बोरी अडगांव येथे शेतातील घरामध्ये झोपलेल्या तायडे कुटुंबीयांवर धारदार कोयत्याने केला हल्ला ! ४ गंभीर जखमी !!

0
184

गिरीश पळसोदकर, जगदीश न्युज प्रतिनिधी,खामगाव

तालुक्यातील ग्राम बोरी अडगाव येथील शेतशिवारात असलेल्या घरात 30 मे रोजी रात्री झोपलेल्या मारुती तायडे आपल्या कुटुंबीयासह झोपलेले असतांना बंद दारापलीकडुन दरवाजाची साखळी वाजऊन आवाज दिला असता एवढ्या रात्री कोण आले हे पाहण्यासाठी दरवाजा ऊघडला असता अचानक अज्ञात ५ ईसमांच्या टोळके जबरदस्तीने घरात शिरले त्यांनी आई व कुटुंबातील सदस्यावर अज्ञात दरोडेखरांनी घरात प्रवेश करून वृद्ध महिलेसह चौघा वर रात्री सुमारे दहाच्या सुमारास धारदार शस्त्राने हल्ला करून गंभीर जखमी करून पलायन केल्याची घटना घडली आहे.

सदर घटना घडतेवेळी तायडे कुटुंबीयांनी केलेल्या आवाजामुळे कुणीही मदतीसाठी येऊ शकले नाही.दिवस ऊजाडताच सदर चे वृत्त समजताच मारोती तायडे यांचे शेतातील घराकडे अनेक लोक काय झाले होते हे पाहण्यासाठी जमले होते. गावात या घटनेमुळे खळबळ निर्माण झालेली असुन भितीयुक्त वातावरण निर्माण झालेले आहे.

सदर घटनेमध्ये जखमीं झालेल्यांना तत्काळ महात्मा ज्योतिबा फुले उपजिल्हा सामान्य रुग्णालय येथे भरती करण्यात आले याबाबत मिळालेल्या माहितीनुसार खामगाव तालुक्यातील बोरी अडगाव गावातील रहिवासी मारोती तायडे यांचे कुटुंबातील मुले त्यांची आई बायको ह्या आपल्या शेतातील राहत्या घरी ही संजय रोजी रात्री आराम करीत होते. रात्री दहा वाजे दरम्यान 5 अज्ञात दरोडेखोरांनी घरामध्ये प्रवेश करून धारदार कोयत्याने घरातील झोपलेल्या सर्व सदस्यावर हल्ला चढविला यामध्ये वैभव मारुती तायडे वय (२६ वर्ष) गौरव मारुती तायडे (25 वर्ष) व ज्योती मारुती तायडे (45 वर्षे)$ सुधाबाई तायडे व (75 वर्ष) अशा ४ व्यक्ती गंभीर जखमी झाले. हल्लेखोरांनी काही दागदागीने व पैशाची लुट केली काय आबाबत अद्याप माहीती मिळाली नाही. हल्लेखोरांचा ऊद्देश काय होता हे सुद्बा तपास प्राथमीक अवस्थेत असल्यामुळे या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी ठाकरे साहेब, पोलीस निरीक्षक नाईक नवरे, बीट जामदार चांद व पोलिसा ंच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली व सर्वप्रथम रक्तांचे थारोळ्यात विव्हळत असलेल्या गंभीर जखमींना तात्काळ ऊपचारासाठी खामगाव येथील महात्मा ज्योतिबा फुले सामान्य रुग्णालय खामगाव येथे भरती करण्यात आलेले आले.
सदरील घटनेमुळे गावांत एकच भीतीचे वातावरण निर्माण झाले असून लोकांमध्ये दहशत निर्माण झालेले दिसत आहे दरोडे खोरांचा शोध घेण्यासाठी पोलीस कर्मचारी संपूर्ण परिसर पिंजून काढताना दिसत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here