सायकल चालवा ! पेट्रोल,डिझल खर्च वाचवा !! साधा स्वहितासोबत देशाचे हित सुद्धा !!!

0
138
८० वर्षाचा शेतकरी दर सोमवारचे साप्ताहिक बाजाराला नांदुरा गाठायचं तर सायकलनेचं !

🚩जय जिजाऊ🚩

सायकल चालवणे आता मागासलेपणाचे वाटते . मध्यंतरी एक काळ असा होता की , सायकल भेटवस्तू म्हणून दिल्या घेतल्या जायची . लग्ना मध्ये सायकल , रेडिओ व मनगटी घड्याळ ज्यांना मिळाल्या ते नवरे धन्यता मानायचे . लग्नात आंदण मिळालेली सायकल नवरीच्या गावा पासून नवरदेवाच्या गावा कडे चालवत न्यायला ज्याला मिळायची , तो विशेष मर्जीतील समजला जायचा ! त्याला खूप आनंद व्हायचा . सायकली वरुन शिक्षक , शिक्षकेतर , ग्रामसेवक , पुलिस , पोष्टमन इत्यादी असे नोकर वर्ग .तसेच नाटक – सिनेमाची जाहीरात करणारे , वर्तमान पेपर वाटणारे , छोटे मोठे व्यापारी – विक्रेते जसे आईसकांडी वाले , कापड विक्रेते , रद्दी – भंगार घेणारे , पान बिडी विक्रेते , भाजी – फळ विक्रेते इत्यादी इत्यादी . तसेच घर संसारात तिचा वापर करणारे ५० – ६० कि . मी . परिसरात सहज वावरत असत .

या मधे घरगुती वस्तू ने – आण करणे . बाजारहाट करणे . दवाखाना – शाळा कॉलेज – लग्न दारात – मरण दारी जाणे येणे हे सर्व काही सायकल च्या द्वारे चालायचे . पूर्वी प्रवाशी मोटार गाड्या काहीच रस्त्यां वरून धावायच्या . तेव्हा ग्रामीण व दुर्गम भागातील लोकांना त्यांचे गावा पासून त्या वाहनांच्या धावण्याच्या रस्त्यां वर येऊन पुढील प्रवासा करावा लागायचा . तेव्हा घरा पासून या मुख्य वर्दळीच्या रस्त्या पर्यंत , फाट्या पर्यंत ही सायकलच सोडायला यायची . या सायकल वरून फाट्या पर्यंत पाहूणे पोहचवणे – घ्यायला जाणे व्हायचे . नवऱ्या सोबत बायको सुद्धा कधी कधी डबल शिट सायकल वर ठसक्यात बसून गेलेली दिसायची .
अशी ही बहु आयामी सायकल आता मात्र चालवणे म्हणजे इतरांच्या नजरेत तो व्यक्ती मागासलेला , परिस्थितीने फार गरीब व रिकामटेकडा आहे . असे समजले जाते ! या पैकी कोणी काहीही समजो . सायकल चालवणे आज पुन्हा एकदा काळाची गरज झालेली आहे . सायकल चालवल्या मुळे सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे सायकल स्वार शरीराने पिळदार – कसलेला – सशक्त व पोट पुढे आलेला दिसणार नाही . दुसरा फायदा म्हणजे सायकलने प्रदूषण होत नाही . कारण या मध्ये इंधन जाळण्याची आवश्यकता नसते . हे व्यक्तिगत फायदे . सोबतच देशहित असे की , विदेशातून आणावे लागणारे जळाऊ इंधन पेट्रोल – डिझेल याची या मध्ये आवश्यकता नसल्या मुळे इंधन आणण्या करिता आपल्याला देशाची मुद्रा खर्च करण्याचे काम पडत नाही .
पूर्वीच्या तुलनेत आता सायकली सुद्धा वेगाने पळणाऱ्या , वजनाने हलक्या तसेच प्रगत देशात तर अगदी एखाद्या बॅग प्रमाणे घडी होणाऱ्या सुद्धा आहेत . भारतातील जुन्या बनावटीच्या सायकली मजबूत होत्या . त्या व्यवस्थित चालवणारांनी एक वेळ घेतलेली सायकल तिन – तिन पिढ्यां पर्यंत चालवलेल्या आहेत . त्यांच्या रिंग – स्पोक – चैन – बुधले सुद्धा गंजत नव्हते . पुढच्या चाकाला हँडलला दुसरा मजबूत आधार देणारे बफर असायचे . थोड्या वजनदार पण खुपच टिकावू होत्या . त्या सायकलीने सुद्धा मध्यम वयस्क व्यक्ति , १ कि.मी. अंतर सहज ४ मिनिटात पार करतो . तेच १५ ते २५ वयातील किशोरवयीन व तरुण ३ मिनिटात पार करेल . आता तर नवीन निघालेल्या रेसर सायकल , गिअरच्या सायकली , वजनाने हलक्या व हवेचा रोध टाळणाऱ्या / गतीशिलता असणाऱ्या सायकली (Aerodynamic ) बाजारात मिळतात . या सायकली ने नंतर कापणे फार सुसह्य झालेल आहे . समतल रस्त्या वरून या सायकली सहज अडीच मिनिटां मध्ये किंवा याही पेक्षा कमी वेळात १ कि.मी. अंतर पळवल्या जाऊ शकतात . साधारणपणे सरासरी शाळा-कॉलेजातील विद्यार्थी १ तासात अगदी सहज २० ते २५ कि . मी . अंतर पार करू शकेल . कदाचीत या पेक्षा ही जास्तच .
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत इंधनाचे वाढत चाललेले भाव . तसेच या जळावू इंधना मुळे होत असलेले प्रदूषण . या करिता देशाचा खर्च होत असलेला पैसा . हे सर्व थांबवण्याचे काम , या पासून सुटका मिळविण्या साठी सायकलच पर्याय ठरू शकते . तेव्हा सर्वांनी किंवा ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी जास्तीत जास्त सायकलचा वापर करणे , हे केव्हाही स्वतःच्या लढ्ढ व कृष ( रोगट ) शरीरा करिता लाभदायकच . सोबतच स्वतःच्या अर्थव्यवस्थे करिता तसेच देशाच्या सर्वतोपरी हिता करिता आणखी एकदा मैलाचा दगड ठरणार आहे . या वर प्रकर्षाने विचार करून किशोरवयीन – तरुण व मध्यम वयाचे यांनी प्रथम पसंती देऊन , कमी अंतर व वेळ असेल तर सायकललाच द्यावी . तसेच सायकल असे वाहन आहे की मनुष्य कितीही व्ययस्क असला . तरी तो सुद्धा सायकल चालवून आणखीच बळकट स्नायू चा असा व्हायला मदत करते .शारीरिक कमजोरी नसेल त्या सर्वांनी सायकल चालवणे केव्हाही योग्य समजावे . जग काय म्हणेल . लोक हसतील का ! या गोष्टी बाजूला ठेवू स्व हिता करिता व देशी हिता करिता पुन्हा सायकलीचे अवतरण करू या !!
आता तर सायकली वर सुद्धा ई बाईक प्रमाणे बॅटरी / सेल बसवून सायकलिंग करण्याचे आताच्या पिढी करिता ही एक पर्वनी आहे . तेव्हा आता इंधनाची बाईक मोटर सायकल चालवण्याचे टाळुन , काही अंशी पायांना आराम देणाऱ्या ई-सायकली वापरल्या . तरी सुद्धा ते सर्वांच्या हिताचे ठरेल .

जय महाराष्ट्र ! जय हिंद !!

अशोकराव घनोकार
नांदुरा .
९७६३०५५०७१ .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here