पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मातोश्रींच्या १०० व्या वाढदिवसी घेतला आर्शिवाद !

0
74

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मातोश्रींच्या १०० व्या वाढदिवसी सकाळी सव्वा सात साडे सात च्या सुमारास पंतप्रधान त्यांच्या भावाच्या घरी पोचले. आईला नमस्कार करून आशिर्वाद घेणे हा मुख्य उद्देश होता. घरगुती स्वरूपाचा हा कार्यक्रम असल्याने मीडियाची गर्दी होणार नाही याची पुरेपूर काळजी घेण्यात आली होती. सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंब रहाते त्याप्रमाणे एका फ्लॅटमध्ये नरेंद्र मोदींचे बंधू त्यांच्या आईसह रहातात. त्या इमारती बाहेर केवळ एका जागी एखाद दुसऱ्या चॅनल चा कॅमेरा पोहोचेल इतपत काळजी घेण्यात आली होती. एरवी पतप्रधानांच्या ताफ्यात कमीत कमी पंचवीस तीस तरी गाड्या असतात. परंतु तो सारा प्रोटोकॉल बाजूला सारून केवळ पायलट कार, मोदींची गाडी आणि फॉलो ऑन व्हॅन एवढ्याच गाड्या आल्या होत्या. त्यातही इमारतीच्या बाहेर फक्त मोदींचीच गाडी येऊन उभी राहील एवढी दक्षता घेण्यात आली होती. आजूबाजूला स्कूटर, अन्य रहिवाशांच्या गाड्या, सायकली या देखील जशाच्या तशाच ठेवण्यात अल्या होत्या. पंतप्रधान इमारतीबाहेर गाडीतून उतरले ते हातात एक पार्सल किंवा पिशवी घेऊन. बहुधा भेटवस्तू असावी. कोणीही अटेंडंट नाही. साधारण अर्धा तास ते आईबरोबर होते. त्यानंतर ते तिथून पुढच्या कार्यक्रमाला मार्गस्थ झाले. मीडिया करता आईसोबताची केवळ काही छायाचित्रे देण्यात आली.
कारण मोदींची प्रतिमा तशीच आहे. एवढ्या मोठ्या पदावरील माणसाला सरकारी दौऱ्यावर असताना हातात एखादी बॅग, फाईल घेतलेली आपण फारच क्वचित पाहिली असेल. पण आपण आईकडे जात आहोत, हा खाजगी कार्यक्रम आहे याचे पुरेपूर भान त्यांना होते. त्यांच्या हातातली पिशवी किंवा पार्सल नेण्यासाठी माणूस नव्हता असे नाही. पण मोदींना पद आणि प्रसंग याचे पुरेपूर भान आहे. आपण आईला काही विशेष प्रसंगाच्या निमित्ताने आपण भेटायला जात आहोत, तेव्हा पंतप्रधान म्हणून असलेला हा तामझाम नकोच. परंतु त्याचबरोबर आपले लाखो चाहते आणि कार्यकर्ते तसेच सामान्य जनताही आहे की ज्यांना आपण काय करतो याबद्दल उत्सुकता आहे. अशा परिस्थितीत मोदींनी आपल्या संयमित वर्तनाने कमालीचा समतोल राखत सर्वांच्याच अपेक्षांना योग्य तो न्याय दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here