रेल्वेचा हेक्कडपणा ST बस च्या पथ्यावर पडू शकतो !

0
33

🚩जय जिजाऊ🚩

रेल्वेला पर्याय नसल्या मुळे , म्हणजे रेल्वेला सवत नसल्या मुळे , म्हणजे रेल्वेला प्रतिस्पर्धी नसल्या मुळे या खात्याचा मनमाने पणा म्हणजे एका अर्थाने हेक्कडपणा व हुकुमशाही खूपच वाढली आहे . पूर्ण सरकारी असल्या मुळे या खात्यातील नोकरांना पूर्ण पगार मिळतो . मग खात्याच्या नका तोट्याच या कर्मचाऱ्यांना काही सोयरसुतक उरत नाही . रेल्वेच्या या ” हम करे सो कायदा “, मुळे हे सर्वसाधारण नागरिकांचे तसेच यांच्या सामान्य प्रवाशांचे काही एक ऐकून घ्यायला तयार नाहीत . पूर्ण वेळ व्यवसाय मिळू शकेल अशा बऱ्याच स्टेशनवर गाड्यांचे थांबे देत नाहीत .स्टेशन वरील सोयी सुविधा तर कोसो दूर .
मध्य रेल्वेच्या भुसावळ रेल्वे मंडळ अंतर्गत येणारे हे तीन स्टेशन (१) मलकापूर (२) नांदुरा (३) शेगाव हे बुलढाणा जिल्ह्यातील तीन प्रमुख रेल्वे स्टेशन . या सर्व स्टेशन वर केव्हाही प्रवासी असतातच परंतु पाहिजे तेवढे गाड्यांचे थांबे यांना मिळत नाहीत .तसेच या तीन स्टेशनवर सर्व गाड्यांना सारखेच थांबले असले पाहिजे होते . परंतु यांच्या मनात येईल तसे यांनी या तीन स्टेशन करिता थांबे मंजूर केलेले आहेत .मलकापूर थांबणारी गाडी नांदुरा व शेगाव थांबेल असे नाही . नांदुरा थांबणारी गाडी शेगाव व मलकापूर थांबेल असे नाही . शेगाव थांबणारी गाडी नांदुरा व मलकापूर थांबेल असे नाही . वास्तविक या तीनही ठिकाणां वरून तुलनात्मक सारखाच व्यवसाय मिळू शकतो . परंतु आले रेल्वेच्या मनात तेथे चालेना सामान्याचे असे प्रत्ययास येत आहे .
रेल्वेच्या या हेकडी चा फायदा एसटीला होऊ शकतो ! कसा … ?! तर एसटीने रेल्वे ॲथोरिटी सोबत संपर्क करून रीतसर रेल्वे स्टेशन परिसरातून बस उभी ठेवून प्रवासी वाहतुकीचा फायदा घ्यावा . या मध्ये मलकापूर डेपो व शेगाव डेपो ने २४ तास व विशेषतः रात्री साठी दर एक तासाने किंवा प्रवासी लवकर मिळत गेल्यास त्या वेळे प्रमाणे रात्रभर बसेस मलकापुर ते शेगाव सर्व ठिकाणी थांबा घेणारी साधारण बस फेरी सुरु करावी या मध्ये नांदुरा रेल्वे स्टेशन वर स्टेशन परिसरात जाऊन प्रवासी घ्यावेत . जी रेल्वे फक्त मलकापूर थांबते . त्या मध्ये येणारा प्रवासी नांदुरा – खामगाव – शेगाव चा असेल तर किंवा या दरम्यान च्या ग्रामीण चा असेल तर , त्याला ही रातराणी गाडी फार फायद्याची ठरेल . भलेही एसटीने दिवसा पेक्षा रात्री ची सेवा म्हणून तिकीट दर दुप्पट घेतल्यास चालेल . इतर खाजगी वाहन पेक्षा हे त्या प्रवाशाला स्वस्तच पडेल . शिवाय सुरक्षितता मिळेल . याच प्रमाणे फक्त नांदुरा रेल्वे स्टेशन थांबणारी फक्त शेगाव स्टेशन थांबणारी येथील उतरणारे प्रवासी सुद्धा या रात्र कालीन बस सेवेने सुखावतील ! या रात्रीच्या बस चालक-वाहकांना पगारा व्यतिरिक्त जास्तीचा भत्ता दिल्यास , हे लोक उत्साहाने या रात्रीच्या बसे चालवतील . असे एसटीने केल्यास तिचे ब्रीदवाक्य , ” बहुजन हिताय बहुजन सुखाय “, हे खऱ्या अर्थाने सार्थ ठरेल .
आता इतर खाजगी वाहनांच्या उपलब्धी पाहता एसटीने प्रासंगिक करारावर द्यावयाच्या गाडीचे फार लांबलचक सोपस्कार फॉर्मॅलिटीज आता टाळाव्यात . यांनी काही स्टाफ २४ तास अलर्ट मोडवर ठेवावा .अगदी खाजगी टॅक्सी – कॅब – ट्रॅव्हल प्रमाणे संबंधित एसटी अधिकारी – कंट्रोलर यांचेशी फोन द्वारे , व्हाट्सअप मेसेज द्वारे पेमेंट टर्म पूर्ण करून अल्पावधीतच गाडी उपलब्ध करून देण्याचे करावे . असे होत गेल्यास करारावर बस नेणारा , तो आहे त्या ठिकाणा वरून गाडी ऑनलाईन बुक करेल . अर्थात टर्म कंडिशन पाळून . या मुळे प्रवाशांना अगदी खाजगी वाहतूक सारखे घर पोहोच सेवा मिळाल्याचा आनंद होईल व एसटी महामंडळाला उत्पन्नात भर पडेल .

जय हिंद – जय महाराष्ट्र .

अशोकराव घनोकार
नांदुरा
९७६३०५५०७१ .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here