डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्मृती दिनी भाजपा कार्यालयात अभिवादन !

0
7
बलीदान दिनी विनम्र अभिवादन करतांना भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते

गिरीश पळसोदकर, खामगांव डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्मृती यांच्या स्मृती दिनी भाजपा कार्यालय टॉवर चौक खामगांव येथे भाजपच्या वतीने अभिवादन केले. यावेळी अमर रहे अमर रहे डॉ श्यामाप्रसादजी अमर रहेच्या घोषणा देण्यात आल्या.
सर्वप्रथम हिंदुस्थान चे प्रचलित शिक्षाविद, काश्मीर मध्ये दोन प्रधान,दोन निशान,दोन संविधान चा विरोध करणारे कुशल संघटक र्डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण सर्व उपस्थ‍ितांनी अभिवादन केले. यावेळी डॉ एकनाथ पाटील यांनी श्यामाप्रसादजी यांच्या संपुर्ण जीवनावर प्रकाश टाकला. यावेळी भाजपा तर्फे दि 23 जून डॉ श्यामाप्रसाद मुखर्जींच्या स्मृती दिन ते दि.6 जुलै त्यांच्या जयंती दिना पर्यंत विविध सामाजिक कार्य करुन त्यांचे कार्य जनसामान्यापर्यंत पोहचविण्याबाबत सर्व उपस्थति प्रत्येक बुथवर पूजन करून पुष्पांजली अर्पण करणे. त्यांच्या जीवना वर आधारित त्यांचे विचार,त्याग व बलिदान विषयी व्याख्यान आयोजित करावे. तसेच २३ जून ते ६ जुलै या काळात बूथ स्तरावर वृक्षारोपणाचे कार्यक्रम करावेत. अशा सुचना देखील उपस्थ‍ितांना देण्यात आल्या.
यावेळी भाजपा जिल्हाउपाध्यक्ष शरदचंद्र गायकी, संजय शिनगारे, जिल्हा सचीव, शचंदशेखर पुरोहित, राम मिश्रा युवा मोर्चा अध्यक्ष, डॉ एकनाथ पाटील, सत्यनारायण थानवी, हिरालालजी बोर्डे, गणेश सोनोने, अशोक हटटेल, विजय उगले, जितेंद्र पुरोहित, विलासराव देशमुख, पवन गरड जिल्हाध्यक्ष विद्यार्थी आघाडी, वैभव डवरे, शंभु शर्मा, नंदु कांडेकर, सुभाष इटणारे, आशिष सुरेका, प्रमोद सरोदे, रुपेश शर्मा, रोहन जैस्वाल, कमलेश हवेलिया, रवि पाटील गायगोळ, वसंतराव वानखडे, गजानन वानखडे, बनकर, नंदु अमलकार, विक्की हटटेल, बळीराम डांगरे, देवीदास शेगोकार, पदाधिकारी,लोक प्रतिनिधी, विशेष आमंत्रित, कार्य. सदस्य,महिला मोर्चा,युवा मोर्चा, विद्यार्थी आघाडी,युवती आघाडी, सर्व आघाडी प्रमुख, प्रभाग प्रमुख, शक्तिकेंद्र प्रमुख, बूथ प्रमुख यांची उपस्थ‍िती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here