गिरीश पळसोदकर, जगदीश न्युज प्रतिनिधी,खामगाव
श्रींच्या पालखी सोबत शेगावला पायदळ जाणाऱ्या भाविकांसाठी २४ जुलै सोमवारी श्री ओम दयाळू आश्रम भक्त मंडळातर्फे खामगाव ते शेगाव मार्गावर पालखीसोबत ,पाई चालणाऱ्या भाविकांच्या पादत्राणे चप्पल बूट याच प्रमाणे छत्री पर्स इत्यादी मोफत दुरुस्ती केंद्रे सुरू राहणार असून भाविकांनी या चरणसेवेचा मोफत लाभ घ्यावा असे आवाहन ओम दयाळू आश्रम भक्त मंडळ खामगाव च्या वतीने करण्यात आले आहे खामगाव ते शेगाव या पालखी मार्गावर सिद्धिविनायक इंजिनिअरिंग कॉलेज जवळ माऊली इंजिनियर कॉलेज जवळ चिंचोली जवळ जवाहर नवोदय विद्यालयाजवळ अशा विविध सात ते आठ ठिकाणी हे सेवा केंद्रे सुविधा केंद्र सुरू करण्यात आलेले असून भाविकांनी या मोफत सेवेचा लाभ घेऊन सेवेची संधी द्यावी असे आवाहन भक्त मंडळातर्फे करण्यात आले आहे