
सौ. सरिता प्रकाश बावस्कार
शिक्षिका – अजित इंटरनॅशनल स्कूल नांदुरा.
☎️- ९०९६०२०६४४
राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा.
नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याहि देशा.
मंगल देशा पवित्र देशा, महाराष्ट्र देशा.
प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा.. देशात कोरोनाने हैदोस घातला असताना संपूर्ण देशाला दिशा देण्याचं काम महाराष्ट्र राज्य करीत आहे. महाराष्ट्राने हे कर्तव्य थेट शिव काळापासून बजावलं आहे. म्हणूनच आपण अभिमानाने म्हणतो 'दिल्लीचे ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा', अशा ह्या माझ्या महाराष्ट्राची निर्मिती १ मे १९६० रोजी झाली, त्यावेळेस मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा म्हणून हा संघर्ष पेटला होता.या संघर्षात जवळपास १०५ जणांनी आपल्या प्राणांची आहुति दिली. तेंव्हा कुठे हे महाराष्ट्र राज्य उभं राहिलं. १ मे हा महाराष्ट्र दिन असला तरी तो जागतिक कामगार दिन सुद्धा आहे. आणि नोंद करावी अशी बाब म्हणजे महाराष्ट्राच्या निर्मितीत ज्यांनी फार मोठं योगदान दिलं ते गिरणी कामगार आणि शेतमजूरच होते. महाराष्ट्र दिनासोबतच आंतरराष्ट्रीय कामगार दिना मागची कथा आपण जाणून घेतलीच पाहिजे. औद्योगिक क्रांतीनंतर जगभरातून मुख्यत पाश्चिमात्य जगतात रोजगार मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होऊ लागले. कामगारांकडे काम होतं, मात्र त्यांची पिळवणूक सुरु होती.कोणत्याही हक्कापासून वंचित असलेल्या कामगारांना १२ तास १४ तास काम करावं लागत असे. जगभरातील कामगार आठ तासाच्या कामाच्या दिवसाची मागणी करू लागले होते. या संदर्भातील पहिली मागणी २१ एप्रिल १८५६ रोजी ऑस्ट्रेलियातील कामगारांकडून आली तेव्हापासून हा दिवस तेथे सुट्टी म्हणून जाहीर झाला. ऑस्ट्रेलियातील कामगारांच्या मार्गाने जात अमेरिका आणि कॅनडातील संघटनांनी १ मे १८८६ रोजी मोर्चे आणि धरणे यांची मालिका सुरु केली.अमेरिकेतील कामगार त्यांच्या हक्कांसाठी एकजूट झाले आणि त्यांनी उठाव केला. जगभरात याचे तीव्र पडसाद उमटू लागले. अशाच एका मोर्चाला पांगवताना ४ मे १८८६ रोजी शिकागोमध्ये सहा आंदोलनकर्त्यांचा मृत्यू झाला. याची परिणती पोलिसांच्या क्रूरतेविरोधातील एका मोठ्या निषेधात झाली. त्यात एका अज्ञात व्यक्तीने पोलिसांवर बॉब टाकला. ज्यात ८ पोलिसांचा मृत्यू आणि ५० पोलीस जखमी झाले. एवढ्या संघर्षानंतर अखेर कामगारांची कामाची वेळ ८ तास निश्चित करण्यात आली. कामगारांच्या लढ्याच्या शिकागोतील घटनेच्या स्मरणार्थ १९८९ मध्ये पॅरिसमध्ये भरलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेत रेमंड लेविन यांनी १ मे १८९० रोजी आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून साजरा करण्याची मागणी केली.त्या परिषदेत १ मे १८९० हा जागतिक कामगार एकता दिवस म्हणून साजरा करण्याचे
निश्चित झाले आणि १८९१ च्या दुसऱ्या परिषदेत या कार्यक्रमाला औपचारिक रित्या प्रतीवार्षिक कार्यक्रम म्हणून मान्यता देण्यात आली.म्हणुन त्यानंतर १ मे हा कामगार दिन म्हणून साजरा केला जाऊ लागला. या दिवशी जगातील ८0 देशांमध्ये सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात येते.
भारतातील पहिला कामगार दिन तत्कालीन मद्रास शहरात १ मे १९२३ रोजी पाळण्यात आला. “लेबर किसान पार्टी ऑफ हिंदुस्थान” या संघटनेने हा दिवस पाळला होता. याच दिवशी भारतात सर्वप्रमथ लाल बावटा वापरण्यात आला. कामगार नेते सिंगरवेलू चेत्तीअर यांनी कामगार दिन कार्यक्रमाच्या आयोजनात पुढाकार घेतला होता. मद्रास उच्च न्यायालयासमोरील जागेत हा दिवस साजरा झाला होता.
आता खरंच श्रम म्हणजे काय असा विचार आपण केला तर “श्रम म्हणजे कुठलं तरी ध्येय प्राप्त करण्यासाठी व्यक्ती जे शारीरिक, बौद्धिक कष्ट किंवा मेहनत घेणे” त्याला एका अर्थाने काम किंवा कार्य पण म्हणतात.श्रम करण्यामागे कुठलं तरी ध्येय मिळवण्याचा विचार असतो. जर मोबदल्याची अपेक्षा असेल त्या कार्याला पण श्रम म्हणू शकतो. जर कुठल्याच मोबदल्याची अपेक्षा नसेल तर ते कार्य श्रम म्हणाले जाऊ शकत नाही.
जीवनात काहीही साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतात. कठोर परिश्रमांवर विश्वास ठेवणारे लोक आयुष्यात कधीच अपयशी ठरत नाहीत, ते आपल्या आयुष्यात इच्छित लक्ष्य प्राप्त करू शकतात. आपल्या देशातही बाहेरील देशांमध्ये असे अनेक शोध अस्तित्वात नव्हते, पण आपल्या देशातील सर्व आविष्कार करण्यासाठी आज आपल्या देशाने परिश्रम घेतले आहेत. आणि हळूहळू आपला देश आपल्या परिश्रमांच्या बळावर पुढे जात आहे.श्रम ही मानवी अस्तित्वाची मूलभूत आणि अपरिहार्य स्थिती आहे. श्रमामुळे माणूस प्राण्यांच्या साम्राज्यातून बाहेर पडला. प्राण्यांच्या विपरीत, माणूस स्वतःचे जग निर्माण करतो, आणि स्वतःच्या श्रमाने ते निर्माण करतो. माणसाने निर्माण केलेले वातावरण, त्याच्या अस्तित्वाची परिस्थिती हे संयुक्त श्रमाचे परिणाम आहेत. श्रम प्रक्रियेत, भौतिक आणि आध्यात्मिक मूल्ये तयार केली जातात, जी समाजाच्या सदस्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी डिझाइन केलेली असतात. हे आम्हाला श्रमाचे पहिले आणि सर्वात महत्वाचे सामाजिक कार्य म्हणून गरजा पूर्ण करण्यास अनुमती देते, ज्याद्वारे एखाद्या व्यक्तीचे सामाजिक अस्तित्व सुरू होते. समाजाचा आर्थिक विकास भौतिक मूल्यांच्या निर्मितीवर आधारित आहे. जो केवळ लोकांच्या उद्देशपूर्ण सर्जनशील क्रियाकलापांमुळेच शक्य आहे. श्रम प्रक्रियेत, एखादी व्यक्ती, श्रमाच्या साधनांच्या मदतीने, श्रमाच्या वस्तुमध्ये पूर्वनियोजित बदल घडवून आणते, म्हणजे. जिवंत श्रम, सामग्रीमध्ये भौतिक रूपांतरित होते, ज्यामुळे ही सामग्री बदलते. उत्पादन प्रक्रियेचे तीनही घटक साहित्य, श्रमाचे साधन आणि श्रम अंतिम परिणामात विलीन होतात श्रमाचे उत्पादन अशा मध्ये श्रम सामान्य दृश्यशाश्वत, नैसर्गिक स्थितीशिवाय दुसरे काहीही नाही मानवी जीवन हे कोणत्याही विशिष्ट संस्थेपासून स्वतंत्र आहे. कोणत्याही सामाजिक आर्थिक निर्मितीमध्ये आणि राजकीय रचनासमाज, श्रम सामाजिक उत्पादनाचा घटक म्हणून त्याचे महत्त्व टिकवून ठेवतो. आर्थिक सिद्धांत उत्पादनाचे तीन घटक वेगळे करतो: जमीन, श्रम आणि भांडवल. शिवाय, जमीन आणि भांडवल हे श्रम एकत्र केले तरच असे उत्पादन शक्य आहे. केवळ श्रम क्रियाकलापांच्या प्रक्रियेत नैसर्गिक आणि भौतिक संसाधने भौतिक मूल्यांमध्ये रूपांतरित होतात. श्रमाशिवाय जमीन आणि भांडवल उत्पादनाचे घटक म्हणून त्यांचे महत्त्व गमावून बसतात.श्रम हा प्रमुख घटक म्हणून ओळखला जातो आणि भौतिक पदार्थावरील प्रभावाच्या सक्रिय स्वरूपामुळे आणि मानवी वैयक्तिक तत्त्वाच्या उपस्थितीमुळे इतर दोनपेक्षा वेगळे आहे.श्रम क्रियाकलाप लोकांद्वारे चालविला जातो आणि म्हणूनच श्रम सामाजिक-ऐतिहासिक परिस्थितीचा ठसा उमटवतात. उत्पादनात सुधारणा देखील मोठ्या प्रमाणात श्रम, त्याच्या उत्पादकतेत वाढ आणि त्यातील सामग्रीची गुंतागुंत यामुळे होते. नफ्याच्या पातळीसह संघटनांच्या सामान्य कामगिरी निर्देशकांवर श्रमाचा महत्त्वपूर्ण प्रभाव पडतो. शेवटी, नियोक्त्याचे कल्याण अर्थव्यवस्था संपूर्ण समाज है श्रमाच्या कार्यक्षमतेवर अवलंबून असते.श्रम, सामाजिक संपत्ती तयार करणे, सर्व काही अधोरेखित करते समुदाय विकास श्रमिक क्रियाकलापांच्या परिणामी, एकीकडे, बाजारपेठ वस्तू, सेवा, सांस्कृतिक मूल्यांनी भरलेली आहे ज्यासाठी एक विशिष्ट गरज आधीच विकसित झाली आहे, तर दुसरीकडे, विज्ञान, तंत्रज्ञान आणि उत्पादनाची प्रगती होते.नवीन गरजांचा उदय आणि त्यानंतरचे समाधान, याव्यतिरिक्त, वैज्ञानिक आणि तांत्रिक प्रगती उत्पादकता आणि श्रम कार्यक्षमतेची वाढ सुनिश्चित करते.
श्रमाचे महत्त्व सामाजिक उत्पादनातील त्याच्या भूमिकेपुरते मर्यादित नाही. अध्यात्मिक मूल्येही श्रम प्रक्रियेत निर्माण होतात. सामाजिक संपत्तीच्या वाढीसह, लोकांच्या गरजा अधिक जटिल होतात, सांस्कृतिक मूल्येलोकसंख्येचा शिक्षणाचा स्तर वाढत आहे. अशा प्रकारे, श्रम हे घटकांपैकी एकाचे कार्य करते सामाजिक प्रगती आणि समाजाचा निर्माता. शेवटी, श्रम विभागणीमुळे समाजाचे सामाजिक स्तर आणि त्यांच्या परस्परसंवादाचा पाया तयार होतो.
मराठी भाषिकासाठी महाराष्ट्र राज्याची निर्मिती व्हावी ही संकल्पना लोकमान्य टिळक यांनी १९०६ साली मांडली होती. १९१९ साली कॉंग्रेसच्या जाहीरनाम्यात लोकमान्य टिळक याच्या अध्यक्षतेखाली या संदर्भातील ठराव नमूद करण्यात आला होता. पण असं असलं तरी कालांतराने महाराष्ट्र राज्याची वेगळी निर्मिती व्हावी याला कॉंग्रेसमधूनच विरोध होत गेला.
१३ एप्रिल १९४७ रोजी झालेल्या अकोला करारअंतर्गत असा ठराव करण्यात आला की महाराष्ट्र एकीकरण परिषद महा विदर्भ, मराठवाडा, बॉम्बे आणि उर्वरित महाराष्ट्र याच्या एकत्रीकरणासह संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी कार्यरत राहील.काही महिन्यातच भारत स्वतंत्र झाला.अखंड भारत देश ही संकल्पना अस्तित्वात आली, संस्थाने खालसा करण्यात आली. १९५३ साली तेलगु भाषिकांसाठी आंध्र प्रदेश राज्याची निर्मिती करण्यात आली. संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीकडे मात्र दुर्लक्ष होत गेले. १९५५ च्या दरम्यान डाव्या पक्षांनी बॉम्बे(मुंबई) बंदचा इशारा दिला, त्याला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला होता. २१ नोव्हेंबर १९५५ रोजी डाव्या पक्षांनी काढलेल्या मोर्चावर हुतात्मा चौक इथं अमानुष लाठीचार्ज आणि गोळीबार कारण्यात आला. यात शेकडो जण जखमी झाले तर १०५ जणांचे प्राण गेले.
या घटनेनंतर संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन चिघळलं.६ फेब्रुवारी १९५६ रोजी केशवराव जेधे यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन करण्यात आली. यामध्ये आचार्य अत्रे, प्रबोधनकर ठाकरे, सेनापती बापट, शाहीर अमर शेख यांचा समावेश होता. यानंतरच्या काळात सर्वांनीच आपआपल्या क्षेत्रातून काँग्रेस सरकारच्या धोरणावर घणाघाती हल्ला करायला सुरुवात केली. डाव्या पक्षांच्या कामगार संघटनांच्या साथीने एक मोठी चळवळ उभी राहिली. पण, सरकार मात्र मानायला तयार नव्हतं. नेहरू सरकारच्या दुटप्पीपणाच्या धोरणाला विरोध करत तत्कालीन केंद्रीय अर्थमंत्री सी. डी. देशमुख यांनी तत्काळ आपल्या पदाचा राजीनामा दिला. जनतेचं उत्स्फूर्त आंदोलन आणि राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन अखेर २१ एप्रिल १९६० रोजी लोकसभेत संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीला मान्यता देण्यात आली आणि १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती होऊन, मुंबई (बॉम्बे) महाराष्ट्राची राजधानी म्हणून घोषित करण्यात आली. अशा रीतीने महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली.
“जो मेहनतीने त्रासाला दूर करतो
रक्त आणि घाम गाळण्यासाठी जो मजबूर असतो
तो प्रत्येकजण ‘मजदूर’ असतो
सर्व कामगार व वाचकांना कामगार दिवसा सोबतच महाराष्ट्र दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!”
सौ. सरिता प्रकाश बावस्कार
शिक्षिका – अजित इंटरनॅशनल स्कूल नांदुरा.
☎️- ९०९६०२०६४४
