
गिरीश पळसोदकर,खामगाव खामगाव येथे सुरू असलेल्या द्वितीय वर्षाच्या स्वयंसेवकांचे अभ्यास पथ संचलन मंगळवार २४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६: ३० खामगाव शहरातील मुख्य मार्गावरून काढण्यात आले.अतिशय शिस्तबध्द पध्दतीने निघालेले पथ संचलन अनेकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले. विविध सामाजिक संघटनांकडून पथ संचलनात सहभागी झालेल्यांचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. विकमसी चौक, टिळक पुतळा, महावीर चौक, जगदंबा चौक, अग्रसेन चौक, शहर पोलिस स्टेशन, श्री गुरूद्वारा सिंघ सभा, बस स्थानक चौक मार्गे जे.व्ही.मेहता न्युईरा विद्यालयात या पथ संचलनाचा समारोप झाला.