तथाकथीत नेत्या सुषमा अंधारे ज्या पक्षात राहील ! त्या पक्षाला मतदान न करण्याचा वारकऱ्यांनी घेतली शपत !!

0
6476

बाळासाहेब नेरकर, जगदिश न्युज प्रतिनिधी, अकोला

उद्धवराव ठाकरे साहेबांनी सुषमा अंधारेला आपल्या पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवावा – विश्व वारकरी सेना

महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि या संतभूमीमध्ये सुषमा अंधारे या हिंदू धर्मातील देव, देवी संत, महंतांच्या बद्दल पातळी सोडून बोलण्याचे व्हिडिओ पूर्ण महाराष्ट्रात व्हायरल होत आहेत आणि त्यामुळे वारकरी संप्रदायात फार मोठी संतापाची लाट उसळली असून मुळात नास्तिक असणाऱ्या सुषमा अंधारे यांना माननीय उद्धवरावजी ठाकरे साहेब यांनी आपल्या पक्षात शिवसेना नेत्याचे स्थान दिलेले आहे .आज हिंदुह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी या महिलेला कधीही आपल्या पक्षांमध्ये स्थान दिले नसते ! अशा सर्व बाबींचा विचार करून विश्व वारकरी सेनेच्या वतीने गंगासागर येथे गंगेच्या पात्रात प्रमुख सन्माननीय वारकऱ्यांनी एकत्र येऊन शपथ घेतली कि, ज्या पक्षांमध्ये सुषमा अंधारे राहील आम्ही त्या पक्षाला मतदान करणार नाही म्हणून विश्व वारकरी सेनेच्या वतीने उद्धव ठाकरे साहेबांना पत्र पाठवले व त्या महिलेला आपल्या पक्षातून ताबडतोब बाहेर काढावे अन्यथा महाराष्ट्रातील सर्व वारकरी ज्ञानेश्वरी ग्रंथावर हात ठेवून शपथ घेतील यापुढे आम्ही ज्या राजकीय पक्षात सुषमा अंधारे आहे त्या पक्षाला मतदान करणार नाही असा इशारा विश्व वारकरी सेनेचे संस्थापक अध्यक्ष ह भ प श्री गणेश महाराज शेटे यांनी दिला आहे. आता या मुद्यावर ,,शिवसेना ऊध्दव बाळासाहेब ठाकरे,, पक्षप्रमुख काय निर्णय घेतात याकडे तमाम वारकरी संप्रदायाचे लक्ष लागलेले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here