
पुणे : जिल्हा प्रतिनिधी,जगदीश न्युज
केंद्रीय गृह तथा सहकारमंत्री श्री. अमित शहाजी यांच्या हस्ते पुण्यातील सहकारी संस्थांच्या केंद्रीय निबंधक कार्यालयाच्या डिजिटल पोर्टलचे उद्घाटन आज झाले. देशाचे लोकप्रिय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांनी गेल्या ९ वर्षात ६० कोटींहून अधिक गरीब लोकांना सहकार क्षेत्राच्या माध्यमातून मदत केली आहे. सहकारातून समृद्धीकडे हा संकल्प हाती घेतला आहे. सहकार विभागाच्या माध्यमातून आपण पोर्टल आणत आहोत, महाराष्ट्रातील प्रत्येक साखर कारखान्यात इथेनॉलची निर्मिती व्हायला हवी यासाठी राज्य सरकारने पावलं उचलावीत, अशी भावना उद्घाटनाच्या कार्यक्रमात व्यक्त केली.
या कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय सहकार राज्यमंत्री बी. एल. वर्मा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, केंद्रीय सहकार सचिव ज्ञानेश कुमार, विशेष सचिव तथा केंद्रीय निबंधक विजय कुमार, राज्याचे सहकार विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार आदी उपस्थित होते.


