श्री गुरुदेव सेवा आश्रम नांदुरा येथे बाल सर्वांगीण सुसंस्कार शिबिराचे थाटात प्रारंभ !

0
121

रोषण आगरकर, ऊपसंपादक, जगदिश न्युज

परमपूजनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली, विदर्भाचे वैभव असलेले भूमी म्हणजे, श्री गुरुदेव सेवा आश्रम नांदुरा,
गेल्या 41 वर्षा पासून संस्कार महर्षी आचार्य हरिभाऊ वेरुळकर गुरुजी यांच्या मार्गदर्शनात सुरू असलेल्या श्री गुरूदेव सर्वांगिण सुसंस्कार शिबिराचे उदघाटन मा.तहसीलदार राहुल तायडे साहेब यांच्या शुभ हस्ते पार पडले, कार्यक्रम च्या अध्यक्ष स्थानी नांदुरा नगरपरिषद चे मुख्याधिकारी डॉ आशिष बोबडे साहेब हे होते तसेच प्रमुख पाहुणे नांदूरा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रवीण डवंगे, आय एम ए चे डॉ. राजेंद्र गोठी, लॉयन्स क्लब ज्ञानगंगा चे डॉ.संदीप डवंगे हे होते, श्री गुरुदेव सेवा आश्रम नांदुरा, च्या वतीने गेल्या 41 वर्षा पासून या सुसंस्कार शिबिराच्या माध्यमातून देशाची सुसंस्कृत आदर्श माणसे घडविण्याचे काम सुरू आहे, आता पर्यंत लाखो विद्यार्थी हे शिबिराच्या माध्यमातून सुसंस्कारीत झाले असून अविरत पणे हे कार्य सुरू आहे, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, तसेच आंध्रप्रदेश च्या काही भागात असे एकूण 62ते 65 ठिकाणी ही शिबिरे सुरू असून जवळपास 5 हजार विद्यार्थी या शिबिराच्या माध्यमातून सुसंस्काराचे धडे घेत आहेत या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद वेरुळकार यांनी तर आभार प्रदर्शन अनंत वडोदे यांनी केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here