
मोदी नंबर -1 !
भारतातील टॉप १०० पॉवरफुल्ल व्यक्तींची यादी प्रकाशित करण्यात आली आहे. इंडियन एक्सप्रेस ग्रुपने ही १०० भारतीयांची यादी प्रसिद्ध केली असून याही यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिल्या नंबरवर आहेत. तर, देशाचे गृहमंत्री अमित शहांचा दुसरा नंबर लागतो.
त्यामुळे, मोदींनी पुन्हा एकदा आपला नंबर १ ठेवण्यात यश मिळवल्याचं दिसून येतं.
या यादीत काँग्रेस नेते राहुल गांधी १५ व्या क्रमांकावर असून अरविंद केजरीवाल हे १६ व्या स्थानी आहेत. या यादीत ईडीचे प्रमुख संजय कुमार मिश्रा हे १८ व्या स्थानी आहेत. तर, देशाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती डी.वाय. चंद्रचूड हे ४ थ्या स्थानावर आहेत. संघ प्रमुख मोहन भागवत (६), मुकेश अंबानी (९), ममता बनर्जी (१३), नीतीश कुमार (१४), टाटा सन्सचे चेअरमन नटराजन चंद्रशेखरन (२२), काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (२३) व्या स्थानी आहेत. गौतम अदानी (३३), स्मृति ईरानी (३७), तेजस्वी प्रसाद यादव (४०) व्या स्थानी आहेत.