वीजबिल वसुली थांबवा ! अन्यथा जीवानिशी ठार मारेल !! आरोपीची महावितरण च्या वरिष्ठ तंत्रज्ञास जीवे ठार मारण्याची धमकी !!!

0
35

गिरीश पळसोदकर, जगदिश न्युज प्रतिनिधी,खामगाव

पिंपळगाव राजा ३३ केव्ही उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या महावितरण कार्यालय भाग २ चे वरिष्ठ तंत्रज्ञ नितीन मोहनलाल शर्मा हे विद्युत पुरवठा देखभाल,दुरुस्ती व वीज देयकांची वसुली निमकवळा येथे करीत असताना निमकवळा येथील उजवल वसंतराव इंगळे या आरोपीने त्यांना वीजबिल वसुली थांबवा,अन्यथा तुम्हाला जीवे ठार मारण्याची धमकी बुधवार दि.२९ जून रोजी दुपारी दिली.

याबाबतची तक्रार महावितरण चे वरिष्ठ तंत्रज्ञ नितीन मोहनलाल शर्मा यांनी पिंपळगाव राजा पोलिस ठाण्यात दिली.
तक्रारीच्या अनुषंगाने पिंपळगाव राजा पोलिसांनी तापसकामी चक्र फिरवून निमकवळा येथील आरोपी उजवल वसंतराव इंगळे या आरोपीविरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी कलम २९६,१८४,५०४,५०६ भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.महावितरण चे तंत्रज्ञ नितीन मोहनलाल शर्मा हे त्यांच्या निमकवळा कार्यक्षेत्रात आपली नियोजित कामगिरी करीत असताना गावातील गावगुंडांचा त्यांना वीज बिल वसुली करता कामा नये यासाठी धमक्या देत असून काल दुपारच्या सुमारास उजवल इंगळे या आरोपीने त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली.महावितरण कंपनी चे कर्मचारी हे जीवाचे रान करीत विद्युत पुरवठा सुरळीत राहावा,याकरिता प्रयत्न करत असतानाच असे प्रकार पिंपळगाव राजा महावितरण च्या कार्यक्षेत्रात घडत आहेत.गेल्या आठवडा भरा पूर्वी एका लाईनमन ला खेडेगावात काही गुंड प्रवृत्ती च्या टोळक्यांनी धुतले होते,त्याला कारणही तसेच होते,त्यामुळे कायम नागरिकांची विद्युत पुरवठा संबंधित कामे वेळेवर करणाऱ्या कर्मचाऱ्यांना धमक्या न देता,त्यांच्याकडून कामे करून घेण्यात यावी,असे आवाहन महावितरण कंपनी चे स्थानिक अभियंता विनोद थाटे,पंकज मिश्रा,यांनी केले आहे.याबाबत नागरिकांशी बोलल्यावर नागरिकांनी महावितरण चे वरिष्ठ तंत्रज्ञ नितीन शर्मा हे त्यांचे कर्तव्य पार पाडत असतांना आरोपीने त्यांच्याशी वाद घालून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे सांगितले. याबाबत आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिक महावितरण कंपनी च्या तंत्रज्ञांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here