खामगांव शहरातील श्री नवयुवक मानाची भव्य कावड यात्रा हजारो शिवभक्तांचे ऊपस्थीतीत संपन्न ! सिनेस्टाॅर निल कल्याणकर यांचा शिवशंकराचे भुमिकेत विषेश सहभाग !!

0
91
सिनेस्टार निल कल्याणकर भगवान शंकराचे भुमीकेत व मिनाताई गिते या पार्वतीदेवी चे भुमिकेत सहभाग

गिरीश पळसोदकर, जगदीश न्युज प्रतिनिधी, खामगांव

बुलडाणा जिल्ह्यातील सर्वात जुनी कावडयात्रा म्हणून प्रसिध्द असलेली श्री नवयुवक मानाची कावड यात्रा दरवर्षी प्रमाणे चंदा देखील उत्साहात संपन्न झाली. या वर्षी श्रीक्षेत्र चांगदेव (मुक्ताबाई) येथून ११० किलोमिटर पायी वारी करून रविवार दि. १० सप्टेंबर रोजी रात्री सुटाळा येथे पोहचली. स्थानंतर विश्रांती घेवून सोमवार दि. ११ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता श्री महादेवाची विधीवत आरती, पुजा करून कावड यात्रेला सुरुवात झाली होती.

विशेष म्हणजे यावर्षी श्री नवयुवक मानाची कावड यात्रा बतीने नागरीकांच्या सेवेत विविध वैद्यकिय उपकरणे रूजू करण्यात आले आहेत त्याचा शुभारंभ देखील झाला, यात अॅम्ब्युलन्स, शवपेटी, व्हिल चेअर इत्यादी साहित्यांचा समावेश आहे. सकाळी ११ वाजता सुटाळा येथून प्रारंभ झालेल्या कावड यात्रेत विविध देखावे सादर करण्यात आले होते. त्यात आकर्षक असा श्री महादेवाचे तांडव नृत्य सर्वांचे आकर्षण ठरले. नांदुरा येथील मुळनिवासी सिनेस्टार नील कल्याणकर यांनी भगवान शंकराची भुमिका साकारली होती तर पार्वती मातेची भुमीका मिनाताई विनोद गीते, रा. राठी प्लॉट, खामगांव यांनी साकारली होती.

विशेष म्हणजे या वर्षी महिला भावीकांचा देखील मोठ्या प्रमाणात श्री नवयुवक मानाची कावड यात्रेत समावेश होता. तसेच कावडधारी युवक देखील मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तसेच पारंपारीक वाद्य, उज्जैन येथील ढोल पथक हे देखील सर्वांचे आकर्षण ठरले. खामगांव शहरातील सर्वात जुन्या असलेल्या या कावड यात्रेची युवा मागील ८ वर्षांपासून समाजसेवक

राहुलभाऊ कळमकार हे सांभाळत असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी निघणार्‍या भव्य कावड यात्रेत युवक, महिला व नागरीक सहभागी होत असतात.

नवयुवक मानाची कावड यात्रा गावातून निघाली असता ठिकठिकाणी सामाजिक संस्था, राजकिय क्षेत्रातील मान्यवरांनी यात्रेचे स्वागत केले. यात्रेत सहभागी कावडधाऱ्यांकरीता चहा, फराळ व थंड पाण्याची व्यवस्था देखील अनेकांनी केली होती. श्री नवयुवक मानाची कावडयात्रेचे अध्यक्ष राहुलभाऊ कळमकार. उपाध्यक्ष लखन करणे यांचे भगवा रूमाल व टोपी देवून सत्कार करण्यात आला. सायंकाळी कावडयात्रा दालफेल भागात पोहोचल्यानंतर आणलेल्या पवित्र जलाने श्री महादेव मुर्तीला अभिषेक करण्यात आला व महाआरती करून कावड यात्रेची सांगता झाली. सदर कावडा यात्रा यशस्वी करण्याकरीता दालफैल, राठी प्लॉट भागातील व परिसरातील नागरीक, माता भगीनी आदींनी सहकार्य केले त्यांचे आभार सुध्दा अध्यक्ष राहुलभाऊ कळमकर यांनी आभार व्यक्त केलेले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here