आदिवासींच्या जमिनी हडपल्या प्रकरणी ६५ लोकांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश..!जमिनी हडपणाऱ्यांना तत्काळ तुरुंगात टाका.प्रशांत डिक्कर..!!

0
17

गिरीश पळसोदकर, जगदिश न्युज प्रतिनिधी,संग्रामपूर

राज्यभर गाजत असलेला भुखंड घोटाळ्यातील ६५ लोकांना आदिवासींच्या जमिनी हडपल्या प्रकरणी दि.२५ मे रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी मेहकर येथील राठोड यांनी दिले आहेत. तलाठी, मंडळ अधिकारी, व तत्कालीन तहसीलदार यांनी आदिवासींच्या शकडो एक्कर जमिनी परस्पर गैरआदिवासी लोकांच्या नावे केल्या असल्याचे निदर्शनास येताच स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी संबंधित विभागाकडे लेखी तक्रार दाखल करुन कारवाई करण्याची मागणी केली. तक्रार करुनही आदिवासी बांधवांना न्याय मिळत नसल्याने प्रशांत डिक्कर यांनी बरेच आंदोलनं केले. अखेर जिल्हाधिकारी यांनी दखल घेत या प्रकरणाची चौकशी सुरू केली,जिल्हाधिकारी यांनी ३० मार्च २०२२ रोजी उपविभागीय अधिकारी मेहकर यांना कारवाई संदर्भात मत जाणुन दोशीनवर कारवाई करण्याचे लेखी आदेश दिले असल्याने. जमिन हडपणाऱ्याची चांगलिच तारांबळ उडाली आहे. जो पर्यंत आदिवासी बांधवांच्या जमिनी परत मिळत नाहीत व जमिनी हडपनारे आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे परस्पर नावाने करुन देणारे अधिकारी तुरुंगात जात नाहीत तो पर्यंत हा लढा सुरूच राहणार असल्याचे प्रशांत डिक्कर यांनी सांगितले. संग्रामपूर तालुक्यातील जमिनी घोटाळा प्रकरणाची सुनावणी मेहकर येथे होत असल्याने याकडे जिल्ह्याचे लक्ष लागुन आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here