वरूपात घशातून बाहेर टाकत होतो . असे साधारण अर्धा किलो मीटर केल्या नंतर थोडे बरे वाटायला लागले . मी वैद्यकीय जाणकार नाही . परंतु एकूणच निंबाचा पाला खाता बरोबर झालेले बदल , या वरून माझे हे ठाम मत झाले की कदाचित शुगर ची लेवल अगदी तंतोतंत असेल व त्यात वरून लिंबाचा कडू पाला खाल्ल्या मुळे शरीरावर विपरीत परिणाम झाला . त्यांनेच कदाचित साखर पातळी खालावली .
केवळ हे माझे मत आहे ! परंतु ज्या अर्थी तोंडातील कडूपणा घालवण्या करिता मी केलेले प्रयत्न , जास्तीत जास्त थुंकून बाहेर टाकण्याचा केलेला प्रयत्न , लांब श्वास घेऊन बाहेर श्वास टाकताना ठसका बसल्यागत बाहेर हवा फेकणे . एकूणच कडूपणा निघून गेल्या नंतर मला बरे वाटायला लागले . तेव्हा मला आलेला आजचा सकाळचा अनुभव आपणा सर्वां समोर ठेवलेला आहे . तसेच वैद्यकीय दृष्टीने हे बरोबर की चूक मी सांगू शकत नाही . परंतु मी मांडलेले माझे वैयक्तीक मत माझ्या करिता तरी आज तंतोतंत लागू झाले . तेव्हा सर्वांनी सकाळीच नाही तर , केव्हाही घराच्या बाहेर पडताना खिशा मध्ये खट्टा मीठा संत्राच्या गोळ्या असू द्या ! एवढेच निदर्शनात आणून द्यावयाचे आहे . तसेच कडुनिंबाच्या पाला खावे किंवा नाही ?! हे वैयक्तिक पातळीवर परखून – तपासून घ्यावे .
सुचना : – हे माझे मत आहे .वैद्यकशास्त्र आधारित खरे खोटे मला माहित नाही . प्रत्येकाने स्वतंत्रपणे स्वतःला काय लागू होईल .ते पाहावे .

जय महाराष्ट्र – जय हिंद .

अशोकराव घनोकार
नांदुरा
९७६३०५५०७१

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here