होमीभाभा बालवैज्ञानिक स्पर्धेत परितोष शैलेश तुपकरीला सुवर्णपदक  !

0
24

कैलास काळे, जगदिश न्युज प्रतिनिधी, मलकापुर
नारायण विद्यालयातील ९वी व ICAD- फाउंडेशनचा विद्यार्थी परितोष शैलेश तुपकरी याने ग्रेटर बॉम्बे सायन्स टीचर्स असो.तर्फे दरवर्षी घेण्यात येत असलेल्या डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा २०२१-२२ चे सुवर्णपदक पटकावले. ही स्पर्धा तीन फेऱ्यांमध्ये घेतली जाते., सिद्धांत परीक्षा, प्रात्यक्षिक आणि प्रोजेक्ट व मुलाखत. विद्यार्थ्यांनी तिसऱ्या फेरीत इम्युनिटी बूस्टरचा विषय म्हणून ऍक्शन रिसर्च प्रोजेक्ट तयार करणे अपेक्षित होते. परितोषनी कोविड-19 समस्यांचा सामना करण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्यांचा अतिवापर आणि सुचविल्या गेलेल्या विविध उपायांवर एक प्रोजेक्ट तयार केला होता. या प्रोजेक्टवर आधारित मुलाखत घेण्यात आली.
इंजिनिअर व वैज्ञानिक होऊन पुढे देशसेवा करण्याचे मानस असलेला परितोष ह्या यशाचे श्रेय शिक्षकांना, पालकांना,आजी व आजोबा डाॅ रामभाऊ तुपकरी यांना देतो. या आधी त्याला विविध विषयांमध्ये खुपदा बक्षिसे मिळाली आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here