
सागर सव्वालाखे (जैन) जगदिश न्युज प्रतिनिधी, अमरावती
दिनांक 28/5/2022 रोजी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपीकवर्गीय कर्मचारी संघटना 615 ची औरंगाबाद येथे राज्य कार्यकारिणीची सभा संपन्न झाली सदर सभे उच्चसाठी 23 जिल्ह्यांचे पदाधिकारी उपस्थित होते जिल्हा परिषदेतील लिपिकांचे प्रश्नांच्या संदर्भात चर्चा करण्यात आली महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपिक वर्गीय कर्मचारी संघटना व महाराष्ट्र राज्य शासकीय निमशासकीय परिषदेच्या माध्यमातून करण्यात आलेल्या पाठपुराव्यामुळे लिपिकांचे पदोन्नतीचे स्तर कमी करून लिपिकांना महसूल विभागात प्रमाणे पदोन्नतीचे स्तर लागू करण्याबाबत शासन निर्णय निघाला त्यानुसार शासनास प्रस्ताव देण्याचे ठरले राज्य अधिवेशन माहे सप्टेंबर 2022 मध्ये घेण्याचे निश्चित झाले आहे. लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांची वेतन त्रुटी आणि सर्वसाधारण बदलयांचे शासन निर्णयामध्ये दुरुस्ती करणे , प्राथमिक आरोग्य केंद्रातील लिपिकांच्या अडीअडचणी सोडवणे, जिल्हा स्तरावर लिपिकांना शासनाकडून आदर्श पुरस्कार देणेबाबत, शिक्षण लिपिकांची पदे वाढविणे, दिनांक 30 जून रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना एक जुलै ची वेतनवाढ देण्याबाबत व इतर प्रलंबित प्रश्नांच्या अनुषंगाने राज्यभर दिनांक 8 ऑगस्ट 2022 रोजी लक्षवेधी आंदोलन करणार असून प्रश्न निकाली निघाल्यास 1 सप्टेंबर 2022 पासून बेमुदत आंदोलन करण्यात येईल असे ठरले.यावेळी संघटनेचे राज्याध्यक्ष श्री गिरीश दाभाडकर, मुख्य सचीव श्री बापूसाहेब कुलकर्णी,राज्यसचिव श्री अरुण जोर्वेकर , कोषाध्यक्ष श्री उमाकांत सूर्यवंशी,उपाध्यक्ष श्री पंकज गुल्हाने, राज्य समन्वयक श्री सागर बाबर कार्याध्यक्ष श्री सचिन मगर मंत्रालय संपर्कप्रमुख श्री प्रकाश महाळुंगे राज्य कार्यकारिणी सदस्य श्री नागेश सांगळे पाटील आदींसह मोठ्या संख्येने उपस्थित होते
अमरावतीहून श्री हेमंत यावले श्री पंकज आसरे व श्री दिनेश राऊत हे संघटनेच्या राज्यकारणी सभेस उपस्थित होते.
