पद्मभुषण, तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी

0
36

तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी – यांचे संस्कृत भाषेवर प्रभुत्व होते, हिंदू धर्माचा त्यांनी सखोल अभ्यास केला होता. त्यांचा जन्म २७ जानेवारी १९०१ रोजी धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर येथे झाला.

वेद, उपनिषदे, रामायण, महाभारत इत्यादी शास्त्रांवर ते अधिकारवाणीने बोलू शकत. हिंदू तत्त्वज्ञान त्यांनी चांगल्या प्रकारे अवगत केले होते.
लक्ष्मण शास्त्री जोशी यांची ओळख मुख्यत: मराठी विश्वकोषाचे शिल्पकार’ अशी असली, तरी ती ओळख अपुरी म्हणावी लागले. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला अनेक पैलू होते थोर स्वातंत्र्य सैनिक, साहित्यिक, समाजसुधारक, हिंदू धर्माचे आणि संस्कृतचे गाढे अभ्यासक, अशी अनेक विशेषणे तर्कतीर्थांच्या नावापुढे लावणे शक्य आहे. त्याहीपेक्षा महत्त्वाचे बिरुद म्हणजे त्यांना मिळालेली तर्कतीर्थ’ ही पदवी !

देशाच्या स्वातंत्र्यानंतर तर्कतीर्थांना अनेक पुरोगामी बुद्धिवाद्यांचा सहवास लाभला. एम. एन. रॉय हे त्यांपैकीच एक. १९५१ साली सरदार वल्लबभाई पटेल यांनी सोरटी सोमनाथाच्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचे ठरविले. जीर्णोद्धारानंतर मंदिर अस्पृश्यांसहित सर्वांना खुले करण्यात येणार होते. नेमके याच गोष्टीमुळे काशीच्या कर्मठ पंडितांनी मूर्ती प्रतिष्ठापनेचे धार्मिक विधी करण्यास नकार दिला. या काळातही तर्कतीर्थांनी आपल्या तर्कशुद्ध बुद्धीने पंडितांना पटवून दिले की, असे करण्यात कोणताही धर्मलोप नाही, उलट हाच खरा हिंदू धर्माचा विचार आहे.

१९५५ साली या ग्रंथाला साहित्य अकादमीचा पुरस्कार लाभला. महाराष्ट्राचे द्रष्टे नेते यशवंतराव चव्हाण यांनी मात्र तर्कतीर्थांच्या विचारांवर संपूर्ण विश्वास टाकला. १९६० साली दोन अतिमहत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे काम तर्कतिर्थांवर सोपविण्यात आले. विश्वकोष’ आणिधर्मकोष’ यांसारख्या ग्रंथांची निर्मिती करण्याचे काम त्यांच्यावर सोपविण्यात आले, त्याचे कारणही तसेच होते. त्यांनी त्याआधीसुद्धा अनेक महाकाय ग्रंथ लिहिले होते.
शुद्धिसर्वस्वम्’ हा त्यांनी लिहिलेला पहिला ग्रंथ संस्कृत भाषेत होता, आणि तो १९३४ साली प्रकाशित झाला. त्याच वर्षी त्यांनीधर्ममोक्ष’ या ग्रंथाचे अठराशे पानांचे सहा अध्याय लिहिले. हिंदू धर्माची समीक्षा’,वैदिक संस्कृतीचा विकास’, आधुनिक मराठी साहित्याची समीक्षा’, इत्यादी अनेक उत्तमोत्तम ग्रंथांची निर्मिती करून त्यांनी मराठी भाषेतील साहित्य समृद्ध करण्यात मोलाचा वाटा उचलला. त्यांनी अठरा प्रमुख उपनिषदांचे मराठीत भाषांतरही केले. प्राचीन वैदिक धर्माचे समर्थक असूनही तर्कतीर्थ यांना वास्तवाचे भान होते. आधुनिक शास्त्रे, इंग्रजी भाषा, भारताची औद्योगिक प्रगती यांबाबत त्यांचे विचार अतिशय पुरोगामी होते. त्यामुळे तर्कतीर्थ हे अनेक जणांचे प्रेरणा स्थान राहिले. रत सरकारने तर्कतीर्थांना १९७६ साली पद्मभूषण’, तर १९९२ साली `पद्मविभूषण’ पुरस्कार देऊन गौरव केला होता. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री बाळाजी जोशी यांचे २७ मे १९९४ रोजी निधन झाले.
• १९९४: विचारवंत लक्ष्मण बाळाजी तथा तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे निधन. (जन्म: २७ जानेवारी ,१९०१)

आपला दिवस मंगलमय जावो
🚩जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् 🚩

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here