
मुंबई वृत्तसेवा जगदीश न्युज
दिवसभर कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे रेल्वेची वाहतूक काही ठिकाणी खंडित झाली होती, तर काही ठिकाणी संथपणे सुरू होती. अशावेळी कार्यालयातून अथवा आपल्या कामधंद्यावरून घरी निघालेल्या मुंबईच्या चाकरमान्यांना लवकरात लवकर सुरक्षित घरी पोहोचता यावे, त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मी एसटी महामंडळाचे अध्यक्षांना एसटीला मुख्य रेल्वे स्थानकांजवळ आपल्या बसेस तैनात करण्याबाबत सुचना दिल्या. तसेच त्या बसेस द्वारे रेल्वे स्थानकात अडकलेल्या प्रवाशांची मोफत सोय करण्याचे निर्देशही दिले. त्यानुसार एसटीच्या मुंबई आणि ठाणे विभागाने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, कुर्ला, ठाणे, कल्याण इत्यादी महत्त्वाच्या रेल्वेस्थानकांवर आपल्या १०० पेक्षा जास्त बसेस लावून तेथून रेल्वे प्रवाशांना त्यांच्या निवासी क्षेत्रापर्यंत मोफत एस.टी. बस वाहतूक करण्याचे नियोजन करण्याचे सुविधेमुळे अडचनीत असलेले अनेक मुंबईकर आपआपल्या घरी पोहचु शकले .
मुंबईकर पावसात अडकलेले असताना बीएमसीकडून सध्या सुरु असलेलं कार्य कौतुकास्पद आहे. मुख्यमंत्र्याच्या निर्देशानुसार प्रवासात अडकलेल्या मुंबईकरांना चहा, बिस्किट, पाण्याचं वाटप सध्या मुंबईतल्या अनेक रेल्वे स्टेशनवर सुरु आहे. पावसात अडकलेल्या मुंबईकराला थोडासा का होईना यामुळे दिलासा मिळाला याचं समाधान आहे.