आपल्यात परके असावे ! सगळेच सारखे वारखे नसावेत !!

0
8

🚩जय जिजाऊ🚩

जीवनात सर्व दिवस – सर्व वेळ सारखेपणा नसतो . काही वेळा आनंद , काही वेळा सामान्य तर कधी तरी दुःखदायक प्रसंगांना सामोरे जावे लागते . सुखात – आनंदात मनुष्य प्राणी किंवा या विश्वातील कुठलाही जीव सहज रममान होऊन जातो .अगदी स्वभावत:च अशा गोष्टी आवडत असल्या मुळे आनंदात जाणारी वेळ , या बद्दल कुणालाही काही वेगळे कृती करण्याची स्वतःला सावरण्याची – सांभाळण्याची स्थितीच उद्भवत नाही . क्वचितच एखाद्या अनपेक्षित अतिव आनंदा मुळे झालेल्या न पचण्या इतक्या हर्षोल्लासा मुळे , विपरीत व अप्रिय घटना घडल्या च्या पाहायला मिळतात . परंतु हे प्रकार अगदी नगण्यच . सामान्य वेळेत सामान्य स्थितीत तर सामान्यतः सर्व घटना सामान्यपणे घडत असतात . या वेळी कुठलेही भावनिक आघात किंवा भावना उचंबळून येणे असे होत नसते . परंतु काही प्रसंगी कळत नकळत एखादा दुःखाचा डोंगर कोसळतो . येणारे दुःख सांगून येत नसते . तसेच काही दुःख अपेक्षितच नसतात . पण तसे घडते ,त्यांना आपण दुर्देवी घटना म्हणतो . आपल्यातील जवळची व्यक्तीला मृत्यू येणे कोणालाही अपेक्षित नसतेच . सत्य असून सुद्धा या बाबत कुणीही तयार नस्तोच ! परंतु निसर्ग नियम आहे तो आहे .सर्वात प्रथम मृत्यू पावणे व मृत होणे . या दोन गोष्टीत तील सूक्ष्म फरक लक्षात घ्यावा लागेल . व्यक्ती पूर्ण जीवन जगल्या नंतर वयोपरत्वे श्वास बंद झाल्यास , ती व्यक्ति मरण पावली असे म्हणता येईल . पण जर अचानक अनपेक्षित कमी वयात आजाराने / अपघाताने श्वास बंद झाले तर , येथे ती व्यक्ती मृत झाली असे होते .
व्यवहारीक दृष्ट्या बोली भाषेतील शब्दातील हे चढ उतारा कडे फारसे गांभीर्याने बघितले जात नाही . सर्वांना एकाच अर्थाने समजल्या जाते . अशा अनपेक्षित दुःखद प्रसंगी त्या व्यक्तीच्या जवळ असणारे रक्त व नाते संबंधी दुःखाच्या खाईत लोटले जातात . त्यांच्या भावनेला बांध उरत नाही . त्यातल्या त्यात अपेक्षित नसताना या होणार्‍या दुःखद घटनां मध्ये तर आप्तस्वकीयांचा आक्रोश गगनभेदी झाल्या खेरीज राहत नाही . तेव्हा विचार करा अशा प्रसंगी जर सर्वच त्या मृत व्यक्ती वर प्रेम करणारे असतील . तर त्यांच्या दुःखाला न राहिलेला पारावार ,तेथील असलेली भयंकर परिस्थिती ही आणखीच जास्त भयावह व आहे त्या पेक्षा जास्त भयंकर ही होऊ शकते . कारण भावनेचा बांध फुटलेला मनुष्य स्वतःवर नियंत्रण गमावून बसलेला असतो . अशा वेळी या अतिशय दुःखात घेरलेल्यांना त्या महाभयंकर स्थितीत असलेल्यांना भावनिक बंधनातून सोडवण्याचे काम इतर लोक करतात . ते काही फरकाने भावनिक झालेल्या लोकां पेक्षा परकीय असल्या मुळे ; अर्थात झालेल्या गोष्टीच त्यांना सुद्धा दुःख झालेले असते . परंतु सरळ सरळ नाळ जोडलेली नसल्या मुळे ते त्यांच्या विवेक बुद्धीने व या जीवसृष्टीचे वास्तविक जे आहे ते , सांगण्याचा-पटवून देण्याचा प्रयत्न करतात . मनाच्या ठिकाणी एक थोडी कल्पना करून पहा की , अशा भयंकर मृत्यूच्या तांडव स्थळी असलेले सर्व फक्त आपले आपलेच असतील . तर या लोकांची काय दशा होईल .म्हणूनच आपल्यात परके असणे म्हणजे , ज्या प्रमाणे वाहनाचा गिअर बदलताना क्लच दाबून गिअर बदलला तर वाहन अगदी सहज दुसऱ्या गिअर साठी संचलित होते . अगदी याच प्रमाणे आपल्यात असलेले परके समजावे .
दोस्त-मित्र ,शेजारी-पाजारी , गावकरी जे इतर कुणी तरी असतात . त्यांचा खऱ्या अर्थाने अशा बिकट प्रसंगी अत्यंत महत्त्वाचा लाभ व चांगल्या परिणामाची उपलब्धी अनुभवास येते . तसेच सर्वच सारखे वारखे नसावे . म्हणजे कुठल्याही प्रसंगी मग तो सुखाचा असो , दुःखाचा असो ,सामान्य असो अशा प्रत्येक वेळी उपस्थितां पैकी सर्व समवयस्क असतील तर ;सर्वांची समज जवळपास सारखीच राहते . फारच क्वचित समवयस्क वेगवेगळी समज ठेवणारे प्रसंगावधान राखणारे असू शकतात . परंतु हेच जर उपस्थितां पैकी सर्वांच्या वयात किंवा काहींच्या वयात लहान मोठेपणा असेल तर लहानांना मोठ्यांच्या अनुभवाचा त्यांनी जगलेल्या जीवनातील खाचाखोचा यांचा फायदा मिळू शकतो .म्हणून केव्हाही सारखे वारखे एकत्रित असणे पेक्षा संमिश्र वयांचे संगत-पंगत असणे उचितच ठरते .

जय महाराष्ट्र – जय हिंद .

अशोकराव घनोकार
नांदुरा
९७६३०५५०७२ .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here