NDRF द्वारा ओमसाई फाउंडेशन, नांदुरा च्या सदस्यांना प्रशिक्षण संपन्न !

0
56

रोषण आगरकर, ऊपसंपादक, जगदिश न्युज

केंद्रिय आपत्ती व्यवस्थापन प्रतिसाद दल (NDRF), तळेगांव पुणे यांच्यामार्फत आपत्ती विषयक प्रशिक्षण कार्यक्रम दिनांक 23/05/2022 रोजी पद्मश्री व्ही बी कोलते कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, मुक्ताईनगर रोड, मलकापूर येथे सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत पार पाडला. मलकापूरचे तहसीलदार मा. श्री सुरळकर साहेब यांच्या उपस्थितीत NDRF टीमचे प्रमुख श्री योगेश शर्मा यांनी प्रशिक्षण दिले. ओमसाई फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री. विलास निंबोळकार यांच्यासह पियुष मिहानी, आनंद वावगे, अश्विन फेरण, कृष्णा नालट ,किरण इंगळे, कमलेश बोके, श्रीराम निंबाळकर,विकी रामेकर, श्रीराम चोपडे,संघपाल तायडे, विवेक वानखेडे, सचिन पुंडे आश्विन कंढाळे,राजु बगाडे आदींनी प्रशिक्षणाचा लाभ घेतला. ओम साई फाउंडेशन, नांदुरा ही सामाजिक संस्था नेहमीच सामाजिक कार्यामध्ये अग्रस्थानी असते. विलास निंबोळकार यांनी जनसेवेचे व्रत घेऊन या संस्थेची स्थापना केली. आतापर्यंत यामाध्यमातुन अनेक गोरगरीब लोकांना मदत केली. रुग्णसेवा, तथा सामाजिक कार्यामध्ये नेहमीच अग्रेसर असल्याने जनतेच्या विश्वासास पात्र ठरलेली आहे.
NDRF द्वारे मिळालेल्या या प्रशिक्षणामध्ये अपघातग्रस्तांना व पूरग्रस्तांना मदत कशाप्रकारे करावी याचे प्रात्यक्षिकासह माहिती देण्यात आली. लवकरच आता पावसाळ्यास सुरवात होत आहे. पूरस्थितीचा धोका लक्षात घेता या प्रशिक्षणाची आवश्यकता होती. ओमसाई फाउंडेशनच्या स्वयंसेवकांनी प्रशिक्षण घेतल्यामुळे गरजूंना अधिक चांगल्या प्रकारे मदत करता येईल.

ओमसाई फाऊंडेशन चे सेवाभावी अध्यक्ष विलासभाऊ निंबोळकर, नांदुरा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here