देशाची लोकसंख्या वाढते आहे ! पण घरातील लोकांची संख्या कमी होत आहे !!

0
55

🚩जय जिजाऊ🚩

जसे देशाला स्वातंत्र्य मिळाले तसे तसे घराघरात प्रत्येक सदस्याला स्वतंत्रा चे वेड लागले .परिनीती परिवार विभक्तीकरण असे झाले . परिवाराचे रूपांतर कुटुंबात झाले .सुरुवाती सुरुवातीला ही कुटुंबे सुद्धा बहुसंख्य होती . आता मात्र ती अल्पसंख्य व या पुढे तर अत्यंत अल्पसंख्य होण्याच्या दिशेने जात आहे . लोकशाही प्रणाली च्या देशात प्रतिनिधी हा मताधिक्‍याने राजा बनत असतो .अर्थात तुमच्या मता प्रमाणे राजा पाहिजे असेल तर ,संख्याबळा शिवाय पर्याय नाही .संख्याबळ तेव्हाच वाढू शकते जेव्हा तुमच्यात संकुचित वृत्ती नसेल . एक दुसऱ्याचे उणेदुणे खपवून घेण्याची तयारी असेल . अगदी पाया जवळ पाहणे ही मानसिकता नसेल .

परिवार विभक्तीचे कारण बहुतांशाने कुटुंब प्रमुख – मुख्य चालक व काही अंशी त्या परिवारातील इतर उपप्रमुख ते अगदी काल त्या परिवारातील घटक झालेल्या व्यक्तीला / सदस्याला लागलेले स्वातंत्र्य सुखाचे मृगजळा प्रमाणे असलेले डोहाळे . या विश्वाच्या उत्पत्तीचे कारण जे काय असेल ते असेल . परंतु एक गोष्ट मात्र खात्रीने सांगता येते की , या विश्वात स्थित्यंतर – बदल हे निश्चितच घडत आलेले आहेत . केव्हा ही एक सारखे वारे या चराचरा मध्ये वाहतांना दिसलेले नाहीत . त्यात निश्चितच वेळोवेळी बदल दिसून आलेला आहे . तेव्हा वेळोवेळी चे हे बदल ज्या ज्या घरांमध्ये ज्या ज्या कुटुंब प्रमुखांनी आत्मसात केले व त्या नुसार त्यांच्या वागणुकीत बदल केला . ते चालक त्या परिवाराचा एकत्रीकरणाचा गाळा चालवण्या मध्ये सरस ठरले . यशस्वी झालेत .
फार पूर्वी वस्तूच्या बदल्यात वस्तू अशा प्रकारचे लेनदेन / व्यापार / व्यवहार होत असायचे . तसेच सर्वांनी मेहनतीचे पूर्ण वेळ कामे करने या मध्येच सर्वांचा वेळ जायचा . प्रत्येका कडे त्याच्या अंगभूत गुणां नुसार , बुध्यांका नुसार जबाबदारी सोपवलेली / आलेली असायची . ती पूर्ण करण्यात त्या प्रत्येकाचा वेळ जायचा . परिवारातील भरपूर सदस्य संख्येचा हा फायदा होता की ,सामान्य बुद्धीचे सदस्यां कडे सामान्य कामे असायची . तसेच असामान्य व जिकरी ची कामे ही वयाने पोक्तपणा आलेल्या अनुभवी व्यक्ती कडे व या सर्वांवर नियंत्रणाचे काम सुसंचलनाचे काम घरातील सर्वात वयस्क व अनुभवातून आलेल्या शहाणपणाच्या द्वारा , व्यवहार कुशलता असणाऱ्या ; अनायसेच कुटुंब प्रमुखाच्या हुद्यावर पोहोचलेल्या एक – दोन व्यक्ती कडे असायचे . या कुटुंब प्रमुखाने त्याच्या अनुभवातून व व्यवहारीपणातून पूर्ण परिवारा करिता खानपानाच्या वस्तू एकत्रित आणून दिलेल्या असायच्या . शिवाय या गोष्टी नित्य खरेदी करणे असे नव्हते . आठवडी बाजारातून खरेदी ,तसेच जास्त वेळ टिकणाऱ्या वस्तू ह्या एकदम जास्त प्रमाणात घेऊन ठेवलेल्या असायच्या . त्या मुळे इतर सदस्यांना त्यांच्या दैनंदिन गरजेच्या वस्तू घरातच उपलब्ध असायच्या .व्यक्तिगत बाजारात दुकानात जाऊन कुणालाही कुठली वस्तू आणण्याचे काही कारणच नव्हते .तसेच त्या काळी बहुसंख्येने लोकांना मुख्य जेवणा व्यतिरिक्त इतर काहीही माहीत नसायचे . मोठ्यांचा मान पान व वयस्क होई पर्यंत पान बिडी तंबाखू सुपारी या गोष्टीचा गंध नसायचा . त्या मुळे या कारणांच्या खर्चा साठी कुणालाही पैश्यांची गरज नसायची . सर्व सर्वां साठी जगायचे .
पण काळ बदलत असतो .या न्यायाने भारतीयांच्या असंघटित व एक दुसऱ्याचे वर्चस्व सहन न होण्याच्या परिणाम विदेशी राजवटी येत गेल्या .पैकी गोऱ्या लोकांचे आलेले राज्य , इतर आक्रमकां पेक्षा वेगळे ठरले . यांनी येथील संपत्ती तर लुटून नेलीच . परंतु सोबतच त्यांनी आणलेली शिक्षण प्रणाली , ही भारतीयांच्या पूर्वीच्या संघटित परिवारा साठी कायमची दुष्परिणाम करून देणारी ठरली . त्यांनी आणलेल्या शिक्षणात लोकांना शिक्षित होऊन मिळणारे कामधंदे हे परिवारा पासून दूर गावा पासून दूर इतरत्र मिळत असायचे . त्याचा परिणाम काही लोकांची इच्छा असून सुद्धा परिवारा पासून वेगळे दूर वेगळ्या गावात वेगळ्या ठिकाणी चुल मांडावी लागली . या नोकरी निमित्त बाहेर गेलेल्यांची टापटीप पाहून परिवारातील इतर सदस्यांना सुद्धा तसे राहावे वाटू लागले . नोकरी निमित्त बाहेरगावी असल्या मुळे तसेच फार कष्ट उपसण्याचे काम नसल्या मुळे हे बाहेर राहणारे लोक इंग्रजी कपड्यात कडक इस्त्रीत व डोळ्यांना आकर्षित करेल असे राहणीमान जगू लागले . या सर्व बाबींचा परिवारात एकत्रित असलेल्या सदस्यांवर दिवसेंदिवस परिणाम होत गेला . यांना सुद्धा असेच स्वतंत्र राहावे असे वाटू लागले . तसेच कष्टाचे काम असल्यावर सुद्धा इंग्रजी बाण्याचे सूटबूट घालण्याचा मोह हे आवरू शकले नाहीत . या कपड्यांची वज राखतांना यांना यांचे खऱ्या कामाला दूर करावे लागले . रामराम ठोकावा लागला . स्वतः मेहनत न घेतल्या मुळे मजूर सांगून कामे करून घेणे सुरू झाले . तसेच यांना पण बाहेरील वस्तू खाण्याचे वाटू लागले .परंतु पैसा हा फक्त कुटुंब प्रमुखाकडे असायचा .यावर मार्ग म्हणून घरातच चोऱ्या सुरु झाल्या . फार मोठे घोटाळे नाही तरी मात्र घरातल्या घरात घबाड सुरू झाले . असे होत होत आवक-जावक चे ताळतंत्र बिघडलं व एकत्रित असलेल्या परिवाराचे उत्पन्न कमी दिसू लागले . वास्तविक उत्पन्न बरोबर होते . पण चोऱ्या सुरू झाल्या मुळे घरातील अन्नधान्य चोर वाटेने नेऊन कवडीमोल भावाने देऊन , तात्पुरत्या चोचले पुऱ्या करणाऱ्या किंवा सुख चैनीच्या वस्तू घरात येऊ लागल्या मुळे ; परिवाराचे सुत्र संचालन करणे त्या प्रमुखाला कठीण होऊन बसले ताळामेळ नसल्या मुळे वाद-विवाद , भांडणे असे प्रकार होऊ लागले . अशातच त्या परिवारात येणाऱ्या नवीन सुनांनी या घरातील वादावादी चा फायदा उचलून त्यांच्या पतीदेवला त्या परिवारातून वेगळे राहण्याचा कानमंत्र देण्या करिता सुरुवात केली . या विदेशी इंग्रजी शिक्षणा मुळे लहान्याला लहानपण नाही . मोठ्याला मोठेपण नाही . असे सर्व सुरू झाल्या मुळे कुणालाही कुणाचा धाक उरला नव्हता . अगदी कमी वयात व्यसनाधीनता जळू लागल्या मुळे ती पुर्ण करण्या करिता पाहिजे असलेले धन सरळ मार्गाने मिळत नसल्या मुळे स्वतःच्याच घरात चोऱ्या करून या गोष्टी पूर्ण केल्या जाऊ लागल्या . अगदी एक सुपारी एक तंबाखू पुडी साठी , शेर भरून अन्नधान्य त्या विक्रेत्याला देऊन , नादान पणे स्वतःचे स्वतःच्या हाताने नुकसान करून घेणे सुरू झाले होते . वेळीच ह्या गोष्टी ज्या ज्या कुटुंब प्रमुखांच्या लक्षात आल्या , त्यांनी पुर्वीचा एकाधिकार टाळत , वेळेचे महत्व ओळखून परिवारातील इतर सदस्यांच्या मनाजोगे वातावरण तयार करण्या करिता त्यांना सुद्धा दैनंदिन खर्चा करिता काही सुविधा – त्यांचे स्वतःचे उत्पन्नाची तजवीज होईल असे करून टाकले . घरातील प्रत्येक सज्ञान व्यक्ती कडे त्याचे स्वतंत्र खर्चा करिता ठराविक दिवसांनी त्याला काही पैसे देणे . एका अर्थाने ही चांगली गोष्ट वाटते . कदाचित ही विदेशी पद्धत असेल . कारण असे पैसे देण्याला ‘ पॉकेटमनी ‘, हा शब्द प्रयोग ऐकण्यात येतो . याचा अर्थ मूळ रूपाने ही विदेशी पद्धत आहे . परंतु या पद्धत मुळे कुटुंबातील प्रत्येक सदस्याला त्याचे स्वतंत्र अस्तित्व मान्य आहे असे समजतो . त्या मुळे परिवारा पासून बंड करणे या मानसिकतेत तो सदस्य कधीही येत नाही . बदललेल्या काळानुरूप या विदेशी पद्धतीचा ज्या परिवार प्रमुखांनी अंगीकार केला . ते परिवार खूप दिवस एकत्रित राहिलेले पाहायला मिळतात . ज्यांनी बदललेल्या काळा नुसार बदल केला नाही .त्या परिवारांचे सदस्य बंड करून उठले .असे परिवार कुटूंब च्या कक्षेत जाऊन बसले .
भारत शेतीप्रधान देश आहे . एकुण लोक संख्येच्या ३ हिस्से लोक शेतीवर उपजीविका करतात .शेती हा समूहाने करण्याचा उद्योग-प्रकार आहे . शेतीत प्रत्यक्ष अंगमेहनती व्यक्ती वर्षभराच्या खर्चाची तरतूद करू शकतो .पूर्वी एकत्रित परिवारात असलेली ५० ते १०० लोकांची संख्या या करिता उपयुक्त व फायद्याची ठरली होती . ती मात्र विभक्तीच्या प्रक्रियेत कुटुंबात ४ लोक असणे ; त्या मुळे बहुधा प्रत्येक काम बाहेरील माणसे व यंत्रसामुग्री च्या साह्याने करून घ्यावी लागत असल्या मुळे ,आता शेती हा उद्योग पाहिजे असा नफा देणारा ठरत नाही . भारतीयांचे मूळ उत्पन्नाचे स्तोत्र ,परिवार तुटल्या मुळे विस्कळीत झाले . परिवार तुटण्याचे कारण इंग्रजी शिक्षणा मुळे व्यवस्थेत झालेला बदल . हे प्रत्येकाला समजले , पण काळ एकदा जो गेला तो गेला ! १९७०-७५ च्या कालावधीत तत्कालीन सरकारने लोकसंख्या नियंत्रणा करिता सुरू केलेला उपक्रम ,’नसबंदी ‘ ! या कडे अधिकाधिक जनतेने आकृष्ट होण्या करिता ठिक-ठिकाणी लावलेले फलक ; ” हम दो हमारे दो ” , ” छोटे कुटुंब सुखी कुटुंब “, ” दो मे शांती तीन मे क्रांती ” .अशा प्रकारच्या त्या काळच्या सरकारने केलेली दिशाभूल . याला भारतातील सुज्ञ व सुधारणावादी लोकांनी अंगिकारले .या मध्ये विशेषतः कृषक प्रधान समाज कचाट्यात सापडला . यांच्यातील परिवारा अंतर्गत चालू असलेले कलह त्यांचेतील बहुसंख्य सदस्यतेला कंटाळले होते .त्यांना सरकारचे हे कुटुंब नियोजन फारच चांगले वाटले होते . म्हणूनही बर्‍याच मोठ्या परिवारातील सदस्यांनी स्वतःहून नसबंदी करून घेतली होती . परंतु आता मात्र त्या गोष्टीचा विपरीत परिणाम दिसून यायला लागलेला आहे . भारताला भारतमाता म्हणणारे देश वासी हे मुळातच काळानुरूप स्वतः मध्ये बदल करून घेणारे सुधारणा वादी आहे .तेव्हा नसबंदीचे लहान कुटुंबाचे ऐकीव फायदे याला एक काळाची गरज सुधारणा समजून ज्यांनी अंगीकारले होते .ते मात्र आज घडीला कमी संख्याबळाच्या संकटात सापडलेले आहेत . कारण या लोकांचे जे काही जगण्याचे स्त्रोत आहेत . त्या सर्वां मध्ये मानवी बळ जास्तीत जास्त असेल तर ते फायद्याचे ठरते . कारण यांचे कडे असलेले स्तोत्र हे जास्तीत जास्त निसर्गा कडून मिळणाऱ्या बाबींवर अवलंबून आहे . निसर्गाचे देणे हे प्रत्यक्ष मिळाल्यावरच मिळाले असे समजावे लागते . अशातच जास्त खर्च करून बसणे व निसर्गाने वेळेवर ठेंगा दाखवणे . या स्थिती मध्ये भारतीयांना अडचणीचा सामना करावा लागतो . जास्त मनुष्यबळ असेल तर या खर्चा मध्ये आळा बसतो .
आता तर एका जोडप्याला २ चे वर अपत्य असतील तर त्याला बऱ्याच शासकीय योजनांचा लाभ घेता येत नाही . तसेच महत्त्वाचे म्हणजे ते निवडणूक लढविण्यास अपात्र समजला जातो . परंतु प्रत्येक जोडपे हे निवडणूक लढवत नसतात . ज्यांची कडे प्रतिभा आहे .चेहरा – कार्य आहे . असेच लोक निवडणूक लढवत असतात . तेव्हा सामान्य जोडप्यांनी निवडणुकीचा मुद्दा डोक्यातून बाजूला काढून टाकावा . राहिला प्रश्न शासकीय योजनांचा ! तर कुठलीही अंगमेहनत करणाऱ्याला शासकीय योजना चा घोडा घडवू शकत नाही .आज भारता मध्ये पंचर जोडणारे , मेकॅनिकल काम करणारे ,भंगार चा व्यापार करणारे , रिक्षा चालवणारे . हे लोक अंगमेहनतिनेच त्यांचे जीवन जगत आहेत . शासकीय आदेशांचा यांना काहीही फरक पडत नाही . तेव्हा मेहनती व्हा व मनुष्यबळ पर्याप्त असणे गरजेचे वाटू द्या .
प्रत्येक निवडणुकीत उभे असणारे उमेदवार त्यांचे प्रचारा करिता काही मुद्दे मांडत असतात .त्या मध्ये एक वाक्य प्रकर्षाने नेहमी ठळकपणे ऐकायला – वाचायला मिळते . ते असे की , “आपले अमुल्य मत आम्हाला देऊन उपकृत करावे ” . याचा अर्थ मत देणारा व्यक्ती त्यांचे करिता अमूल्य असतो .मग आपल्या घरात मत देणारांची संख्या जास्त असणे हे त्या घरा करिता सुद्धा अमूल्य असेल . एक प्रकारची ( asset ) संपदा असेल .

जय महाराष्ट्र – जय हिंद .

अशोकराव घनोकार
नांदुरा
९७६३०५५०७१ .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here