पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सौ पुष्पा रघुवीर सुशीर सन्मानित !

0
116

नांदुरा : रोषण आगरकर, ऊपसंपादक जगदीश न्युज

तालुक्यातील नारखेड येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती दिनांक 31 मे रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली शासन निर्णयानुसार महिला सक्षमीकरण क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सौ पुष्पा रघुवीर सुशीर यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यामध्ये सौ पुष्पा रघुवीर सुशीर व रीना राजू तायडे या दोन महिलांचा नारखेड ग्रामपंचायत सरपंच प्रसन्नजीत खंडेराव यांच्या हस्ते व मान्यवरांचे उपस्थित शाल श्रीफळ स्मृतिचिन्ह प्रमाणपत् व रोख रक्कम देऊन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.

शासन निर्णयानुसार सौ पुष्पा सुशीर व रीना तायडे यांनी बालविवाह प्रतिबंधक कायदा जनजागृती महिला सक्षमीकरण महिला आरोग्य महिला बचत गट घरगुती हिंसाचार जनजागृती महिला व बाल अधिकार अधिकार जनजागृती मुलींच्या शिक्षणासाठी पुढाकार महिला मतदार जनजागृती अभियान तसेच कोरोना काळातील महिलांमध्ये आरोग्य विषयी जनजागृती आदी विषयांमध्ये भरीव कामगिरी केल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला नारखेड ग्रामपंचायत मध्ये पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी ग्रामपंचायतचे सरपंच प्रसन्नजीत खंडेराव उपसरपंच बबीता नरसिंग डाबेराव ग्रामपंचायत सचिव विशाल दाभाडे ग्रामपंचायत सदस्य गजानन डाबेराव यांचे सह सामाजिक कार्यकर्ते पुंडलिक डाबेराव रघुवीर सुशिर नरसिंग डाबेराव पोलीस पाटील राजेश डाबेराव शिक्षक वृंद अंगणवाडी सेविका आशा सेविका ग्रामपंचायत कर्मचारी गावातील प्रतिष्ठित नागरिक पुरुष महिलांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here