शाळा सुरू होवुन दोन दिवस उलटले मात्र ग्रामीण भागातील बसफेऱ्या बंद असल्याने शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान !

0
46

कैलास काळे, मलकापुर न्युज प्रतिनिधी ,मलकापुर

नव्या शैक्षणिक सत्रानुसार दोन दिवसांपुर्वी सर्व शाळा, महाविद्यालय सुरू झाले आहे मात्र बसेस सुरू न झाल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी तारेवरची मोठी कसरतच करावी लागत असल्याने विद्यार्थ्यांनी हि बाब मनसे जिल्हाध्यक्ष (परीवहन) गजानन ठोसर यांना सांगितली.
आज सकाळी विद्यार्थ्यांना घेऊन जिल्हाध्यक्ष गजानन ठोसर, किशोर राऊत, मंगेश सातव, संजय कातव,गुणवंत गलवाडे आदी पदाधिकाऱ्यांना सोबत घेत आगार व्यवस्थापक दादाराव दराडे यांचे कार्यालय गाठले शैक्षणिक सत्रानुसार शाळा सुरू होवुन दोन दिवस उलटले मात्र बसेस सुरू होत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा जाब विचारताच सोमवार पासुन बसेस सोडण्यात येणार असल्याचे आगार व्यवस्थापक दादाराव दराडे यांनी सांगितले. यावेळी राहुल घोंगटे आव्हा, राहुल हिवाळे काटी, मंगेश अढाव, दिनानाथ गारमोडे,प्रज्वल हिवाळे,धिरज हिवाळे,मोहन सोनोने, गजानन मास्कर,सागर हिवाळे,आदर खरसने सह तालुक्यातील असंख्य विद्यार्थी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here