Where is my train प्रमाणे where is my bus , ॲप महामंडळने विकसीत करावे !

0
31

🚩जय जिजाऊ🚩

तापलेल्या पाण्याची चव निघून जाते . असेच काहीसे म .रा .प . मंडळाचे म्हणजे एसटीचे – लालपरीचे झालेले आहे .महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून गल्लीबोळातून धावणारी सर्व सामान्यांची लालपरी ऊणेपुरे ६ महिने कर्मचार्‍यांच्या संपा मुळे एकाकी पडली होती .संप पुकारला तेव्हा कर्मचाऱ्यांना अपेक्षित होते की , प्रवासी रस्त्यावर उतरतील .महामंडळाच्या अधिकाऱ्यांना बसेस चालू करण्या करिता मीनत्या करतील . परंतु तसे काहीही झाले नाही . याला कारण आता रा .प . हे एकमेव प्रवासाचे साधन लोकां करीता राहिलेले नाही , पर्याय शोधले गेले . असे होण्याला दोन्ही कडून ही तशी परिस्थिती तयार झाली होती . महामंडळा कडून बसेस पाहीजे त्या वेळेवर न धावणे . पाहिजे तिथे न थांबवणे . प्रवाशांना त्यांचे सामान चढ-उतार करताना सहकार्य न होणे .
आवश्यक त्या ठिकाणावर डेपो न दिल्या मुळे करारावर घेतल्या जाणाऱ्या ST बसेस ऐवजी खाजगी बसेस तुलनेत स्वस्त पडू लागल्या होत्या . बसस्थानका वरील हमाल यांनी तर कहर करून सोडला होता .बरेच वेळा तर अगदी प्रवाशाने स्वतः सामानाची चढ-उतार केल्यावर सुद्धा बसेस च्या अधिकृत हमालांनी त्यांचा जणू काही जन्मसिद्ध अधिकार म्हणून पैसे वसूल केलेले आहेत . प्रवाशांची अशी ससेहोलपट सुरू असताना चालक – वाहक – नियंत्रक यांनी फक्त बघ्याची भूमिका घेतलेली दिसत होती . या अशा बर्‍याच गोष्टींचा उबग प्रवाशांना आला होता . तेव्हा नैसर्गिक पणे कुणीही अनावश्यक जाचा मधून बाहेर पडण्याचा , तसेच पर्यायी सुलभ मार्ग शोधण्याच्या प्रयत्नात सहजच खाजगी वाहतूकदारां कडे वळला गेला . जो पर्यंत एसटीला पर्याय नव्हता . तो पर्यंत लोकांनी हे सहन केले .
एक प्रकारे राज्य शासनानेच प्रवाशांना एसटीला पर्याय उपलब्ध करून दिला .तो म्हणजे टॅक्सी परमिट गाड्या . त्या मध्ये ३ / ४ चाकी सह मोठ्या बसेस सुद्धा काही विशेष नियमावली देऊन त्यांना प्रवासी वाहतुकी करिता मैदानात उतरवले .खाजगी प्रवासी वाहतुकदारांनी प्रवाशांची नेमकी नड ओळखली . त्यांना पाहिजे त्या ठिकाणावर वाहने थांबवून चढ-उतार करणे . यांचे कडील माल सामान स्वतः गाडी मध्ये ठेवून देणे – उतरवणे . सोबतच्या लहान मुलांचे पैसे न घेणे . जास्त संख्येने प्रवासी असतील तर , त्यांचे ठिकाणा वरून त्यांना घेऊन जाणे . तसेच सोडून देणे . या करिता कुठलाही अतिरिक्त दर न लावणे . ठरल्या वेळे नुसार झालेला थोडा फार उशीर , या बद्दल सुद्धा जास्तीचे पैसे न आकारणे . एकूणच एसटीचा हा क्लिष्टपणा खाजगी वाहतूकदारांनी मोडीत काढला .
STचे प्रवासी कमी होण्याला खाजगी प्रवासी वाहतूकदारां कडून असलेली सुसह्य सेवा इतकेच कारण नाही . तर सोबतच आता प्रत्येक नागरिकाचे जीवनमान पहिल्या पेक्षा उंचावले आहे .याचा एक भाग असा की वाहन नाही , असा परिवार आता पाहायला मिळत नाही . निदान बाईक / स्कुटी असे वाहन आता प्रत्येका कडे शेकडा ५० टक्के लोकां कडे उपलब्ध आहे . २० टक्के लोकां कडे स्वतःचे कार उपलब्ध आहेत .असे ७० टक्के लोक स्वतःच्या वाहनाने प्रवास करतात . तसेच १० टक्के लोक यांचे कडील वाहन उसने मागून प्रवास करतात . या कारणां मुळे सुद्धा एसटीचे प्रवासी विरळ झालेले आहेत . पूर्वी ५० किमीच्या प्रवासाला ५ घंटे लागले तरी लोकांना फरक पडत नव्हता . आता मात्र २ मिनिट सुद्धा वाट पाहणे . ही मानसिकता न राहिल्या मुळे ,मिळेल त्या वाहनाने प्रवास करणे होत आहे .
वाट न पाहण्याची वृत्ती , स्थानका वरील नियंत्रकास काही विचारले असता . सरळ भाषेत उत्तर न देण्याची त्यांची वृत्ती . या मुळे प्रवासी आता खाजगी वाहनाने प्रवास करतात .खाजगी वाहन धारक सुद्धा बरोबर बस येण्याच्या ५ मिनिट अगोदर संबंधित स्थानकाच्या इर्द-गिर्द थांबून प्रवासी पळवून नेतात . स्थानका वरील नियंत्रक तसेच इतर कर्मचारी या बद्दल कुठलीही कार्यवाही करीत नाहीत . जाणाऱ्या प्रवाशांची मनधरणी करीत नाहीत .अशा प्रकारे बस ला मिळणारे प्रवाशी कमी कमी होत जात आहेत . या वर उपाय म्हणजे ज्या प्रमाणे रेल्वेने where is my train / live train status सारखे ॲप विकसित केली आहेत . त्या ॲपच्या सहाय्याने प्रवासी स्वतःच्या मोबाईल नेट द्वारे गाडी विषयी प्रत्येक सेकंदाची माहिती मिळवू शकतो . त्या नुसार स्वतःची सोय करतो .
भारतीय रेल्वेने कौतुकास्पदच कामगिरी नेटच्या द्वारा , अगदी घराच्या कोंट्यातील नागरिकाला गाडीच्या स्थितीची माहिती पुरवली जात आहे . त्या मुळे रेल्वेने प्रवास शक्य असेल तर प्रथम पसंती रेल्वेला जाते . अर्थात रेल्वे सुद्धा मनमानी करीत आहे . याला एकमेव कारण , रेल्वेला पर्याय उपलब्ध नाहीत .जसे एसटीला उपलब्ध झालेत ! रेल्वे गाड्यां विषयी काही महत्त्वाचे बदल रेल्वे प्रवाशां कडून सुचविल्या जातात .ते रेल्वे अधिकारी व संबंधित मंत्रालय ऐकून सुद्धा घेण्याच्या मानसिकतेत नसतात . देशाच्या स्वातंत्र्या पासून रेल्वेच्या काही ठिकाणी वेळापत्रकात तर बऱ्याच ठिकाणी त्यांच्या धावण्याच्या दोन अंतिम स्टेशन मध्ये आज योग्य होतील असे बदल करणे . या करिता प्रवाशांच्या सुचना संबधीतांनी ऐकल्यास उत्पन्नात भर पडेल .
पूर्ण भारतभर आज अस्तित्वात असलेले रेल्वेचे मंडळ कार्यालये , साधारणत: यांचे दरम्यानच रेल्वे चालवल्या जातात . परंतु बरेच मंडळ कार्यालय अंतर्गत काही स्टेशन ठिकाण असे आहेत की ; जेथे मोठ्या प्रमाणात व्यापार , मोठमोठे दवाखाने , सर्व सुख सुविधा परिसरातील चार सहा जिल्ह्यातील नागरिकांना भेटत असतात . अशा सर्व गोष्टी या ठिकाणांवर उपलब्ध असतात . तेव्हा अशा रेल्वे स्टेशनला जाण्या करिता सरळ गाड्या उपलब्ध असतील तर प्रवाशांच्या सुखा सोबतच रेल्वेच्या उत्पन्नात कमालीची भर पडणार . परंतु रेल्वेला पर्याय उपलब्ध नसल्याने या खात्याचा अडेलतट्टूपणा व ही सर्व यंत्रणा राबवणारे पगारी कर्मचारी असल्या मुळे त्यांना रेल्वेच्या तोट्याचे काहीही वाटत नाही . म्हणून पुर्वी चालत आलेल्या रेल्वेच्या मार्गात हे बदल करीत नाहीत .
आज अस्तित्वात असलेले रेल्वेचे मंडळ कार्यालये , इंग्रजांनी त्यांच्या सोयीने त्या काळा करिता अनुकूल म्हणून निश्चित केली होती . परंतु काळा नुसार प्रत्येक गोष्टीत बदल होत असतो . तेव्हा आज धावत असलेल्या दोन मंडळा अंतर्गत रेल्वे गाड्यांना अगदी थोडे फार बदल करून चालविल्यास उत्पन्नात कमालीचा फायदा होईल .अगदी मंडळ कार्यालय असलेल्या स्टेशनच्या काहीच किलोमीटर पुढे गाडी नेल्यास मोठे व्यापारी शहरे – स्टेशन तयार झालेले आहेत . अशा स्टेशनवर त्या शहरातील मिळणाऱ्या सुख सुविधा व व्यापार वाणिज्यच्या दृष्टीने व्यापाऱ्यांची ये जा जास्त होत असते . परंतु कर्मचाऱ्यांचा निष्क्रिय पणा व रेल्वेला पर्याय नसल्या मुळे खात्याचा हेकेखोरपणा , हम करे सो कायदा . या मुळे सुद्धा रेल्वेच्या उत्पन्नात अडसर निर्माण झालेले आहेत .
परंतु एक दिवस रेल्वेला सुद्धा असा उगवेल की , यांना सुद्धा पर्याय उपलब्ध होईल . तो पर्याय म्हणजे हवाई वाहतूक ! विज्ञानाच्या द्वारे दिवसेंदिवस होत असलेली सर्वच बाबतीत प्रगती हवाई वाहतुकी करिता सुद्धा उत्कृष्ट कामगिरी करेन . असे हमखास सांगता येईल . ड्रोन प्रवासी वाहने व मालवाहू वाहने पुढच्या काहीच वर्षात अगदी सामान्य नागरिकांच्या हातात असतील . अगदीच छोट्या-छोट्या गाव वस्ती पर्यंत यांचे चलनवलन पाहायला मिळेल ही हवाई वाहतूक रेल्वेचा बराच गाशा गुंडाळून ठेवण्या करिता काम करेल . आज रेल्वेचे द्वारे होत असलेला मनमानी कारभार , प्रवाशांच्या उपयुक्त सूचना न ऐकणे . आवश्यक त्या स्टेशनवर रेल्वेला थांबा न देणे . खरे उत्पन्न देणाऱ्या स्टेशन पर्यंत गाड्या न चालवणे . या सर्व गोष्टीला रेल्वे निमूटपणे तयार होईल .
परंतु तो पर्यंत खूप उशीर झालेला असेल . जशी आज ST ची प्रतिमा प्रवाशांच्या दृष्टीने डागाळलेली आहे . तशी स्थिती रेल्वेची सुद्धा होईल . जेव्हा कमी अंतराच्या साठी सुद्धा हवाई वाहतूक उपलब्ध झाली म्हणजे आज असलेले रेल्वेची अकड पार जिरून जाईल . आज महत्त्वाचा मुद्दा ST ला पुन्हा प्रवासी मिळणे हे जेवढे महामंडळाला आवश्यक आहे . तेवढेच सामान्य नागरिकांना सुद्धा गरजेचे आहे . कारण परिवहन महामंडळ ग्रामीण भागा पर्यंत त्यांची देणारी सेवा लक्षात घेता खरोखर गरजेचे आहे . फक्त त्यांनी एकदा आज विज्ञानाच्या माध्यमातून मिळत असलेले सोईचे उपकरणे सर्व बसेस मध्ये लावून घ्यावेत . तसेच संबंधित यंत्रणेचा ॲप तयार करून सर्वांच्या मोबाईल मध्ये प्रगट व्हावे . असे झाले तर प्रवासी संख्या वाढेल व महामंडळ निश्चित फायद्यात येईल .

जय महाराष्ट्र – जय हिंद .

अशोकराव घनोकार
नांदुरा .
९७६३०५५०७१ .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here