नांदुरेकरांनी ७५ किमी सायकलिंग करून साजरा केला स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव !

0
305
जोसात निघाले विर मावळे एकसाथ !

रोषण आगरकर, ऊपसंपादक : जगदिश न्युज

नांदुरा दि .१४ -८-२२ स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सर्वत्र गौरव- यात्रा ,सांस्कृतिक कार्यक्रम ,आरोग्य शिबिरे ,वृक्षारोपण ,देशभक्तिपर गीत गायन स्पर्धा ,अशा विविधांगी देश गौरव कार्यक्रमाचे आयोजन करून साजरा केला जात आहे. भारत सरकारच्या वतीने हर घर तिरंगा मोहीम राबवली जात आहे. सर्वत्र देश भक्तीचे व उत्साहाचे वातावरण आहे.
नेहमीच सामाजिक व वैचारिक परिवर्तन घडविणाऱ्या मा जिजाऊ सावित्री विचार मंच ,नांदुरा च्या वतीने अमृत महोत्सवा निमित्त नांदुरा ते वाघजाळ फाटा व परत नांदुरा असे ७५किमी सायकलींग चे आयोजन केले होते . या सायकलींग मधे सवश्री अशोकराव घनोकार , डॉ संदीप डवंगे ,फार्मा . गिरीश चांडक व लक्ष्मणराव वक्टे , नेत्र चिकित्सक डॉ. शरद पाटील ,सौ स्वातीताई दीपक फाळके, नागेशजी डुकरे पाटील , अनंतराव उंबरकर , सार्थक गायकवाड यांनी सहभाग घेतला . तेव्हा मार्गात शेंबा येथे सुनिलभाऊ जुनारे व मोताळा येथे ॲड. सोनोने साहेब यांनी सायकलिस्ट यांना चहा – नाश्ता ची व्यवस्था केली होती . अश्या प्रकारे नांदूरेकरांनी ७५व्या स्वात्रंत्योत्सवानिमित्त सशक्त भारत जनजागृती चे दर्शन घडवले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here