मलकापुर शहरातील नियमबाह्य प्रभाग रचना रद्द करण्याची मागणी !

0
55

कैलास काळे, जगदिश न्युज प्रतिनिधी,मलकापूर

मलकापूर नगर परिषदमधील सत्ताधार्‍यांनी अधिकार्‍यांना हाताशी धरून निवडणूक आयोगाने दिलेल्या नियमांची पायमल्ली करून नगर परिषदच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या कार्यक्रमात तयार करण्यात आलेल्या प्रारूप प्रभाग रचनेमध्ये काहींच्या फायद्याचा विचार करण्यात आलेला आहे. ही प्रभाग रचना चुकीची व नियमांना डावलून करण्यात आली असल्याने त्याबाबतच्या हरकती जिल्हाधिकारी बुलडाणा यांचेकडे नोंदविण्यात आल्या आहेत. मात्र त्यावरही निर्णय न झाल्यास याविरूध्द आपण उच्च न्यायालयात दाद मागू अशी माहिती समतेचे निळे वादळचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी नगरसेवक भाई अशांत वानखेडे यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

मलकापूर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक आयोगाच्या निर्देशावरून प्रारूप प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर करण्यात आला. हा कार्यक्रम तयार करतांना नियमांची पायमल्ली करण्यात आली. याबाबतच्या हरकती नोंदविल्यानंतर आज २६ मे रोजी अशांतभाई वानखेडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हरकतकर्ते राष्ट्रवादी जिल्हा काँग्रेस पार्टीचे महासचिव अनिल झोपे, न.प.चे सेवानिवृत्त कर्मचारी नंदकिशोर पाटील, भाजपाचे राहुल देशमुख, एमआयएमचे दानिश शेख सह आदींच्या उपस्थितीत स्थानिक विश्रामगृहावर पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. अशांतभाई वानखेडे यांनी पत्रकार परिषदेत माहिती देतांना सांगितले की, हरकती नुसार प्रभाग रचनेची निर्मिती व्हावी त्यामध्ये नियम, अटी, शर्तींची पूर्तता करण्यात यावी तसेच मार्गदर्शक कलमांना स्थान देण्यात यावे अशी आग्रही मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे २४ मे रोजी सुनावणी दरम्यान केली आहे.
हरकत नोंदवितांना दिलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले की, प्रभाग रचना निर्मितीवेळी प्रभागरचना समितीने स्वतंत्र प्रभाग रचनेचा नकाशा तयार केला नाही ही तर केवळ रेघोट्या ओढण्याचे काम केले असून संपूर्ण प्रभाग रचना दिशाहीन पध्दतीने बनवण्यात आली आहे. दरम्यान राज्य निवडणूक आयोगाच्या नियम क्रमांक १५ चे उल्लंघन सुध्दा करण्यात आले आहे. प्रभाग रचना निर्मिती करताना प्रभाग क्रमांक १ ते ४ नंतर थेट प्रभाग क्रमांक १५ जोडला गेला आहे. प्रभाग क्रमांक १५ ची निर्मिती करतांना मलकापूर-सोलापूर हा राज्य महामार्ग ओलांडला गेला असून हा प्रभाग अडीच किलोमीटर अंतराचा बनविण्यात आला आहे. प्रभाग रचना सुरू करतांना उलट दिशेने सुरुवात करण्यात आली आहे, यामध्ये कोणतीही भौगोलिक सलगता ठेवण्यात आलेली नाही. इमारतीचे, चाळीचे, घराचे विभाजन दोन प्रभागांमध्ये करण्यात आले आहे. नकाशातील लाल रंगाने दर्शविलेल्या प्रभागांच्या सिमान मधील सीमारेषा इमारतीवरून व घरांवरून गेल्याचे स्पष्ट दिसत आहे सीमांचे वर्णन करताना रस्ते, नाले, नद्या, सिटी, सर्वे नंबर यांचा प्रामुख्याने स्पष्टपणे उल्लेख करण्यात आलेला नाही. त्याचप्रमाणे अनुसूचित जाती जमाती यांच्या वस्त्यांचे देखील कोणतेही कारण नसताना विभाजन करण्यात आलेले आहे.
प्रभागांच्या सीमारेषेचे वर्णन करताना कोणत्याही दिशा नमूद करण्यात आलेल्या नाही. त्यामुळे सर्वसाधारण नागरिकांना प्रभागाची पूर्ण कल्पना येणे अवघड झाले आहे. प्रभागात अनुक्रमे क्रमांक देणे आवश्यक असताना देखील ती अनुक्रमणिका ठेवण्यात आलेली नाही. जनगणना प्रभागाच्या सीमा निळ्या रंगाने दर्शविण्यात आलेल्या नाहीत. जनगणना प्रभाग प्रगणक गट व त्यांची लोकसंख्या नकाशावर दर्शवण्यात आलेली नाही. प्रत्येक प्रभागाचा स्वतंत्र नकाशा असावा व त्या प्रगणक गट व त्यांची लोकसंख्या ठळकपणे दर्शवण्यात हवी त्यात रस्ते महामार्ग नद्या-नाले रेल्वे लाईन इत्यादी ठळकपणे दर्शवण्यात हवे. परंतु या पध्दतीने सदर नकाशे तयार करण्यात आलेले नाहीत. हा संपूर्ण घोळ क्षेत्रिय अधिकाNयांच्या चुकांमुळे झालेला असून चुकीच्या पध्दतीने प्रभाग रचना करण्यात आली आहे. अशी माहिती उपरोक्त तक्रारकत्र्यांनी दिली. यावर कार्यवाही न झाल्यास याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये न्याय मागण्यात येईल, असेही शेवटी अशांतभाई वानखेडे यांच्यासह आदींनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here