शेत जमिनीला मिळत आहे भरमसाठ भाव ! शेतकर्‍यांनी कष्ट करून पिकविलेला माल मात्र विकल्या जात आहे बेभाव !!

0
61

🚩जय जिजाऊ🚩

शेती विकत घेऊन शेतमाल उत्पादन करणे , याचा मात्र आज तळा मेळ बसत नाही ! कारण शेतीचे भाव गगनाला भिडलेले आहेत . तेच त्या मध्ये पिकणारे मालाचे भाव मात्र जमिनीत गाडून घेण्या सारखे आहेत .बरेच वेळा तर उत्पादन खर्च सुद्धा निघत नाही . तेव्हा वर्षभर त्या शेतीच्या भरवशावर संसार चालवणे कसेच शक्य होत नाही . शेतीतून मिळणारे उत्पन्न हे जास्तीत जास्त निसर्गाच्या कृपेवर अवलंबून असलेल्या पैकी आहे . सोबतच शेती करणारा शेतकरी याचे अंगात किती पाणी आहे . याचा सुद्धा शेती उत्पादित मालावर परिणाम पडतो .
शेतीला जमीन सुद्धा म्हणतात . तेव्हा जमिनीतून मिळणारे उत्पन्न जमले तर खूप जमते , नाही तर काहीच जमत नाही ! याला कारणे सुद्धा तशीच असतात . पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती . आणि प्रत्येक जण अंग मेहनती होता . खरा शेतकरी होता . त्या मुळे शेती काम करण्या करिता भाडोत्री मनुष्य बळ लागण्याचा प्रश्नच नव्हता . तेव्हा काही कारणाने झालेली नापिकी किंवा पिकल्यावर सुद्धा योग्य मूल्यांकन न मिळाल्या मुळे झालेले नुकसान , या विषयी फारसा धक्का बसत नव्हता . कारण काढलेले पूर्ण पिक त्या परिवाराच्या अंग मेहनतीची असायचे .तसेच बी बियाणे सुद्धा घरीच प्रक्रिया केलेले असायचे . प्रत्येक शेतकऱ्याच्या दावणीला खंडी दोन खंडी पशुधन असायचे .यांच्या शेतात असल्या मुळे खत मुताचा वेगळा खर्च लागत नव्हता . शेता मध्ये संमिश्र पिकांची उत्पन्न घेण्याची पद्धत होती .भाजी भाकरी ची सोय या मधून स्व मेहनतीने भागायची . पूर्ण भारतीय आयुर्वेदिक पद्धतीचे प्रमाणे शेतकऱ्याचे जीवन जगणे आपोआपच व्हायचे .या करता सुद्धा खर्च लागत नव्हता .
आता मात्र विभक्त कुटुंब पद्धती मुळे सर्वच्या सर्व कामे मजूर लावून किंवा यांत्रिकी खर्च करून करावे लागत आहेत . आता जवळपास ८० टक्के शेती करणारांनी अंगमेहनतीची कामे करणे बंद केलेले आहे . सर्व कामा करिता यांत्रिक तसेच मजूर लावून काम करून घेणे . हा शेती चा भाग झाला आहे . शेतीच्या वाटणी मुळे क्षेत्रफळ प्रत्येकी छोटे होत गेलेले आहे . म्हणून पशुधन कुणा कडेही दिसत नाही . त्या मुळे शेतीला आवश्यक असलेले खत मूत भेटणे बंद झालेले आहे . या वर उपाय म्हणून नगदी पैसा देऊन रासायनिक खत व किटक नाशके शेती मध्ये वापरले जात आहे . ज्याचे दुष्परिणाम शेती मध्ये उष्णता वाढणे या दिशेने होत आहे . तसेच शेतात सतत यंत्र चालवल्या मुळे शेतीचा भुसभुशीत पणा जाऊन जमीन कडक पडत चाललेली आहे . सततच्या या अघोरी वापरा मुळे , पुन्हा शेतीचे उत्पन्न कमी कमी उत्पादीत होत आहे . अशातच शासनाने त्यांचे चांगभले होण्या करिता , दुसऱ्या देशातून आयात केलेल्या माला मुळे स्थानिक शेतकऱ्यांना भाव मिळेनासे होतात . अगोदरच उत्पादन कमी . त्यातही भाव कमी . त्यातही हा नकली शेतकरी हे तुटपुंजे उत्पादन काढण्या करिता पारिवारीक मनुष्यबळ नसल्या मुळे , मजूर लावून व यंत्राच्या साह्याने शेती करण्याच्या केलेल्या नकली खटाटोपा करिता खिशातून असली खर्च करून बसलेला असतो . एकंदरीत पाहता नकली शेती केल्या मुळे आता शेतीतील आलेले उत्पन्न कधीही भरघोस फायद्याचे ठरत नाही . झालाच तर फारच जुजबी फायदा ; नाही तर तोटाच जास्त होत असतो .
शेती ही फक्त अंग मेहनत करणाऱ्या शेतकऱ्यां कडेच असावी . तोच त्याचा मालक . हा नियम जर तयार केला गेला तर , आज नकली शेतकरी यांना यांचे हे पद सोडण्यास भाग पडेल . शेतीचे अवास्तव भाव वाढण्या करिता असली शेतकरी जबाबदार नाहीत तर नकली शेतकरी जबाबदार आहेत . कारण भारताच्या आयकर खात्याच्या नियमा नुसार शेतीतील उत्पन्न करपात्र समजले जात नाही . म्हणून येथील सर्वच व्यावसायिक – व्यापारी – उद्योगी – नोकरवर्ग – करोडोची कमाई असणारे सेलीब्रेटी (कलाकार ) यांनी मिळणारे उत्पन्न लपविणे . या करिता नाम मात्र शेतकरी होण्याचे पात्र वठवले आहे . खऱ्या शेतकऱ्याला अंग मेहनतीने पिकवणाऱ्या शेतकऱ्याला उत्पन्न व्होवो न व्होवो . या नकली शेतकऱ्यांना दर वर्षी लाखो रुपयांचे उत्पन्न शेती मधून मिळाल्याचे हे कागदोपत्री दाखवत असतात . अशा प्रकारे दुसऱ्या मार्गाने कमावलेला पैसा शेतीतील उत्पन्न दाखवून , तो कर पात्र नाही . हे ठरविण्यात पास होतात .
खऱ्या शेतकऱ्याला वडिलो पार्जित शेती परवडत नाही . तेव्हा हे नकली शेतकरी यांना अव्वाच्या सव्वा भाव देऊन , यांचे कडील शेती विकत घेतात व भारतीय कायद्या प्रमाणे शेतकरी सिद्ध होतात . परंतु याचे दुष्परिणाम आज शेतीचे भाव अवास्तव वाढलेले आहेत . गगनाला भिडलेले आहेत . खऱ्या शेतकऱ्याला किंवा प्रामाणिकपणे शेती घेऊन शेतीतील उत्पन्न काढतो म्हटले तर ते मात्र आता या शेतीच्या वाढलेल्या भरमसाठ भावा पुढे हेलकावे – झोले खातांना दिसत आहे . १० लाख ते कोटी रुपया पर्यंत एकरी भाव शेतीचे देऊन . त्या मधून दरवर्षी मिळणारे उत्पन्न सर्व काही ठीक असले तरी सुद्धा काही हजारां पर्यंत मिळते . या करिता सुद्धा तो शेती करणारा व्यवहार चातुर्य , दूरदृष्टी पणा , स्वतः मेहनत करणारा किंवा शेती करून घेणारा असेल तरच ही सर्कस चालू राहते अन्यथा ” पृथ्वी आहे गोल तिचं काय मोल ” . अस होत आहे .
वाणिज्य नियमा प्रमाणे प्रत्येक वस्तूची किंमत तिच्या उपयोगीते नुसार , तिच्या कडून मिळणाऱ्या फायद्या नुसार ठरलेली असते किंवा ठरते . याला अपवाद फक्त शेत जमीन हीच दिसते ! कारण शेतीतून मिळणारे उत्पन्न पाहता शेतीच्या आजच्या दिसत असलेल्या किमती ह्या खरोखरच शेती करणाऱ्या असली शेतकऱ्यांना परवडणाऱ्या आहेत का ?! याचे भान आज पर्यंत भारतात सरकार म्हणून आलेल्या कुठल्याही पक्षाला या वर विचार करण्याचे महत्त्व वाटू /पटू नये . ही सर्व भारतीय खऱ्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने दुर्दैवाची बाब म्हणावी लागेल .

जय महाराष्ट्र – जय हिंद .

अशोकराव घनोकार
नांदुरा .
९७६३०५५०७१

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here