खामगांव तालुक्यातील अटाळी, पेडका , घारोड येथील १० शेतकऱ्यांना भूसंपादनाचे मिळाले २ कोटी ३६ लाख रु. चा मोबदला वितरित !

0
24

गिरीश पळसोदकर, जगदिश न्युज ,खामगाव

आ. अँड आकाशदादा फुंडकर यांचे प्रयत्नांना मोठे यश मिळाले असून 10 शेतकऱ्यांना सुमारे 2 कोटी 36 लक्ष रुपये भूसंपादनाचा मोबदला मिळाला आहे.त्यांचे शुभहस्ते आज शेतकऱ्यांना मोबदल्याचा धनादेश आ अँड फुंडकरांच्या शुभहस्ते वितरित करण्यात आला . खामगाव तालुक्यातील अटाळी, घारोड व पेडका येथे सन 2012 साली पाझर तलावाचे काम पूर्ण झाले. यावेळी कोणत्याही शेतकऱ्यांनी या कामासाठी अडथळा निर्माण केला नाही. परंतु त्या 10 शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला मिळालाच नाही.

यासाठी त्या शेतकऱ्यांनी वारंवार शासनाकडे आपले गाऱ्हाणे मांडले. परंतु त्याला यश आले नाही. नंतर त्यांनी सदर बाब आ अँड आकाशदादा फुंडकर यांचेकडे मांडली. त्याचा पाठपुरावा आ फुंडकरांनी शासनाकडे वारंवार केला. अधिवेशन काळात विधानभवनातही यासाठी आवाज उठविला. अखेर लालफितशाहित अडकलेला गोर गरिबांचा कष्टाचा पैसा आणण्यात आ फुंडकरांना यश मिळाले. तब्बल 10 वर्षानंतर अटाळी , घारोड व पेडका येथील दहा शेतकऱ्यांना जमीन भूसंपदानाचा 2 कोटी 35 लक्ष 85 हजार 28 रुपयांचा मोबदल्याचे धनादेश शेतकरी पुंडलिक महाले, भोनाजी मुंडे, मोतीराम महानकर, नबीखा सत्तारखा मु. , राजाराम थोरात, मो. जावेद. शे. रसूल, शे. नबी शे. हबीब, शे. हबीब शे .दस्तगिर, सहदेव साबळे व सलुखाबाई ज. बळीराम गवई यांना आज आ अँड फुंडकरांचे शुभहस्ते वितरित करण्यात आले. आ अँड फुंडकरांच्या प्रयत्नामुळे तब्बल दहा वर्षांनी भूसंपदानाचा मोबदला मिळाल्याने सर्व शेतकरी आनंदी झाले. त्यांनी आ अँड फुंडकर यांचे मनोभावे स्वागत करून आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here