
भुमिपुजन कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजका कडुन करण्यात आले आहे !!
बाळासाहेब नेरकर,अकोला
अकोला म्हैसपूर येथे होत असलेल्या शिवमहापुराण महाकथेचे महामंडपाचे भूमिपूजन समारोह रामनवमीच्या शुभमुहूर्तावर गुरुवार, दि. 30 मार्च 2023 रोजी सकाळी 8 वाजता होणार आहे. अकोला शहराजवळील पातुर रोडवरील म्हैसपुर ह्या गावी होत असलेल्या 200 एकर च्या मोकळ्या जागेत श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ वक्ते बालकथा व्यास पं श्री कृष्णाजी दुबे याची सकाळी 9 ते 12 वाजे दरम्यान व शिवपुराण कथा वक्ते पंडित प्रदीपजी महाराज मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथा दुपारी 1वाजेपासुन तर 4 वाजे प्रर्यन्त ह्या दोन्ही कार्यक्रमाच्या निमित्ताने विजय जगदीशप्रसाद दुबे व श्री रूपेश (बंटी) चौरसिया यांच्या मार्गदर्शनाखाली 40 एकरात मंडप उभारण्यात येत आहे विविध समित्याचे पदाधिकारी व कार्यकर्ते भव्य दिव्य स्वरूपात कथेच्या परिपुर्णते बाबत युध्दपातळीवर प्रयत्न करत आहे. गावोगावी जावुन सभा घेवून प्रत्येक नागरीकाला, सेवाधारीला आमंत्रण देण्यात येत आहे त्याचा उत्कृष्ट प्रतिसाद सुद्धा मिळत आहे. भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही यासाठी वेगवेगळ्या समितींच्या माध्यमातून चोख नियोजन करण्यात येत आहे.
अकोला शहराजवळील म्हैसपुर ह्या विस्तीर्ण अशा 200 एकरच्या परिसरात 5 मे ते 11 मे या दरम्यान राष्ट्रीय पातळीवरील शिवपुराणकथेचे आपल्या ओजस्वीवाणीतुन निरूपण करणारे पंडित प्रदीप महाराज मिश्रा यांच्या शिवपुराण कथेचे दुपारी 1 ते 4 ह्या वेळात आयोजन करण्यात आलेले आहे. व ह्याच मंडपात सकाळी 9 ते 12 वाजे वाजेप्रर्यत श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ वक्ते बालकथा व्यास पं श्री कृष्णाजी दुबे याची कथा आयोजीत केली आहे ह्या कथेसाठी सात लाख ते दहा लाख भाविक उपस्थित राहतील असा अंदाज आहे. कथेसाठी 40 एकरात मंडप उभारण्यात येत आहे कथेच्या निमित्ताने संपूर्ण परिसर हा स्वच्छ करण्यात येईल. बाहेर गावाहून येणाऱ्या वाहनांची पार्किंग व्यवस्था यावरही विशेष भर देण्यात येत आहे. केवळ अकोला जिल्हाच नव्हे तर संपूर्ण विदर्भ तसेच परराज्यातूनही भाविक श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ व शिवपुराण कथेचे श्रवण करण्यासाठी म्हैसपुर अकोला शहरात येणार आहेत.अकोला शहरातून कथेसाठी येणाऱ्या भाविकांसाठी 50 एकराची पार्किंग वाशिम, पातुर, बार्शिटाकळी, मेहकर, वाडेगाव कडुन येण्याजाण्यासाठी 50 एकराची पार्किंग व्यवस्था उभारण्यात येणार आहे त्याचबरोबर 150 सीसीटीव्ही कॅमेराच्या माध्यमातून संपूर्ण परिसराची सुरक्षा यंत्रणा देखरेखी खाली राहणार आहे. 24 एलईडी च्या माध्यमातून भाविकांना कथा पाहता / ऐकता येणार आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र 1000 खुर्च्याची आसन व्यवस्था करण्यात आली असुन रिक्षा ची व्यवस्था ही करण्यात आली आहे आपत्कालीन स्थितीसाठी पाच रुग्णवाहिका डॉक्टर सह मेडीकल औषधिसह तैनात करण्यात.यईल येथील भाविकांसाठी मोफत 20 लाख लिटर पाणी, 300 कुलर मंडप थंड करण्यासाठी फोगर फवारे तसेच दहा हजार सेवेकरी सेवेत राहणार आहेत इतर साहित्यांची व्यवस्था करण्यात येत असून जवळपास 300 दुकाने थाटण्यात येणार आहेत. यात धार्मिक साहित्य विक्री, पूजा साहित्य आणि अयोध्या तसेच मथुरा येथील स्वादिष्ट अशा मिठाई आणि भोजन सामग्रीचे दुकाने थाटण्यात येणार आहेत. दररोज निशुल्क एक ते दीड लाख लोकांची सकाळी 8 ते रात्री 10 वाजे प्रयत्न भोजनाची संपूर्ण व्यवस्था अकोला शहरातील भाविकांसाठी बस स्थानक आणि रेल्वे स्टेशन येथून कथा मंडपात पर्यंत येण्यासाठी ऑटोरिक्षा ची व्यवस्था ही करण्यात आलेली आहे. वैद्यकीय कक्षा सह तयार होत असून महीला करीता तयार होत असून महीला करीता 250 स्वच्छतागृह पुरूषा करीता 250 स्वच्छतागृह आणि इतर यंत्रणा देखील सज्ज ठेवण्यात येणार आहेत.येणाऱ्या महिला भाविकांच्या सुरक्षेसाठी शंभर महिला बाऊन्सर मदतीला राहणार आहेत. एकूणच या सर्व कार्यासंदर्भात दररोज विजय जगदीशप्रसाद दुबे व श्री रूपेश (बंटी) चौरसिया, श्री शांतीकुमार चौरसिया, निलेश चौरसिया, संदीप चौरसिया, पंकज चौरसिया, राजेश राठी , अशोक ताकवाले , विजय केडीया गजानन खोलगाडे GKG , कमलकिशोर शर्मा, शैलेद्र पवार ,महेंद्र बगडीया ,रामा हरणे व म्हैसपुर येथील नागरीक जातीने लक्ष देत असून कार्यकर्त्यांच्या मदतीने कार्य पूर्ण करून घेत आहेत. अधिक माहीती साठी संपर्क श्री विजय दुबे जी मो. ९९२१४१५३५६, श्री रूपेश (बंटी) चौरसियाजी मो.
८४४६०३५६७९ अर्जुन समाज बहुउद्देशीय व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळयांचेशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले.व भुमिपुजन कार्यक्रमाला जास्तीत जास्त सख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजका कडुन करण्यात आले आहे