श्री क्षेत्र ओंकारेश्वर येथील पवित्र ,,नर्मदा नदी,, चे जल कावडद्वारे आणुन राजेश्वर शिवमंदीर येथे केला जलाभिषेक !

0
13

कैलास काळे, जगदीश न्युज प्रतिनिधी,मलकापूर

श्री क्षेत्र ओंकारेश्वर ज्योर्तिलिंग ते मलकापूर तब्बल २०० कि.मी. पायी कावड आणित छत्रपती शिवाजी नगर येथील राजेश्वर शिव मंदिरात त्या जलाचा अभिषेक करण्यात आला.

याबाबत अधिक वृत्त असे की, कावडधारी जय भवानी मंदिर ट्रस्टचे सचिव गजानन चव्हाण, अनिल सुर्यवंशी, गजराज साळुंके व गोलू पोंदे यांचा छत्रपती शिवाजी नगर वासियांनी ढोल-ताशाच्या निनादात रांगोळी काढून मोठ्या उत्साहात त्यांचे स्वागत केले.
बर्‍हाणपूर येथील शिवभक्त कावड यात्रा दरवर्षी ओंकारेश्वर ते बर्‍हाणपूर कावड यात्रेचे आयोजन करतात. शांतनु पाटीदार यांच्या अध्यक्षतेखाली ही कावड आयोजित केली जाते. छत्रपती शिवाजीनगर येथील चार जण बर्‍हाणपूर येथील पंकज मोरे यांच्या माध्यमातून या यात्रेत सहभागी झाले होते. १८ ऑगस्ट रोजी ही यात्रा ओंकारेश्वर येथून निघून दररोज ४० कि.मी. पायी चालून त्यांचा मुक्काम होत होता. दोंडवा, रूस्तमपूर व झिरी येथे मुक्काम करून २१ ऑगस्ट रोजी ही यात्रा बर्‍हाणपूर येथे समाप्त झाली. बर्‍हाणपूर येथून छत्रपती शिवाजी नगर येथील जय भवानी मंदिर ट्रस्टचे सचिव गजानन चव्हाण, अनिल सुर्यवंशी, गजराज साळुंके व गोलू पोंदे या चौघांनी ही कावडयात्रा पुढे आणत २१ ऑगस्ट रोजी पुर्णाळफाटा येथे मुक्कात करून २२ ऑगस्टला छत्रपती शिवाजीनगर येथे दाखल झाले व राजेश्वर मंदिर येथे कावडमधून आणलेल्या जलाचा अभिषेक करीत शिवाची आराधणा केली.
यावेळी माजी आमदार वसंतराव शिंदे, माजी नगरसेवक राजूभाऊ डोफे, साहेबराव जगताप, शिवाजीराव भोईटे, राम थोरबोले, संजय भोईटे, मदनराव राठोड, गंगेश्वर कॅटर्सचे भानुदास फुलोरकर, प्रमोद परदेशी, राजकुमार वानखेडे, विजयकुमार हांडगे, राम जगताप, श्याम शिकेतोड, संजय मोरे, राम शिकेतोड, मनिष भदाले पांडूरंग चिम, किशोर लोंढे, निंबाजीराव घुले, सुभाष पवार, भानुदास सुर्यवंशी, प्रतिक शिंदे आदींसह छत्रपती शिवाजी नगरातील माता-भगिणींनी या कावडधार्‍यांचे औक्षण करून स्वागत करीत ठिकठिकाणी त्यांचे औक्षण करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here