श्री अरूणभाऊ खुटाफळे यांची पोलीस दलातून सेवा निवृत्तीचा दिवस!

0
65

प्रत्येक जण त्याच्या आयुष्यात अनेकदा विविध जबाबदारीतुन मुक्त होत असतो. जर कोणी मुलांच्या लग्नाच्या जबाबदारी मधून मुक्त झाले. म्हणजे त्यांची जबाबदारी संपली असे नाही! तर आपण ज्या मानव समाजा मधे रात्रंदिवस राहतो त्यांच्या प्रती आपली जी जबाबदारी असते. त्या करीता आपल्याला आपल्या जीवनात आलेल्या अनुभवाचे वाटप इतर समाजाला आपल्याकडून आपसुकच होत असते.म्हणजे आपली जबाबदारी संपली असे कधीही होत नाही.तर फक्त आपल्यावर असलेली कर्तव्याची जबाबदारी संपली पण आपण आयुष्यभर कर्तव्य करत असताना आपल्या जवळ तयार झालेल्या चांगल्या वाईट अनुभवाच्या शिदोरीतून आपण पुढील पिढीस जे मार्गदर्शन करतो ती फार मोठी जबाबदारी निवृत्ती नंतर येऊन पडत असते.

आपण ज्या क्षेत्रात काम केले आहे निवृत्त काळा नंतर आपली तिथं उणीव भासने हीच खरी आपण केलेल्या कर्तव्याची पावती असते आणि माननीय अरुणभाऊ खुटाफळे आपण ही पावती नक्कीच प्राप्त केली आहे.

सूर्या सारखे तळपुन जावे क्षितिजावर जातांना ,सर्वां हृदयाशी पाझर यावा निरोप तुम्हा देतांना

सहवास सुटला म्हणजे सोबत काही सुटत नसते, निरोप दिला म्हणजे नाते काही तुटत नसते|
धागे असतात जुळलेले हृदयाचे हृदयाशी , आपला माणूस कर्तव्यातुन मुक्त झाला तरी प्रेम काही आटत नसते|||

अरूणभाऊ तुमचे तुमच्या पोलीस या पदाकरिता असलेले समर्पण खरोखरीच पोलीस प्रशासनाच्या कार्यात एक आठवण म्हणून,तुमच्या नंतरच्या पोलीस पिढी करीता एक दीपस्तंभ म्हणून प्रेरक व मार्गदर्शक ठरेल.

अरुणभाऊ सेवा निवृत्ती म्हणजे फक्त तुम्ही पूर्ण हयात समर्पित भावनेने केलेली कर्तव्य पालनता होय. पोलीस दलातुन सेवेतून निवृत्ती होय! बाकी राहिलेले जीवनात होय मीच तो तुमचा अरुण खुटाफळे! ही आठवण तुमच्या जीवनशैलीतून ज्या पुढील पिढीस आपण देणार त्या करीता राहिलेल्या जीवनातून सेवा निवृत्ती ही नसणारच उलट,पोलीस दलात केलेल्या समर्पित भावनेच्या कर्तव्याची आठवण आपणास सामाजिक जीवनात देखील तुमच्या जीवन शैलीतून द्यावी लागेल जेणे करून पुढील पिढीच्या जीवनाला दिशा दर्शकतेचे काम आपल्याकडून आपसूकच होईल यात शंकाच नाही.

::–अजय घनोकार,नांदुरा
9422943970

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here