,, गाय हमारी माता है !,, पर क्या हम बैल के बच्चे है !!

0
140

🚩जय जिजाऊ🚩

भारतीय संस्कृती गायीला भारतीय गायांना अनन्यसाधारण महत्त्व आहे हे वेळोवेळी सिद्ध सुद्धा झालेले आहे .तरीही आज भारतातील काही भागातील गोपालन बाबत दिवसेदिवस कमी होत जाणारी शेतकर्‍यांची मानसिकता पहाता तथा अनेक शहरातील व गावातील प्लाॅस्टिक केरकचरा खाऊन पोट भरत असतांना मरनासंन झालेल्या मोकाट गाईची दुरावस्था पाहुन असं वाटायला लागलं कि, हेच का ते ,, गाय हमारी माता है !,, पर क्या हम बैल के बच्चे है !! जो यह तमाशा खुल्ली आखोंसे देख रहे है !!!

भारतीय अर्थ व्यवस्था शेतीप्रधान असून , शेतीचा आत्मा हा पशूंचे खत मूत आहे . जो पर्यंत भारतात शेतकऱ्यां कडे पशुधन होते . तो पर्यंत शेतीची पोत विशेष दर्जाची होती . आता मात्र यांत्रिकीकरण व शेती पिकवण्याचे आधुनिकीकरण या नावा खाली तसेच शेती विषयक मेहनत करण्याची सर्वांचीच कमी झालेली प्रवृत्ती . या मुळे कमी मेहनत शेती मध्ये कमीत कमी उपस्थिती , तसेच तुटलेले परिवारा मुळे घराघरात कमी झालेली लोकसंख्या ; अशा अनेक कारणां मुळे कमी होत गेलेले शेतीचे क्षेत्रफळ . या अनेक कारणां मुळे पशुधन ठेवणे जिकरीचे होऊन बसले . करायला -चारायला कोणी नाही . परवडत नाही . पुरत नाही . जास्त श्रम पूरतात .मुबलक चारा पाण्याची व्यवस्था होत नाही . गुरेढोरे बांधायला जागा नाही . या अशा एक ना अनेक कारणां मुळे खंडीने – शेकड्याने असणारी गुरेढोरे शेतातून आता मात्र कायमची हद्दपार झालीत. फार क्वचित नसल्या सारखे पशुधन आता शेतकऱ्यां कडे आहे . गाईचे दुध, दही, तुप पाहिजे पण तिचे सुयोग्य प्रकारे पालन करण्यास आज कुणी तयार नाही. जगाने कितीही प्रगती केली तरी कुणीही शास्त्रज्ञ कृतीम दुध तयार करू शकत नाही. हि काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे.

तसेही शेतकरी आता ज्या पशू पासून फायदा असेल , तोच पशु वागवतो . जास्त दूध मिळावे म्हणून गावरान गायीं ऐवजी म्हशी वागवणे . तसेच भारता बाहेरचे ते अति उत्कृष्ट , भारतातील निकृष्ट .अशा अंधानुकरण व देशाभिमान न बाळगणे या तात्पुरत्या दिसत्या लाभा पायी देशी गायींच्या जागेवर जर्शी गायी वागवणे हे उपक्रम सुरू झाले आहेत . पण येथे एक पंचाईत अशी झाली की ,भारतातील संस्कृती प्रमाणे देशी गायीचे महत्व तिच्यातील दैवी गुण , या मुळे नाम मात्र ती गाय वागवणे धर्माचा एक भाग म्हणून सुरू झाले . तसेही धर्मपंडितांनी जे काय सांगितले असेल ते असेल . परंतु शास्त्रीय निकष दृष्ट्या इतर पशूंच्या तुलनेत भारतीय जातींच्या गायी मध्ये असलेली गुणात्मकता ही अधिक आहे . इतर पशुंच्या तुलनेत गाय हा जास्त माणसाळलेला प्राणी तसेच एक समजदार प्राणी आहे . असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही . परंतु भारतीयांनी आता ज्या काही थोड्या फार गायी वागवणे चालवले आहे .ते तिच्यातील गुणात्मकता म्हणून नाही .तर , धार्मिकतेचा एक भाग म्हणून ती दाराशी असावी . या अंध श्रद्धे पोटी एक्कड दुक्कड गायी पाहायला मिळतात . ग्रामीण तसेच शहरी भागात – मोठ्या मानवी वस्त्यां मध्ये सुद्धा अशा प्रकारच्या व्यवस्थेत असलेल्या गायी आहेत .फक्त धार्मिकतेच्या कारणा मुळे असल्या मुळे हे गायींचे मालक या गायींना दिवसभर काहीही खायला टाकत नाहीत . तिचे दिवसभराचे पोट भरणे हे त्या गायीच्या गल्लोगल्ली वस्ती मध्ये फिरून तिचे स्वतःचे स्वतःलाच अन्न शोधन करणे पडत आहे . ग्रामीण वस्ती मध्ये चार घरे संपल्या नंतर मोकळे शेत – माळरान दिसते . येथे जनावरांना नैसर्गिक चारा गवत काडी खायला मिळते .त्या मुळे ग्रामीण मध्ये चार घरचे शिजलेले अन्न नैवेद्य म्हणून केलेली भाकरी चाणकी खाल्ल्या नंतर ह्या गायी मोकळ्या जागेवर जाऊन त्यांचे नैसर्गिक अन्न मूळ अन्नघटक ग्रहण करतात . असे जास्त प्रमाणात नैसर्गिक अन्न खाल्ल्या मुळे ग्रामीण भागातील गायी बऱ्या पैकी भारतीय गायीच्या रूपात अजूनही दिसतात . त्यांचे पासून मिळणारे शेण सुद्धा चांगले असते .परंतु तेच मोठ्या वस्त्यां मध्ये गल्लोगल्ली फिरत जाणारी गाय , दारोदार उभी राहात प्रत्येक घरातील धार्मिक ते चा भाग म्हणून गायी साठी मुद्दामून तयार केलेली चाणकी म्हणजे छोटी भाकरी हे त्या वस्तीतील प्रत्येक घरातील स्त्रिया आणि काही वेळा पुरुष सुद्धा त्या गायींना खाऊ घालतात . तसेच तिच्या भोवती चक्कर मारून तिला स्पर्श करून दर्शन घेतात . मोठ्या वस्ती मध्ये लांबच्या लांब कॉलनी असतात . शेकडोच्या संख्येत एकाच वेळी घरे असतात . तेव्हा शेकडो घर फिरतांना घर तेथे धार्मिकतेच्या नावा खाली गायीचा घास म्हणून तयार केलेली नैवेद्याची भाकरी , असे शेकडो घास शिजलेले अन्न ती गाय खात चालते . शिवाय आजकाल प्रत्येक घरांमध्ये चार माणसेच असतात . परंतु चारही जणांच्या जिभेला अलग अलग चवींचे पदार्थ अलग अलग भाज्या पाहिजे असतात . पूर्वीच्या काळी एकाच भल्या मोठ्या गजां मध्ये केलेली भाजी घरातील पूर्ण पन्नास-साठ सदस्यांना चालायची – गोड लागायची . आता मात्र चवणे -चोचले वाढल्या मुळे चार प्रकारच्या भाज्या बनवाव्या लागतात . त्या पूर्ण खाल्ल्या जात नाही म्हणून दुसऱ्या दिवशी दारा पुढे येणार या गायीला त्या भरभरून टाकल्या जातात . अशा प्रकारे धार्मिकतेच्या नावा खाली दिलेली नैवेद्याची चानकी व उरलेली अगोदरच्या दिवशी ची भाजी . अशा प्रकारचे शिजवलेले अन्न अगदी नैसर्गिक अवस्थेतील अन्न खाणाऱ्या पशूला गायीला खाऊ घातले जात आहे . हिरवे गवत चारा कुटार खाऊन , पशू प्रकृतीने दिलेल्या चार जठरां मधून रवंथ करण्याच्या प्रक्रियेच्या माध्यमातून जीवन जगणाऱ्या या मुक्या प्राण्याला मानवाने धार्मिकतेच्या अंधानुकरणा पायी त्या गाईंनाच धर्म संकटात टाकले आहे .
दारोदार फिरून शिजलेले अन्न खाऊन गायींच्या प्रकृती मध्ये इतके बिघाड झाली आहे कि , आता गायीच्या शेना ला हात लावणे तर सोडाच शेण पडलेल्या जागेवर थांबून त्याचा वास सहन करणे सुद्धा अशक्यप्राय होऊन बसले आहे . शहरातील गायींच्या शेणाचा वास जवळपास मानवी विष्ठे सारखा यायला लागला आहे . अशातच काही महाभाग प्लास्टिक पन्नी मध्ये उरलेल्या भाज्या तेलकट तुपकट उष्टे अन्न पदार्थ उघड्या रस्त्यावर प्लास्टिक मध्ये तसेच टाकून जातात . ते पदार्थ खाण्याच्या प्रयत्नात या मुक्या जनावरांच्या पोटातील प्लास्टीक पन्नी सुद्धा जात आहे . त्या मुळे यांची पाचन प्रणाली मंदावते . शिजलेले अन्न सोबत प्लॅस्टिक पन्नी ,या कारणांनी शहरातील गायी एखाद्या पॅराशुट प्रमाणे फुगलेल्या दिसतात . धार्मिकतेच्या नावा खाली असेच चालत राहिले तर , एक दिवस भारतीय गाय भारतातून संपून जाईल . लुप्त होईल . तेव्हा डोळसपणे सद्सदविवेक बुद्धीने डोके चालवून सुज्ञ भारतीयांनी मोकाट गायींना शक्य होईल तोवर एक घासही कशाचाही चारू नये ! कारण ज्या मालकांनी त्या गायी वागविल्यात त्यांनीच वास्तविक तिचे भरण पोषण केले पाहिजे . परंतु धार्मिकतेच्या नावा खाली दिवसभर ती गाय स्वतः फिरून तिचे पोट भरून सकाळ संध्याकाळ याचे कडे दूध द्यायला हजर होते , म्हणून त्या लोकांना फावते . परंतु दाराशी आलेली गाय तशीच परत पाठवू नये . या अंध बिनबुडाच्या विचारा पोटी ज्यांना जमतच नसेल . त्यांनी कृपया शिजलेल्या अन्नाच्या ऐवजी मुद्दामून या फिरत्या गायीं साठी त्यांना द्यावयाचा घास म्हणून पशूंना चालणारा आहार म्हणजे ढेप , चुरी , गवत – चारा आणून ठेवावा . हा पशु आहारच त्यांना धार्मिकतेच्या नावा खाली घास म्हणून भरवावा . असे प्रकर्षाने करावे . असे केले तरच भारतीय गाय वाचेल . तसे ही आता शास्त्रीय दृष्ट्या म्हशी पेक्षाही गाईचे दूध उत्कृष्ट आहे असे प्रयोगा अंती सिद्ध झालेले आहे . म्हणून पुन्हा एकदा गाईंचे महत्त्व वाढणार आहेच . परंतु या करिता भारतीय गाय खऱ्या अर्थाने भारतीय गाय म्हणून जिवंत असली पाहिजे . शिजलेले अन्न खाऊन जगत असेल तर तिच्या मधील आंतरिक बदलां मुळे सदोष भारतीय गाय तयार होण्याची भिती जास्त आहे .

जय महाराष्ट्र ! जय हिंद !!

अशोकराव घनोकार
नांदुरा .
९७६३०५५०७१ .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here