मातृभाषा जगा ! तुलनेत इतर भाषा फक्त जपा !!

0
56

🚩जय जिजाऊ🚩


नाही तरी शिक्षण विकत घ्यावे लागत आहे ! तेव्हा भारतातील प्रत्येक भाषिकांनी त्यांचे मातृभाषेतील शिक्षण , त्यांचे पाल्यांना अवगत होण्या करिता , त्यांचे भाषीय स्तरावर एक सामाजिक उपक्रम म्हणून राबवावा .भारतात खूप सार्‍या भाषा बोलल्या जातात .भारतीयांच्या मूळ भाषा समृद्ध आहेत . परंतु आजच्या सर्वच भारतीय नागरिकांचे दुर्दैव अस आहे की , या देशात सरकार कोणाचेही येवो . परंतु सर्वांची नीती फक्त आणि फक्त इंग्रजी भाषेची चाटू गिरी करणे . इंग्रजी माध्यमांच्या शाळा चालविणे . या पली कडे यांची अक्कल आता पाजळत नाही .तेव्हा प्रत्येकाने मातृभाषा जपण्या करिता म्हणून त्यांच्या पाल्यांना त्यांचे स्तरावर मातृभाषेचे धडे द्यावेत .समाजातून वर्गणी जमा करून भाषा तज्ञांचे मानधन द्यावे व सुंदर भारतीय भाषांचे जतन करावे . भाषा समृद्धी करिता ती जगावी - बोलावी लागते . आपण भारतीय मात्र आपल्याच भारतीय भाषा न जगता , आता इंग्रजी भाषेत जगायला लागला आहे . पदोपदी बोलायला लागला आहे .आपापली भाषा कमी इंग्रजीत जास्त बोलायला लागले आहे . आज पन्नाशीतील किंवा पुढील पिढी किती तरी इंग्रजी शब्दांचा वापर करूनच संभाषण करीत आहेत . तेव्हा कल्पना करा ,आपण आपली पाल्ये जी मागील पंधरा वर्षा पासून कॉन्व्हेंट मध्ये पाठवत आहोत . त्यांना खरोखरच भारतीय भाषा - मातृभाषा कशी अवगत होईल . यांना दहा रुपये समजत नाहीत . तर टेन रुपीज म्हणावे लागते . सफरचंद समजत नाही , एप्पल म्हणावे लागते . नात्यागोत्यातील बारकावे समजत नाहीत . सर्व नाते अंकल आणि आंटी मध्ये समाप्त करतात . गोड शब्द आई बाबा च्या ऐवजी मम्मी पप्पा डॅड म्हणून सर्व संस्कृतीचा मुडदा पाडतात . आजची तयार झालेली इंग्रजी मानसिकतेची पिढी , याला जबाबदार ही पिढी नसून ; यांना घडवणारे पालक जबाबदार आहेत . इंग्लिश कॉन्व्हेंट चा भपका - त्यांची खोटी चमक धमक व त्यांचे शाळेतील मोठ मोठे कार्यक्रम पाहून , सर्वसामान्य भारतीय येथेच फसलेत . तसेच इंग्रजी भाषा आली म्हणजे जगात कुठेही त्याला जाता येईल . या अविचारी अविवेकी वागणुकी मुळे देखा देखी एकाचे पाहून दुसरा , दुसऱ्याचे पाहून चौथा . असे करीत करीत गावेच्या गावे इंग्रजी कॉन्व्हेंट कडे आकर्षित होत गेली . त्या मुळे इतर प्रांतीय भाषांची सरकारी शाळेतील विद्यार्थी संख्या रोडावत गेली . पर्यायाने शासनाला त्यांचे वर्ग त्यांच्या काही ठिकाणच्या तर पूर्ण शाळा बंद कराव्या लागल्या . तसे ही शासनाला आता शासकीय खर्चातून शाळा चालवण्या मध्ये रस उरलेला नाही . पूर्वीच्या शासकीय शाळा शासन खर्चातून चालविल्या जायच्या . तसेच काही सामाजिक बांधिलकी - उत्तरदायित्व म्हणून काही समाज सुधारक सेवाभाव जपणारे व समाजाला उन्नत करण्या करिता तळमळ असणारे लोक एकत्र येऊन मंडळाच्या स्वरूपात पूर्ण शासकीय कार्यप्रणाली प्रमाणे व शासनाचे अर्थसहाय्याने शाळा चालवायचे .या मध्ये सर्व प्रथम प्रांतीय भाषांना अग्रक्रमाने शिकवले जायचे . महत्व असायचे . तसेच विना खर्चाने सर्वांचे शिक्षण होत असायचे . परंतु इंग्रजी कॉन्व्हेंटच्या फसव्या जाहिराती तसेच विद्यार्थ्यांना आखीव-रेखीव आकर्षक गणवेश , अशा दिखाऊ कारणां मुळे इंग्रजी कॉन्व्हेंट वाल्यांनी लोकांचा लोंढा त्यांचे कडे वळवून घेण्यास पूर्ण यशस्विता प्राप्त केली . त्याचा परिणाम सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या कमी कमी होत गेली . आज भारतीय मुले मग ती देशाच्या कुठल्याही काना कोपऱ्या मध्ये जन्माला येऊ देत . त्यांना त्यांचे बालवया पासूनच इंग्रजी शब्दांचे फव्वारे अंगा खांद्यावर पडत आहेत . अगदी ॲ ॲ ॲ करणाऱ्या त्या नवजात बालका चा सहवासात असणारे लोक , त्यांच्या मातृ भाषेत कमी , इंग्रजीत जास्त बोलत असतात . इतकेच काय त्या बालकाला सर्वात प्रथम जर काही उच्चार ऐकावे लागत असतील तर ते भारतीय अबकड - संस्कृतीचे बोल - श्लोक - भजन - प्रार्थना न ऐकवता सरळ एबीसीडी - झेड पर्यंत त्याच्या कानात रिचवली जाते शिरवली जाते . त्याचे बोबडे बोल यांची सुरुवातच इंग्रजीच्या मुळाक्षरा पासून सुरु केले जातात . तेव्हा या विदेशी इंग्रजी भाषेच्या वापरा करिता जबाबदार ही नवीन पिढी धरणे ; म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असाच काहीसा प्रकार होईल ! " दैव देते कर्म नेते ",असाच काहीसा कर्मदरिद्री पणा - करंटेपणा आजच्या हयात असलेल्या बुजुर्ग पिढी कडून घडलेला आहे . तो म्हणजे अस्सल भारतीय शिक्षण प्रणालीचे भारतीय भाषांचे शिक्षण देणारे शाळां मध्ये मुलं न टाकता . अवाच्या सव्वा खर्च भरून त्यांना इंग्रजी शाळेत टाकत राहिल्या मुळे आज ही स्थिती तयार झालेली आहे . भाषा ही शिकण्याची गोष्ट नाही तर भाषा जगण्याची गोष्ट आहे .जसे की जन्माला आलेले बालक ज्याला अक्षर सुद्धा बोलता येत नाही . त्याला पूर्ण भाषा बोलता येणे . ती सुद्धा कोणीही न शिकविता येणे , म्हणजेच त्याचे भोवती असलेले वातावरणातील लोकांचे बोल सतत त्याच्या कानावर आदळत राहिल्या मुळे तसेच बोलणारांचे हावभाव व ओठांची हालचाल हे सतत त्याचे निरीक्षणात आल्या मुळे , तो अजाण बालक ती भाषा बोलायला लागतो . लहान मुलांना पोपटपंची एबीसीडी - इंग्रजी कवितांचे कित्ये गिरवून , त्यांच्या तोंडून ते वदवून घेणे किंवा तो तसे बोलायला लागला म्हणजे चार चौघात नाक वर करून मोठ्या ऐटीत सांगणे .पाहा पाहा आमचा जॉनी ( नावे सुद्धा विदेशी ठेवणे आता प्रतिष्ठेचा भाग आहे .) कसा ABCD म्हणतो . Johny Johny Yes Papa म्हणतो . rain rain go away म्हणतो . स्व . राजीवजी दिक्षीत यांनी या इंग्रजी कविता कशा भारत विरोधी आहेत . या बद्दल त्यांचे व्याख्यानातून त्यांनी वेळोवेळी सांगितले आहेच . भारतात पाणी यावे , या करिता कविता आहेत ," येरे येरे पावसा " . ज्या देशातून ही संस्कृती ही शिकवण आली .तेथे नेहमी पाऊस पडत असतो . त्या मुळे तेथील मुलांना ते त्या पावसाला जायला सांगतात . मग आपण सुद्धा तसेच म्हणणे म्हणजे मेंढीपळण च्या पुढचे झाले आहे . एकंदरीतच आजचे संवेदनाहीन शासन -राज्यकर्ते , भरकटलेले नेते . हे जेवढे भारता मध्ये इंग्रजी कॉन्व्हेंट , पदोपदी इंग्रजी भाषेचा वापर , इंग्रजी शब्दांचा जास्तीत जास्त बोल बच्चन करणे ला जेवढे जबाबदार आहेत . या पेक्षाही जास्त जबाबदार हा भारतातील प्रत्येक प्रोढ नागरिक आहे . आज जेवढे म्हणून भारतीय प्रोढ नागरिक आहेत .ते या बाबत खरे गुन्हेगार म्हणावे लागतील . अगदी निर्बुद्धपणे त्यांनी इंग्रजी भाषा ऊरा पोटावर घेण्यास सुरुवात केली होती . त्याचे परिणाम आज दिसत आहेत .सुरुवातीला श्रीमंतांची धनिकांची शेठ सावकारांची पोरे एक शोक म्हणून इंग्रजी कॉन्व्हेंट मध्ये दाखल झालीत. त्यांचे अंधाअनुकरण करित अगदी जुजबी कमाई असणारे पालक सुद्धा पोरग इंग्रजी कपड्यात गोंडस दिसते म्हणून , " इयाचा खिया , खियाचे चात ", ( विळ्याचा रुपांतर खिळा करणे , नंतर त्या खिळ्याचे पुन्हा रुपांतर करणे ) करून मुलांना त्यांना , यांच्या खिशाला न परवडणाऱ्या इंग्रजी शाळांमध्ये दाखल करणे सुरू करून टाकले . इंग्लिश कॉन्व्हेंट या शासकीय खर्चाच्या भरोशावर नसल्या मुळे यांनी यांची मनमानी सुरू केली . भरमसाठ पैसे उकळणे व एकमेव इंग्रजी भाषा शिकवणे या पलीकडे त्यांना जाण्यास कोणीही बाध्य करू शकत नव्हते .परिणाम आज भारतीय मग तो मराठी , गुजराती , राजस्थानी , पंजाबी , कानडी , मल्याळी , तेलगू , बंगाली , सिंधी , काश्मिरी या काही प्रमुख भाषां सह काही उपभाषा व आदिवासी भाषांना मुकून बसला . या प्रकारे भाषेच्या बाबत आजची नवीन पिढी , " घर की ना घाट की ", अशा स्थिती मध्ये येऊन पोहोचली आहे . धड मातृभाषा ही नाही धड इंग्रजी सुद्धा नाही . तिसरीच भाषा भारतातील प्रत्येक तरूण आता बोलत आहेत .तेव्हा पुन्हा प्रत्येकाने त्यांची मातृभाषा त्यांच्याच मुलांना समजावी , बोलली जावी , ती भाषा त्यांनी जगली पाहिजे . या करिता प्रत्येक भाषिकांनी त्यांचे सामाजिक स्तरावर एकत्र येऊन .त्यांचे भाषेतील तज्ञ लोकां कडून , त्यांचे पाल्यांना खाजगी शिकवणी द्वारे शिकवण्यास पुन्हा सुरुवात करावी . यातच सर्व भारतीय भाषिकांचेची हित राहील . असे वेगळे सांगण्याची गरज नसावी . गुजरात्यांना गुजराती येत नाही . राजस्थान्यांना त्यांची भाषा येत नाही . सिंधींना सिंधी भाषा येत नाही . महाराष्ट्रीयन मुलांना मराठी येत नाही . उत्तरेतील - दक्षिणेतील भारतीयांना त्यांची त्यांची भाषा येत नाही . वास्तविक पाहता मातृभाषे ची खडानखडा माहिती - प्रभुत्व असेल . तर याच्या तुलनेत इतर भाषा समजून घेतल्या जाऊ शकतात व तेच योग्य ठरते . म्हणून मातृभाषा जगा इतर भाषा जपा .

जय महाराष्ट्र – जय हिंद .

अशोकराव घनोकार
नांदुरा
९७६३०५५०७१ .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here