महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर व धाराशीव शहरांचे केंद्र व राज्य सरकारने केलेल्या नामांतराला पाठींबा व अभिनंदन चे नांदुरा तहसीलदार यांना दिले निवेदन !

0
84

नांदुरा : प्रतिनिधी
औरंगाबाद व उस्मानाबादचे अशा तथाकथीत शहराचे नावामुळे जनतेमध्ये गेल्या अनेक वर्षापासुन तिव्र नाराजी होती.
दरम्यान महाराष्ट्र शासनाने वरील दोन्ही शहरांचे नामकरण अनुक्रमे छत्रपती संभाजीनगर व धाराशिव करून अंतिम मंजुरातीसाठी केंद्र शासनाकडे पाठविलेल्या प्रस्तावाला पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे नेतृत्वातील सरकारने मान्यता दिली होती.
शासनाचे अभिनंदनीय निर्णयाला पाठींबा दर्शविणारे व अभिनंदन करणारे निवेदन सोमवार दि.२७ मार्च रोजी माॅं जिजाऊ सावित्री विचार मंच चे वतीने पंतप्रधान व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना दि. ल. मुकुंदे,तहसीलदार साहेब नांदुरा यांचे कार्यालया मार्फत निवेदन देण्यात आले.

सदर निवेदनाच्या प्रतिलिपी मान . प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी तसेच मा.खासदार, आमदार,मा. आयुक्त कार्यालय संभाजीनगर व जिल्हाधिकारी बुलढाणा यांना पाठविण्यात आलेल्या आहेत.
याप्रसंगी माॅं जिजाऊ सावित्री विचार मंच चे संयोजक अशोकराव घनोकार, किशोरभाऊ देशमुख,जनार्धनभाऊ पवार , निलेश देशमुख सर , रुपेश पवार, अंकुश देशमुख ,लताताई ठोंबरे, पुरुषोत्तम भातुरकर,यांचेसह अनेक शिवप्रेमी नागरीक उपस्थित होते. अशी माहीती प्रसिध्दी प्रमुख जगदीश आगरकर यांनी एका प्रसिध्दीपत्रा द्वारे दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here