
मुख्यमंत्री दिल्ली दौर्यावरून मुंबईला परत आल्यावर पत्रकारांशी बोलतांना म्हणाले की, “आज आमच्या चार पिढ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटल्या याचा मला निश्चितच आनंद आहे. आज माझी आई हवी होती असं मला आवर्जून वाटतं आहे. माझे वडील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून आनंदी झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटायचं ही त्यांचीही इच्छा होती.
पाऊस आणि दुर्देवी इर्शाळगड प्रकरण संबंधी ही त्यांनी माहीती विचारली असता आम्ही चर्चा केली त्यांनी ऊचित मार्गदर्शन ही केले.” असे मनोगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले !