६ वर्षीय मुलीचे अपहरण करणार्‍या आरोपीला शेगावात अटक !शालिमार एक्स्प्रेस मधून घेतले मुलीसह ताब्यात !!

0
8
चिमुकल्या मुलीचे अंगावर चादर टाकुन बर्थवर झोपविलेले होते ! प्रत्येक रेल्वेस्टेशनवर चौकसीचे भितीने शौचालयात लपुन जात असे !!

गिरीश पळसोदकर, जगदीश न्युज प्रतिनिधी,शेगाव / दि ७

मुंबई येथून ६ वर्षांच्या मुलीचे अपहरण करण्यात आले होते. सीसीटीव्हीच्या साहाय्याने पोलिसांनी आरोपीला शालिमार एक्स्प्रेस मधून शेगाव रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक २ वर उभय असलेल्या शालिमार एक्स्प्रेस मधून अटक केली.राठीन शंकर घोष वय ३३ असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून तो मूळचा कोलकत्ता पश्चिम बंगाल येथील रहिवासी आहे.

नागपाडा परीसर मुंबई येथून एका ६ वर्षीय चिमुकलीचे अपहरण करून एक भामटा शालिमार एक्सप्रेस ने कोलकत्ता कडे निघाला असल्याची माहिती मुंबई पोलिसांकडून शेगाव रेल्वे पोलिसांना मिळाल्यानंतर आज बुधवारी सकाळी शेगाव रेल्वे स्थानकावर आरपीएफ, लोहमार्ग पोलीस आणि शहर पोलिसांच्या संयुक्त पथकाने कारवाई करीत शालिमार एक्सप्रेस शेगाव रेल्वे स्थानकावर अधिक काळ थांबवून गाडीची कसुन तपासणी केली असता नागपाडा येथून अपहृत झालेली चिमुकली मुलगी आणि अपहरण करणारा तथाकथीत आरोपी रेल्वेच्या जनरल कोच मध्ये मिळून आला.

शेगाव रेल्वे स्टेशनवर गाडी थांबल्यानंतर आपल्याला पोलिसांनी पाहू नये यासाठी स्टेशन येताच आरोपी हा शौचालयात जाऊन बसत होता यानंतर आरपीएफ रंजन तेलंग आणि विनोद इंगळे यांनी कसून एक्सप्रेस मधिल अनेक बोगीत जाऊन दक्षपणे तपासणी केली असता संशयीत आरोपी मिळून आला असता त्याला पोलिसी खाक्या दाखवतात त्याने आपल्या सोबतची अपहरण करून आणलेली चिमुकली जनरल कोच मध्ये वरच्या बर्थवर बसून ठेवल्याचे सांगितल्यानंतर पोलिसांनी सदरच्या चिमुकलीला तेथून रेस्क्यू केले. यानंतर सदरची माहिती मुंबई पोलिसांना देण्यात आली. आरोपीची कसून चौकशी सुरु असून मुलं चोरीच्या रॅकेट ची शक्यता वर्तविण्यात येत आहे.आरपीएफ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणवीर सिंग, एसआय डॉ.विजय साळवे, हेकॉ.रंजन तेलंग, विनोद इंगळे, एएसआय प्रवीण भरणे, जीआरपी पीएचसी गजानन वैताकर, शहर पोलिस स्टेशनचे एपीआय सिद्धार्थ यशोद यांनी हि संयुक्तपणे ही अभिनंदनिय कारवाई केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here