विजय पोहनकर बोलतोय..!
भ्रमणध्वनी 9579141618 (जळगांव, जामोद )
मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा रेल्वे गेट हे दिवसातून 16 ते 17 बंद असतं. रेल्वे ची प्रचंड वाढलेली वाहतूक बघता गाडी निघून गेल्यावर फक्त 2 ते 3 मिनिटं हे फाटक उघडल्या जाते.बहुतेक वेळा रस्त्यावरील वाहने पूर्ण फाटक पार न करताच गेट बंद होते.करोना च्या नावाखाली आजही गोरगरीब जनतेच्या पॅसेंजर 3 गाड्या बंद आहेत सोबत आझाद हिंद गाडी,शालिमार एक्सप्रेस व 22 मालगाड्या रद्द आहेत.ही पूर्ण क्षमतेने जेव्हा वाहतूक सुरू होईल तेव्हा हे गेट किती काळ बंद राहील हे मोठं कोड आहे.
या उड्डाणपुलाचे राजकारण गेली कित्येक वर्षे मतदान देऊन जात.नांदुरा शहरातील जनतेला प्रचंड त्रास असलेली ही सर्वात मोठी समस्या आहे.या उड्डाणपुलाचे उद्घाटन 1 नोव्हेंबर 2015 ला नामदार नितीनजी गडकरी ह्यांच्या शुभ हस्ते तत्कालीन जिल्हाधिकारी ह्यांच्या उपस्थितीत शासकीय कार्यक्रम घेऊन पार पडला.त्यानंतर माती परीक्षण हे जवळपास 6 महिने झाले त्यावर उड्डाणपुलाचे नकाशे बनविण्याचे काम पूर्ण झाले ते 15 मार्च 2017 पूर्ण झाले.त्यानंतर हे काम का थांबले त्यात काही राजकारण आहे का? हे जनतेला आजही कळलं नाही.विशेष बाब म्हणजे 2014 ला मानव रहीत रेल्वे गेट ही संकल्पना भारत भर काम करत असताना नांदुरा रेल्वे गेट वर उड्डाणपुलाचे काम सुरू होऊन बंद का झाले? ह्यावर आवाज उठवल्या गेला नाही.गेली 7 वर्ष कोणीच ह्यावर बोलत नाही. ह्या बंद राहणाऱ्या गेट मुळे नांदुरा,जळगांव (जामोद) तालुक्यतील अनेक रुग्ण वेळेवर उपचार न मिळू शकल्याने दगावलीत. ह्या गंभीर विषयावर अखिल भारतीय किसान सभेच्या कमिटीने लक्ष देण्याची जबाबदारी स्वीकारली त्याप्रमाणे 14 मार्च 2022 ला उपविभागीय अधिकारी जळगांव (जामोद)ह्यांच्या मार्फत केंद्रीय रेल्वे मंत्री ह्यांना निवेदन पाठविले.त्यांचा प्रतिसात न आल्याने अखेर 5 मार्च 2022 ला नांदुरा रेल्वे गेट जवळील पूजनीय डॉ बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या पुतळ्या जवळ बेमुदत धरणे आंदोलन सुरू केलं.पंचक्रोषीत असलेल्या सर्व जनतेचा,पत्रकार बांधवांचा उत्तम प्रतिसाद लाभला.मनसे, शिवसेना,राष्ट्रवादी, वंचित बहुजन आघाडी,भाजप, स्वाभिमान शेतकरी संघटना, ह्या राजकीय पक्ष पदाधिकारी ह्यांनी या ज्वलंत विषयावर समर्थन दिले. अखंडित 5 दिवस हे धरणे भर उन्हात सुरू होते.ह्या काळात अनेक कार्यकर्ते आजारी पडले,कॉम्रेड दादा रायपुरे ह्यांना उन्हाचा जोरदार फटका बसला,मात्र,आंदोलनात कार्यकर्त्यांची कमी पडली नाही.माननीय चैनसुखजी संचेती ह्यांनी पहिल्या दिवसापासून ह्या आंदोलनाची दखल घेतली.त्यांनी नामदार गडकरी साहेब ह्यांच्या सोबत किसान सभेच्या पदाधिकारी समोर चर्चा करून दिली.किसान सभेच्या कॉम्रेड जितेंद्रकुमार चोपडे, कॉम्रेड अनिल गायकवाड,कॉम्रेड विजय पोहनकर ह्या 3 सदस्यांना दिल्ली येथील रेल्वे मंत्रालय व राष्ट्रीय महामार्गाच्या संयुक्त बैठकीच्या वेळी या उड्डाण पुलाच्या काम करिता आमंत्रित केलेले आहे म्हणुन आंदोलन तुर्ततास स्थगिती करण्याची विनंती केली.कॉम्रेड दादा रायपुरे ,संचेती साहेब ह्यांच्या विनंतीला मान देत अखिल भारतीय किसान सभेने 5 व्या दिवसाच्या सायंकाळी हे आंदोलन आश्वासक विनंती वरून मागे घेण्यात आल्याची सर्व माहिती पत्रकार बांधवांना देऊन सर्व जनतेचे आभार मानत आंदोलन तूर्त स्थगित केले आहे.उड्डाणपुलाचे काम भविष्यात सुरू न झाल्यास किसान सभा हा विषय पुन्हा ऐरणीवर घेईल ह्यात दुमत नाही.
तूर्त एवढेच.
आपला संपादक
विजय विमल सहदेवराव पोहनकर
जळगांव (जामोद) जिल्हा बुलढाणा (मातृतीर्थ)
10 मे 2022