ना. नितीन गडकरी, नागरी ऊड्डान राज्यमंञी जनरल व्हि के सिंग व अधिकार्‍या समवेत दिल्ली येथे घेतली अमरावती अकोला विमानतळ सूविधेसाठी ऊच्चस्तरीय बैठक !

0
19

बाळासाहेब नेरकर, जगदिश न्युज प्रतिनिधी

केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांनी केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री जनरल जनरल व्हि.के सींग जी आणि अधिकाऱ्यांसोबत अमरावती व अकोला विमानतळांसंदर्भात उच्चस्तरीय बैठक घेतली. भविष्यातील गरज लक्षात घेता प्रवासी आणि मालवाहक विमानांसाठी मोठी धावपट्टी आणि ॲाल वेदर टेक ॲाफ/लॅंडिग सुविधा करण्याच्या सूचना श्री गडकरीजी यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

याप्रसंगी आ. वसंत खंडेलवाल, आ. राजेंद्र पाटनी बैठकीस उपस्थित होते.
अकोला, शिवनी विमानतळ हे ऑलवेदर अर्थात सर्व प्रकारच्या हवामानामध्ये उपलब्ध होणारे विमानतळ म्हणून विकसित होणार आहे. यासाठी आज दिल्ली येथे केंद्रीय रस्ते मंत्री श्री नितीन गडकरी जी यांनी व नागरी हवाई केंद्रीय राज्यमंत्री जनरल व्हि.के.सिंग जी यांच्या उपस्थितीत विशेष बैठकीचे आयोजन केले होते.
यामध्ये आमदार वसंत खंडेलवाल, आमदर राजेंद्र पाटनी, एयरपोर्ट अथॉरिटी चेअरमन संजय कुमार, एव्हिएशन सेक्रेटरी आणि जॉईंट सेक्रेटरी, अकोला जिल्हाधिकारी निमा अरोरा , अमरावतीच्या जिल्हाधिकारी पवणीत कौर, महाराष्ट्र एव्हिएशन सेक्रेटरी वलसा नायर, महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट अथोरिटी चे पदाधिकारी च्या उपस्थितीत ही बैठक दिल्ली येथे झाली. केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी जी अकोला येथे उड्डाणपुलाच्या उद्घाटनासाठी आलेले असतांना आपल्या भाषणात त्यांनी विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी आणि विकासाबाबत आश्वासन दिले होते, त्याचा पाठपुरावा विधान परिषद आमदार वसंत खंडेलवाल यांनी मंत्री श्री नितीन गडकरी जी यांच्याकडे सातत्याने केला. आज त्या पाठपुराव्याला केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी जी यांच्यामुळे यश प्राप्त झाले आहे. भविष्यातील प्रवासी व मालवाहतुकीची गरज पाहता अकोला विमानतळ ऑलवेदर टेक ऑफ आणि लँडिग सुविधा करण्याच्या सुचना यावेळी मंत्री श्री नितीन गडकरी जी यांनी अधिकार्‍यांना दिल्यात.
त्याच बरोबर यावेळी आमदार वसंत खंडेलवाल यांनी नाईट लँडिंग टेकोफ साठी देखील अकोला विमानतळ सुसज्ज करण्याची मागणी केली. यावेळी अकोला विमानतळ हे ऑल वेदर लँडिंग सुविधेसह उपलब्ध होण्यासाठी मान्यता देण्यात आली. त्याच बरोबर अकोला विमानतळ विस्तारीकरणासाठी अडचणींचे मुद्दे सोडविण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here