पवन आगरकर, शहर प्रतिनिधी जगदिश न्युज
नांदुरा शहरातील सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रेय करांगळे यांनी महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला ३० एप्रिल पासून नांदुरा तालुका भूमीअभिलेख कार्यालयातील कामचुकार व दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाईच्या मागणीसाठी बुलढाणा मा जिल्हादंडाधिकारी यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केलेले आहे.
मा जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की नांदुरा येथील मा उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील मुजोर व कामचुकार कर्मचाऱ्यांच्या विरोधात मा जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय बुलढाणा यांच्या कार्यालयात दि ०१/११/२०२१रोजी माझ्या वडिलांनी त्यांची तक्रार सर्व पुराव्यानिशी दिलेली होती या कार्यालयात वारंवार व सातत्याने पाठपुरावा करुनही अद्यापही कुठलीही कार्यवाही करण्यात आलेली नाही तालुका भूमीअभिलेख कार्यालयातील तत्कालीन मुख्य सहाय्यक एच कातडे यांनी अतितातडीच्या प्रकरणात दि १२/०८/२०२१ते २०/०९/२०२१पर्यंत आमचा मोजणी अर्ज घेण्यास आमची सतत टाळाटाळ केली तसेच जन माहिती अधिकारी संदिप टिकार या कर्मचाऱ्याने सुद्धा अतितातडीच्या प्रकरणात मोजणी फि चे चलाण देण्यास आमची दि २०/०९/२०२१ते ०४/१०/२०२१पर्यंत एकूण १४दिवसांची अडवणूक केली होती तरी या कर्मचाऱ्यांवर (दफ्तर दिरंगाई)व शिस्तभंगाची कार्यवाही करण्याबाबत दि ०१/११/२०२१रोजी स्थानिक कार्यालय प्रमुखांकडे रितसर तक्रार केली होती मात्र संबंधित कार्यालय प्रमुख तथा चौकशी अधिकारी पि एस पाटील यांनी सुद्धा आपल्या मुजोर कर्मचाऱ्यांची पाठराखण करीत कातडे व टिकार हे कर्मचारी दोषी असल्याचे पुरावे देऊनही त्यांनी खोटा व दिशाभूल करणारा अहवाल या कर्मचाऱ्यांच्या संगनमताने बनवला त्यामुळे आम्हाला न्याय मिळू शकला नाही जोपर्यंत दोषी अधिकारी व कर्मचारी यांच्या वर नियमानुसार कारवाई होत नाही तोपर्यंत माझे उपोषण चालूच राहिल असे दत्तात्रय करांगळे यांनी सांगितले आहे