एस.टी. बसमध्ये बसतांना दोन लाखांचे दागिने पळवले !

0
66

पंढरपूर :जिल्हा प्रतिनिधी

पंढरपूर बसस्थानकातून म्हसवडकडे निघालेल्या एसटीमध्ये प्रवेश करताना महिलेच्या पर्समधील लाख ९० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरट्याने पळवून नेले.. ही घटना सोमवारी दुपारी सव्वादोनच्या सुमारास घडली.

गावाला जात असल्यामुळे शीतल नामदेव मेटकरी यांनी त्यांच्याजवळील सोने पर्समध्ये ठेवले होते. दुपारी सव्वादोनच्या सुमारास पंढरपूर बसस्थानकातील प्लॅटफॉर्म नंबर १९ २० वरील तुळजापूर-सातारा जाणाऱ्या एसटी बसमध्ये शीतल व त्यांची मुले म्हसवडला निघून गेल्या. मात्र एसटी बसमध्ये चढत असताना कोणीतरी अज्ञात चोरट्याने माझ्या पर्सची चेन्न खोलून दागिने असलेली छोटी पर्स सोन्याच्या दागिन्यांसह चलाखी करून काढून घेतली. परंतु भीतीमुळे ही घटना घडल्या दिवशी त्यांनी पतीला दिवशी सांगितली नाही. परंतु दुसऱ्या दिवशी शीतल यांनी फोन करून तिचे पती नामदेव मेटकरी यांना सर्व प्रकार सांगितला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here