मलकापूर शहरातून जाणारा हायवे क्रमांक ५३ महामार्गावर मोकाट जनावर रस्त्यात आल्याने काली पिली व कंटेनरचा भीषण अपघात !! ११ ईसम जखमी, दोन गायी चा मृत्यू…

0
380

कैलास काळे, जगदीश न्युज प्रतिनिधी, मलकापुर

मलकापूर शहरातून जाणाऱ्या हायवे क्रमांक 53 वरती जनावरे रस्त्यात आल्याने काली पिली व ट्रकचा भीषण अपघात होऊन 10 जण जखमी झाल्याचे घटना आज दिनांक 8 सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास मुंदडा पेट्रोल पंप नजीक घडली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की खामगाव कडून मलकापूरच्या दिशेने येत असलेले काली पिली वाहन क्रमांक एम.एच. 30 इ 9403 तर त्याच दिशेने भरधाव वेगाने येत असलेले कंटेनर क्रमांक जे.एच 10 बी.जे 3263 या वाहन चालकाने मद्यपान करून ओव्हरटेक करत असताना जनावरे रस्त्यात आल्याने ट्रकचे नियंत्रण सुटून कालीपिलेला धडक दिली.

ही धडक एवढी जबर होते की अक्षरशा काली पिलीने दोन पलटी खाऊन रस्त्याच्या कडेला पडली? या अपघातात दोन गायी छा मृत्यू झाला आहे तर काळी पिवळी मधील ज्ञानेश्वर भगवान कुराडे वय 28 वर्ष रा. पान्हेरा, सपना न्यानेश्वर कुराडे वय 23 वर्ष राहणार पान्हेरा, सुशिलाबाई शिंदे वय 65 वर्ष राहणार देऊळगाव गुजरी, रोहित मनोहर इंगळे वय 31 वर्ष राहणार चिखली, विजय वसंत बोंडे राहणार विटाळी, शिवाजी दिनकर किरण 24 वर्ष राहणार विटाळी, राज लक्ष्मण लक्ष्मण बॉंडे वय 50 वर्ष राहणार विटाळी, भगवान लक्ष्मण सोले वय 60 वर्ष राहणार खामगाव, शत्रुघन तुळशीराम टवळकर वय 45 वर्ष राहणार धानोरा, अब्दुल शकील अब्दुल जब्बार वय 45 वर्ष राहणार वडनेर तर ट्रक चालक असलम अन्सारी कयूम अंसारी वय 40 वर्ष राहणार छत्तीसगढ हे या अपघातात जखमी झाले या घटनेची माहिती मिळताच मलकापूर शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी तसेच ओम साई सर्विस चे ॲम्बुलन्स चालक भूषण थोरात पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊन तात्काळ जखमींना मलकापूर उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल केले आहे. यामध्ये काही प्रवाशांचे प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालय येथे दाखल करण्यात आले आहे?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here