
कैलास काळे , जगदीश न्युज प्रतिनिधी, मलकापुर, जि,बुलढाणा
आज शनिवार दि. २९ जुलै २०२३ रोजी भल्या पहाटे २ : ३० वाजे दरम्यान भरधाव वेगाने महामार्गाने जात असतांना २ लक्झरी बसेस आमोरासमोर एकमेकावर आदळ्यामुळे भिषण असा अपधात झाला. सदर अपघातात ६ जण ठार तर २२ जण जखमी झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वरील लक्ष्मी नगर जवळील उड्डाणपुलावर आज सकाळी दोन २.३० दरम्यान घडली.

या बाबत सविस्तर वृत्त असे की, अमरनाथ यात्रा करून हिंगोलीकडे परतणाऱ्या बालाजी ट्रॅव्हल्स क्रमांक एम एच ०८ ९४५८ तर नागपूरकडून नाशिककडे जात असलेल्या रॉयल ट्रॅव्हल्स क्र. एम.एच.२७ बी एक्स ४४६६ या दोन्ही वाहनांचा भीषण अपघात झाला.

एवढ्या रात्री झालेल्या या अपघाताची माहीती सदर महामार्गावरून धावणार्या ईतर वाने घटनास्थळाचे दोन्ही बाजुस थांबलेल्या वाहनातील लोक मततीसाठी धावले. सदर अपघाताचे वृत्त मलकापुर शहरात समजताच प्रशासकिय पोलीस अधिकारी , कर्मचारी घटनास्थळावर दाखल झाले. या अपघातात ५ जण जागीच ठार झाले असून दोन्ही ट्रॅव्हल्स मध्ये असणाऱ्या प्रवाशांपैकी २२ जण गंभीर जखमी झाले. त्यांना प्राथमिक उपचाराकरिता उपजिल्हा रुग्णालय मलकापूर येथे दाखल केले असता त्यांना पुढील उपचाराकरिता बुलढाणा येथे रेफर करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे.
अपघाताची माहिती मिळताच डीवाय एसपी दयाराम गवई, पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक तायडे यांच्या सह कर्मचारी दाखल झाले.
मलकापूर पोलीस कर्मचारी तथा परिसरातील विविध नागरिक मदतीला घटनास्थळी दाखल होवून अनेकांचे हात मदतीला सरसावले.
त्यामुळे या अपघातातील अनेकांना तात्काळ उपचारार्थ हलविण्यात येऊन अनेकांची प्राण वाचले. झालेल्या अपघातामुळे रस्त्यांवर
वाहनांच्या रांगा लागून वाहतूक ठप्प झाली होती. एक तासाच्या कालावधीनंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.
अपघात घडला त्याचवेळी पुसद येथील अनिरुद्ध जहागीरदार, यश सोनटक्के, प्रद्युम्न पावडे, शुभम जाधव, सागर परवाणी, हे आपल्या क्रुझरने उज्जैन येथे दर्शनाला जात असताना अपघात घडला त्यावेळी प्रथमदर्शनी म्हणून मदत कार्य करण्याकरिता तेथे थांबले. झालेल्या अपघाताची माहिती त्यांनी आमचे प्रतिनिधी कैलास काळे यांना दिली होती.

अपघातातील मृतकांची नावे खालील प्रमाणे समजली आहेत !
१) संतोष आनंदराव जगताप, रा. भाडेगाव ता. हिंगोली ( ड्रायव्हर), २) राधाबाई सखाराम गाडे, रा. जयपुर तालुका हिंगोली, ३) अर्चना गोपाल घुळसे, रा. लोहगाव ता. हिंगोली, ४) सचिन शिवाजी महाडे, रा. लोहगाव ता. हिंगोली, ५) शिवाजी धनाजी जगताप, रा. भाडेगाव ता. हिंगोली + अधिक एक मृतकाचे नाव समजले नाही.







गेल्या काही दिवसापुर्वी सिंधखेड राजा जवळ समृध्दी महामार्गावर झालेल्या अपघाताचा दोषारोप ,,समृध्दी महामार्ग,, दोषयुक्त असल्याचे तोंडसुख अनेकांनी सोशल मिडीयावर व्यक्त केलेले होते. खरादोष हा रात्रंदिवस अतीजलद चालविली जाणारी वाहने, डाॅयव्हरची अपुरी झोप, दारू पियुन वाहन चालविणारे डाॅयव्हर, अशा अनेक कारणामुळे अपघात घडुन येतात ! मग ती प्रवासी वाहने खाजगी असोत किंवा सरकारी !! अशा अपघाताच्या घटना घडल्या की पुढचे काही दिवस प्रशासन दक्ष होहुन वाहने तपासणी मोहीम सुरू होतात. पुढे पुन्हा हे अधिकारी आपल्या एअरकुल आलीशान आॅफीमध्ये बसुन आपल्या अधिनस्त असलेल्या कर्मचार्यांना सुचना देऊन निर्धास्त राहतात. दुर्देवाने गरज म्हनुन प्रवास करणार्यांचा मात्र आपले जीव अशा अपघातात गमवावे लागतात.