नांदुरा शहरातील नाली बांधकामात ठेकेदाराची मनमानी ! नगर पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष !!

0
5

नांदुरा : शहर प्रतिनिधी जगदिश न्युज

या बाबत अधिक वृत्त असे कि, शहरातील वार्ड क्र. २ रेल्वे स्टेशन, आईस फॅक्टरी, रेल्वे मोरी परीसरात नवीन नाली चे बांधकाम सुरू करण्यात आलेले आहे. कमी खर्चात नाली बांधकाम ऊरकण्यासाठी ठेकेदार च्या हलगर्जीपणामुळे रस्त्यात काळी माती टाकण्यात आली आहे सध्यस्थितीत पावसाळा सुरू झालेला असुन नाली बांधकाम करण्यासाठी खोदकाम करतांना त्यातील वेस्टेज निघालेली माती हि वाहणातुन ईतरत्र हलविणे आवश्यक असतांना केवळ पैसे वाचविण्यासाठी भररत्यात टाकल्यामुळे रत्यावर सर्वत्र चिखल साचलेला असल्यामुळे परीसरातील शातंताप्रेमी नागरीकांना जाता येतांना प्रचंड त्रास होत आहे. सदर रस्त्यावर ठेकेदाराने बेकायदेशीरपणे टाकलेली माती त्वरीत ऊचलुन सदर रस्ता पुर्ववत करण्यात यावा अशी मागणी या परीसरातील नागरीक
अँड.अमोल वसंतराव इंगळे यांनी एका निवेदनाद्वारे मुख्याधिकारी नगर परीषद नांदुरा यांचेकडे केली आहे.
सध्यस्थितीत न.प. पदाधिकार्‍यांना कार्यकाळ संपल्यामुळे केवळ मुख्याधिकारी यांचे अधिनस्थ मंजुर विकास कामाचा धडाका सुरू आहे. अशा परीस्थित वरी परीसरातील नाली बांधकामावरील ठेकेदारांनी मनमानी पध्दतीने कामे करीत आहेत. सदर विकासकाम मंजुर प्लाॅन ईस्टिमेट नुसार होत आहे काय ? हे पाहण्याची जबाबदारी असलेले ईंजिनियर प्रत्यक्ष कामे कशा पध्दतीने होत आहे हे पाहण्यास तयार नाही.
वरील प्रकार पाहला असता काही बाबी निदर्शनास दिसून येतात.

१. कॉन्क्रेट काम सुरु करण्यासाठी कंत्राट दिले. त्या कंत्राटाच्या नियमांचे पालन काटेकोरपणे होत आहे कि नाही यावर शंका आहे.
२. ठेकेदार हे मनमानी व हलगर्जीपणे कुठेहि माती टाकत असून काम करीत आहे. पण यामुळे त्याभागातील नागरिकांना त्रास होत आहे.
३. कॉन्क्रेट काम सुरु असताना नगर परिषद नांदुराचे संबंधित अभियंता, अधिकारी किंवा कर्मचारी या कामाकडे दुर्लक्ष तर करत नाही ना असा पण प्रश्न निर्माण होत आहे.
४. कॉन्क्रेट काम सुरु आहे ते पूर्णत्वास झाल्यानतर कामाची गुणवत्तापूर्ण तपासणी करूनच कामाचे देयक अदा करण्यात यावे.
५.रस्तात पडलेली काळी माती व चिखल लवकरात उचलून त्या जागी पुर्ववत रस्ता करून देण्यात यावा.
अजून जर या चिखलामुळे मी किवा कोणीही नागरिक दुचाकी घसरून पडला तर वैदकीय खर्च व इतर होणारे नुकसान यास संबंधित नगर परिषद नांदुराचे अधिकारी, कर्मचारी जबाबदार राहतील. व नुकसाणाची भरपाई हि नगर परिषद प्रशासन किवा आपणास करून द्यावी लागेल. असे निवेदनात नमुद केलेले आहे. निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी बुलढाणा यांना ऊचित माहिती व कार्यवाहीसाठी पाठविण्यात आलेले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here